Friday, 20 March 2020

बुद्ध व बोधिसत्व म्हणजे काय?


*_बुद्ध व बोधिसत्व म्हणजे काय?_*
*'बुद्ध' शब्दाचा अर्थ:-*
            बुद्ध म्हणजे ज्याला सम्यक संबोधीची प्राप्ती झालेली आहे असा: समयकसंबुद्ध किंवा ज्याला परिपूर्ण ज्ञान प्राप्त झाले आहे असा. . बुद्ध हे व्यक्तीचे नाव नव्हे. ते मनाच्या स्थितीचे किंवा अवस्थेचे नाव आहे. मनाची अशी अवस्था की, जी मानसिक विकासाच्या अत्युच्च शिखरावर पोहोचलेली आहे. 
            बोधिसत्व म्हणजे बुद्ध होण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य ज्ञानप्राप्तीपूर्वी गौतम केवळ बोधिसत्व होता. बोधिसत्व आपल्या जीवनाच्या अवस्थेत क्रमाक्रमाने प्रगति करीत, दहा पारमितांचा परिपूर्ण अभ्यास करीत, सम्यक संबुद्ध होती,. पहिल्या अवस्थेत “मुदिता” (आनंद), दुसर्‍या अवस्थेत विमलता (शुद्धता), येणेप्रमाणे प्रभाकारी (तेजस्विता), अर्चिष्मति (अग्निप्रमाणे तेजस्वी बुद्धिमत्ता), सुदूर्जया (जिंकण्यास कठीण), अभिमुखी (पदार्थाची उत्क्रांतीव तिच्या कारणांची बारा निदाने जाणणे), ‘दूरग्ङमा (दूर जाणे), “अचल (अढळ), साधूमती (धर्माच्या सर्व दिशा जाणणे) आणि दहाव्या अवस्थेत तो धर्ममेध होतो व त्याला बुद्धाची दिव्यदृष्टी प्राप्त होते.  

*बोधीसत्वाचा अर्थ :-*
          बोधी म्हणजे महान ज्ञान आणि सत्व म्हणजे प्राणी. बोधिसत्व म्हणजे जो कधी ना कधी निश्चितपणे बुद्ध किंवा महाज्ञानी बनेल असा बुद्धत्व प्राप्ती करीता प्रयत्नशील माणूस. बोधीसत्वाला सतत दहा जन्मांपर्यंत 'बोधिसत्व' राहावे लागते. *जन्म म्हणजे मानसिक परिवर्तन.* (_जन्म म्हणजे कायेचा मृत्यू होऊन पुन: जन्म घेणे नव्हे. जेव्हा बाबासाहेबांनी हिंदू धर्माचा त्याग करून बुद्ध धम्माची दीक्षा घेतली तेव्हा त्यांनी म्हटले, “माझा पुनर्जन्म झाला आहे. म्हणजेच मानसिक विचारांची क्रांति घडून आली आहे._) ज्ञान प्राप्तीपूर्वी  गौतम केवळ बोधिसत्व होता. ज्ञान प्राप्तीनंतर ते ‘बुद्ध’ झाले.

*बोधिसत्व कोणाला म्हणावे? आणि बोधिसत्व म्हणजे काय?*

बोधिसत्व प्राप्त होण्यासाठी त्या व्यक्तीने दहा पारिमितांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. दहा पारिमितांचे पालन करताना बोधिसत्वाकडे स्थित्यांतर सुरु होते.

*_१० पारमिता_*

*१) शील:-* शील म्हणजे नितिमत्ता, पापभिरुता, वाईट गोष्टी न करणे, अपराध करण्याची लाज वाटणे.

*२)  दान:-* म्हणजे निस्वार्थ, परोपकार अर्थात तन, मन धनानी दुस-याची भलाई करणे.

*३) उपेक्षा:-* म्हणजे अलिप्तता, अनासक्ति, आवड-नावड नसणे, फलप्राप्तिने विचलीत न होणे, निरपेक्षतेने सतत प्रयत्नशील राहणे.

*४) नैष्क्रम्य:-* म्हणजे ऐहिक सुखाचा त्याग करणे.

*५) वीर्य:-* योग्य प्रयत्न करणेहाती घेतलेले काम माघार न घेता पूर्ण सामर्थ्याने पूर्ण करणे.

*६) शांती:-* म्हणजे क्षमाशीलतात, द्वेषाला द्वेषाने उत्तर ने देणे. द्वेषाने द्वेष शमत नसून क्षमाशीलतेने शमते.

*७) सत्य:-* कधीही खोटे न बोलणे, कोणाचीही चुगली न करणे, कोणाचीही निंदा नालस्ती न करणे.

*८) अधिष्ठान:-* ध्येय गाठण्याचा द्रृढ निश्चय म्हणजे अधिष्ठान.

*९) करुणा:-* समस्त प्राणिमात्रा विषयी प्रेमपुर्ण व दयाळू व्यवहार म्हणजे करुणा होय.

*१०) मैत्री:-* प्राणिमात्र, मित्र, शत्रू ते सर्व जीव जंतू बद्दल बंधूभाव बाळगणे म्हणजे मैत्री होय.

 
_वरील दहा पारिमितांचा सराव करता करता बोधिसत्वाची स्थीती सुरु होते. ती सुद्धा दहा टप्य्यात असते. हे दहा टप्पे म्हणजे बोधिसत्वाची अवस्था. एकदा का हे दहा टप्पे पुर्ण झाले की मग जी अवस्था प्राप्त होते तीला बुद्धत्व म्हणतात. तर दहा पारिमितांच्या सरावाने बोधिसत्व प्राप्त करुन देणारे ते दहा टप्पे कोणते ते पाहू या._

 
बोधिसत्व आपल्या जीवनाच्या *पहिल्या अवस्थेत ‘मुदिता’ (आनंद) प्राप्त करून घेतो.* सोनार ज्याप्रमाणे चांदीतले कीट काढून टाकतो त्याप्रमाणे बोधिसत्व आपल्यातील अशुद्धता काढून टाकल्यावर असा विचार करु लागतो की, प्रथम अविचारी असलेला पण पुढे विचारी बनलेला मनुष्य ढगातून बाहेर पडलेल्या चंद्राप्रमाणे जगाला प्रकाशित करतो. हे जाणल्यावर त्याला आनंद होतो आणि त्याला सर्व प्राणिमात्राच्या कल्याणाची तीव्र तळमळ लागते.

 
जीवनाच्या *दुसर्या अवस्थेत त्याला ‘विमलता’ (शुद्धता) प्राप्त होते.* या वेळी बोधिसत्वाने  कामवासनेचे सर्व विचार मनातून काढून टाकलेले असतात. तो दयाशील होतो. तो सर्वांना दया दाखवितो. तो लोकांच्या दुर्गुणाची खुशामत करीत नाही किंवा त्याच्या सदगुणाविषयी त्यांना नाउमेद करीत नाही.

 

जीवनाच्या *तिसर्या अवस्थेत प्रभाकारीअवस्था (तेजिस्वता) प्राप्त करून घेतो.* या वेळी बोधिसत्वाची बुद्धी आरशाप्रमाणे स्वच्छ झालेली असते. अनात्म व अनित्यता यांच्या सत्याचे त्याला पूर्ण ज्ञान आणि आकलन झालेले असते. आता त्याला फक्त सर्वोच्च ज्ञान मिळविण्याची इच्छा  असते आणि त्यासाठी तो कशाचाही त्याग करण्यास तयार असतो.
 

जीवनाच्या *चवथ्या अवस्थेत तो ‘अर्चिष्मती’ (अग्नीप्रमाणे तेजस्वी बुद्धिमत्ता) प्राप्त करून घेतो.* या स्थितीत बोधिसत्व अष्टांगिक मार्ग, चतुर्विध ध्यान, चतुर्विध व्यायाम, चतुर्विध इच्छाशक्ती आणि पंचशील यांच्यावर आपले चित्त केन्द्रित करतो.

 

जीवनाच्या *पाचव्या अवस्थेत तो ‘सुदुर्जया’ (जिंकण्यास कठीण अशी स्थिती) प्राप्त करून घेतो.* सापेक्ष आणि निरपेक्ष यांच्यातील सबंधाचे त्याला पूर्ण ज्ञान होते.
 

जीवनाच्या *सहाव्या अवस्थेत तो ‘अभिमुखी’ होतो.* या अवस्थेत पदार्थाची उत्क्रांती आणि तिचे कारण याची ‘बारा निदाने’ पूर्ण आकलन करण्याची त्याची तयारी झालेली असते; आणि ‘अभिमुखी’ नावाच्या त्या ज्ञानामुळे अविद्येने  अंध झालेल्या सर्व प्राणिमात्रां विषयी त्याच्या अंत:करणात अगाध करुणा उत्पन्न होते.

 
जीवनाच्या *सातव्या अवस्थेत बोधिसत्व ‘दूरग्ङमा’ (दूर जाणे) ही अवस्था प्राप्त करतो.* बोधिसत्व आता दिक्कालातीत असतो; तो अनंताशी एकरूप झालेला असतो. तथापि, सर्व प्राणिमात्रां विषयी वाटणार्या करुणेमुळे त्याने आपले नाम-रूप अद्यापही धारण केलेले असते. एका बाबतीत मात्र तो इतरांच्यापेक्षा अगदी निराळा असतो. कमलपत्रावर ज्याप्रमाणे पाणी ठरत नाही त्याप्रमाणे जगातील मोह त्याला चिकटून राहात नाही. तो आपल्या सहचारांतील तृष्णा शांत करतो. परोपकारबुद्धी, सहनशीलता, व्यवहारचातुर्य, शक्ती, शांत वृत्ती, बुद्धी आणि सर्वश्रेष्ठ प्रज्ञा याची तो जोपासना करतो.

या अवस्थेत असताना त्याला धर्माचे ज्ञान होते, परंतु लोकांना समजेल अशा रीतीनेच तो त्याची त्यांना ओळख करून देतो आपण व्यवहारचातुर्याने आणि सहनशीलतेने वागले पाहिजे हे त्याला कळते. लोकांनी त्याला कितीही त्रास दिला तरी तो शांत वृत्तीने तो त्रास सहन करतो; कारण केवळ अज्ञानामुळेच लोकांनी त्याच्या हेतुबद्दल गैरसमज करून घेतले आहेत हे त्याला कळत असते. परंतु त्याच वेळी प्राणिमात्रांचे कल्याण करण्याविषयीचा त्याचा उत्साह यत्किंचतही कमी होत नाही किंवा प्रज्ञेकडेही तो पाठ फिरवीत नाही, म्हणून दुर्दैव त्याला सन्मार्गावरून कधीही च्युत करु शकत नाही.

 
जीवनाच्या *आठव्या अवस्थेत  तो ‘अचल’ होतो.* या अढल अवस्थेत बोधिसत्वाला करावे लागणारे  सर्व कष्ट संपतात. जे जे चांगले आहे ते ते तो स्वाभाविकतःच अनुसरतो; तो जी जी गोष्ट करील त्या त्या गोष्टीत तो यशस्वी होतो.

 
जीवनाच्या *नवव्या अवस्थेत तो ‘साधुमति’ होतो.* ज्याने सर्व धर्म किंवा त्यांची शास्त्रे आणि सर्व दिशा जिंकल्या आहेत, आणि त्यांचे त्याला पूर्ण आकलन झालेले असून जो कालातीत होतो अशाची साधुमति’ ही अवस्था असते.

 
जीवनाच्या *दहाव्या अवस्थेत  तो ‘धर्ममेध’ होतो.* बोधिसत्वा ला बुद्धाची दिव्यदृष्टी प्राप्त होते.

 

*_बोधिसत्व ही दहा सामर्थ्ये  प्राप्त करून घेतो; कारण बुद्ध होण्यास त्यांची आवश्यकता असते. बोधीसत्वा ची स्थित्यंतरे  होत असताना त्याने ही दहा सामर्थ्ये मिळविली पाहिजेत, इतकेच नव्हे तर त्याने ‘दहा पारमितां’ चाही परिपूर्ण अभ्यास केला पाहिजे. एक ‘पारमिता’ ही जीवनाच्या एका अवस्थेची परिपूर्ती असली पाहिजे. पारमितांचा खास व्यासंग पायरीपायरीने केला पाहिजे. एका जीवनावस्थेत एकच पारमिता असली पाहिजे. एकीचा थोडा अंश आणि दुसरीचा थोडा अंश असे मिश्रण त्यात असता कामा नये. अशा प्रकारे बोधिसत्वाची दुहेरी तयारी झाल्यानंतरच तो ‘बुद्ध’ होतो. ‘बुद्ध’ हा बोधिसत्वाच्या जीवनातील कळस होय._*
 
संकलित माहिती
 

Thursday, 19 March 2020

*कलाप*

ज्या कणाला पुन्हा विभाजीत करता येत नाही अश्या कणांना भगवान बुध्दांनी 'कलाप' असे म्हटले आहे. कलाप एकसंघ नसून तो समूह असतो. तो एक घन कण नसतो, तो तरंगाचा पुंजका असतो. जी कोणतीही घनवस्तू दिसते ती असंख्य कलापांचा केवळ एक पुंजका असतो. प्रत्येक कलापामध्ये सुध्दा पोकळी असते. ते एकास एक भिडलेले नसतात. सर्व तरंगाशिवाय काहीही नसते. अलिकडेच शास्त्रज्ञांनी हिग्स बोसान ह्या मूलभूत कणाचा शोध लावला. ह्या कणाला मूलभूत अश्यासाठी म्हटले गेले आहे की ह्या कणापासूनच सृष्टीची उत्पत्ती झालेय असे शास्त्रज्ञांचे मत आहे. बुध्द ही 'रूप' हे अठ्ठकलापा पासून बनले आहे असे सांगतात. कारण कोणत्याही घन वस्तूच्या उत्पत्तीचा पहिला टप्पा हा हिग्स बोसोन असतो. 

भौतिक सत्य बदलत असते याची अनुभूति भगवान बुध्दांनी स्वनिरिक्षण करित असतांना घेतली. आपल्या मनाच्या तीक्ष्ण एकाग्रतेने बुध्दांनी आपल्या मनाचा तळ गाठला. त्यात त्यांना असे आढळले की, आपले शरीर हे लहान लहान कलापांचे बनलेले आहे. ते कलाप सारखे उत्पन्न व नष्ट होतात. हाताची चुटकी वाजेपर्यत किंवा डोळ्यांची पापणी लवेपर्यंत त्यातील प्रत्येक कलाप शत सहस्त्र कोटी इतक्या वेळा जन्मतो व मृत्यू पावतो असे त्यांना आढळले. 
नोबेल पुरस्कार विजेते डॉ. लुईस वॉल्टर अल्वारेस यांनी Bubble Chamber यंत्र बनवून परमाणू पेक्षाही सूक्ष्म कणांची ( Subatomic Particle ) उत्पत्ती व लय यांची मोजणी केली. आणि एका सेकंदात एकावर बावीस शून्य इतक्या वेळा उदय व लय पावतो हे दाखवून दिले. 
भगवान बुध्दांनी शोधलेले सत्य व त्या शास्त्रज्ञाने शोधलेले सत्य अगदी तंतोतंत बरोबर जुळते. 

आपले 'रूप' हे अठ्ठकलापाने बनलेले असते. अठ्ठकलाप हे चार महाभूत व त्यांच्या गुणधर्माचा समुच्चय असतो. ते एक दुसऱ्याहून अलग होऊ शकत नाही. तरीसुध्दा त्यांच्यामध्ये परस्पर पोकळी असते. आईनस्टाईनच्या Theory of Relativity या सिध्दांन्तानुसार जड वस्तू, शक्ती, आकाश, ऊर्जा आणि काळ यांच्यामध्ये परस्पर संबंध आहे. त्याच्यानुसार आकाश ( Space ) केवळ त्रिपरिमाण ( Three Dimensional ) नाही आणि काळाचे स्वतंत्र अस्तित्व नाही. दोहींचा परस्पर संबंध आहे. म्हणून ते चार परिमाण  ( Four Dimensional ) मध्ये एकमेकाशी निगडीत आहेत. या सिध्दांन्तानुसार जड वस्तू ( Mass ) ही केवळ एका शक्तिरूपाने विद्यमान आहे. एक स्थिर वस्तू स्वत:च  शक्तीचा ( ऊर्जेचा ) संचय आहे. त्याचा सिध्दांत येणेप्रमाणे ( E= mc2, E = energy, M = mass, C= speed of light ) याचाच अर्थ असा की कोणतीही वस्तू ही स्वत: च्या प्रकंपनामुळे असतो. भगवंतांनी म्हटलेच आहे की या विश्वातील प्रत्येक वस्तू, प्रत्येक कलाप केवळ प्रकंप मात्र आहेत. प्रवाह मात्र आहेत. Quantum Theory या शोधामुळे ही गोष्ट प्रकट झालेली आहे की, एकच लघुकण एकाच वेळी दोन रूप धारण करत असतो. एक कण ( Particle ) रूप आणि दुसरे तरंगरूप  ( Wave ).
बुध्दांनी या गोष्टीचा शोध घेतला की प्रत्येक कलाप अत्यंत तीव्र गतीने प्रकंपित होतो, बदलतो आणि त्याची उत्पत्ती व लय होतो.  आज आधुनिक वैज्ञानिकांसुध्दा तसल्याच प्रचंड गतीचा शोध लावलाय. 

सब्बो पज्जलितो लोको।
सब्बो लोको पकम्पितो।

सर्व सृष्टी जळत आहे. 
सर्व सृष्टी प्रकंपित होत आहे. 

- संयुक्त निकाय - भिक्खुणीसंयुक्त - उपचाला सुत्त 

रूप, कलाप यांचे संदर्भ - अभिधम्मत्थसंग्ड्हो
 
संकलित माहती
 

बालवग्गो


 
*!! _धम्मपद_ !!*
५-बालवग्गो
🌼🌼🌼
 *दीघा जागरतो रत्ती दीघ सन्तस्स योजनं !*
*दिघो बालानं संसारो सद्धम्मं अविजानातं !! १ !!*
🌷 *अर्थ* 🌷
 
*जागणाऱ्याची रात्र लांब जाते, थकलेल्याचा मैल (रस्ता) लांबत जातो,*
*सदाचार न जानणार्या अज्ञाणीचा संसार (जीवन प्रवाह) लांबत जातो !! १ !!*
 
*चरयचे नाधिगच्छेय्य सेय्य सदिसमत्तनो !*
*एकचरियं दळहं कयीरा नत्थी बाले सहायता !! २ !!*
🌷 *अर्थ* 🌷
 
*चालताना स्वतःसारखा किंवा स्वतःहून श्रेष्ठ (सोबती) न लाभल्यास,*
*खंभीरपणे एकाकी चालावे, अज्ञाणीची सोबत करू नये !! २ !!*
 
*पुत्ताम'त्थी धनमत्थी इति बालो विहय्यति  !*
*अत्ताही अत्तनो नत्थी कुतो पुत्ता कुतो धनं !! ३ !!*
🌷 *अर्थ* 🌷
 
*माझा पुत्र माझी संपत्ती, असे अज्ञाणी दुःखी होतात,*
*स्वतःच स्वतःचे नसतो, (तर) कसा पुत्र, कशी संपत्ती !! ३ !!*
 
*यो बालो मय्यती बाल्य पण्डितो वापी तेन सो !*
*बालो च पण्डितमानी, स वे बालो'ति वुच्चति !! ४ !!*
🌷 *अर्थ* 🌷
 
*अज्ञानी स्वतःला अज्ञाणी समजत असेल तर तो तितका ज्ञानी आहे,*
*अज्ञानी असूनही स्वतःला बुद्धिमान सांगतो तो (खरा) अज्ञानी !! ४ !!*
 
*याव जीवम्पी चे बालो पण्डितं पायिरूपासति!*
*न सो धम्मं विजानाती दब्बी सुपरसं यथा !! ५ !!*
🌷 *अर्थ* 🌷
 
*अज्ञानी माणूस जीवनभर बुद्धिवंतांच्या सोबत राहिला तरी....*
*त्याला सुसिद्धांत (धम्म) समजत नाही, जसे पळीला वरणाचा स्वाद !! ५ !!*
 
*मुहूत्तमपि चे विय्यु पण्डितं पायिरुपासती!*
*खिप्प धम्म विजानाती जिव्हा सुपरसं यथा !! ६ !!*
🌷 *अर्थ* 🌷
 *सुजान माणूस क्षणभरही बुद्धिवंतांच्या सोबत राहिला तरी....*
*त्याला सुसिद्धांत (धम्म) समजतो, जसे जिभेला वरणाचा स्वाद !! ६ !!*
 
*चरन्ति बाला दुम्मेधा अमित्तेनेव अत्तना!*
*करोंता पापकं कम्मं यं होति कटूकफ्फलं !! ७ !!*
🌷 *अर्थ* 🌷
*अज्ञाणी, दुर्बुद्ध स्वःताच स्वतःचा शत्रू होतो,*
*दुष्कृत्य करून, ज्याची फळे कडू असतात !! ७ !!*
 
*न तं कम्मं कतं साधु यं कत्वा अनुतप्पति !*
*यस्स अस्सूनुखो रोदं विपाकं पटिसेवति !! ८ !!*
🌷 *अर्थ* 🌷
 
*ते कृत्य करणे चांगले नाही, ज्याने पश्चाताप करावा लागतो,*
*आणि ज्याचे परिणाम अश्रू (पूर्ण) चेहऱ्याने रडत भोगावे लागतात !! ८ !!*
 
*तच्य कम्मं कतं साधु यं कत्वा नानुतप्पति !*
*यस्स पतितो सुमनो विपाकं पटिसेवति !! ९ !!*
🌷 *अर्थ* 🌷
 
*ते कृत्य करणे चांगले, ज्याने पश्चाताप करावा लागत नाही,*
*आणि ज्याचे परिणाम प्रसन्न चित्ताने, चांगल्या मनाने भोगता येतात !! ९ !!*
 
*मधुवा मय्यती बालो याव पापं न पच्चति !*
*यदा च पच्चति पापं अथ बालो दुक्ख निगच्छति !! १० !!*
🌷 *अर्थ* 🌷
*जोवर दुष्कृत्य पक्व होत नाही तोवर अज्ञानी त्याला गोड समजतात,*
*जेंव्हा दुष्कृत्य परिपक्व (परिणामीत) होते, तेंव्हा ते दुःखी होतात !! १० !!*
 
*मासे मासे कुसग्गेन बालो भुय्येथ भोजनं !*
*न सो संखतधम्मानं कलं अग्धति सोळसिं !! ११ !!*
🌷 *अर्थ* 🌷
*अज्ञानी (माणसाने) महिनो-महिने गवताच्या टोकाने अन्न खाल्ले,*
*तरी तो सुसिद्धांत जाणणार्याच्या सोळाव्या भागाच्या सममूल्य होत नाही. !! ११ !!*
 
*न हि पापं कतं कम्मं सज्जू खीरंव मुच्चति!*
*डहन् बालमन्वेति भस्मग्च्छन्नोव पावको !! १२ !!*
🌷 *अर्थ* 🌷
 *वाईट केलेली कृत्य (ताज्या) दूधासारखी त्वरित नासत (परिणमित होत) नाहीत,*
*तो राखेने अच्छादित निखार्‍यांसारखी, अज्ञानी (मानवा) चा पाठलाग करतात !! १२ !!*
 
*यावदेव अनत्थाय ञतं बालस्स जायति !*
*हन्ति बालस्स सूक्कंसं मुद्धमस्स विपायतं !! १३ !!*
🌷 *अर्थ* 🌷
 *अज्ञानीच्या जाणिवांचा आभाळापर्यंत अनर्थ होतो*
*अज्ञानीच्या शुभ्कृत्यांचा नाश होतो, शिराचा (बुद्धीचा) नाश होतो  !! १३ !!*
 
*असन्त  भावनमिच्छेय्य पुरेक्खारच्य भिक्खूसू !*
*अवासेसू च इस्सरायं पुजा परकुलेसु च !! १४ !!*
🌷 *अर्थ* 🌷
 *भिक्खुं मध्ये आदर प्राप्तीची इच्छा, (हे) दुष्टतेचे, चुकीचे आहे,*
*मठ-मंदिराचा उपभोग, परक्या कुळाच्या (लोकां) कडून पूजिले जाणे....... !! १४ !!*
 
*ममेव कत गिही पब्बज्जीता उभो !*
*ममेवातीवसा अस्सू किच्चाकिच्चेसु किस्मिच*
*इति बालस्स सङकप्पो इच्छा मानो च वढति !! १५ !!*
🌷 *अर्थ* 🌷
 *गृहस्थ व प्रवज्जीत या दोहोंत माझ्यासारखा कोण?*
*योग्य-अयोग्य कार्यांवर माझेच स्वमित्व असावे*
*अशी संकल्पना करणाऱ्या अज्ञाणीच्या आकांशा, गर्व वाढतो !! १५ !!*
 
*अय्या ही लाभूपनीसा अय्या निब्बाण गामीनी_ !*
*एवमेत्त अभिय्याय भिक्खु बुद्धस्स सावको
*सक्कारं नाभिनन्देय्य विवेकमनुबुह्ये_ !! १६ !!*
🌷 *अर्थ* 🌷
 
*लाभाचा मार्ग वेगळा, निर्वानाचा मार्ग वेगळा*
*हे असे जाणून बुद्धाच्या शिष्य भिक्खूने*
*सत्काराने आनंदु नये, विवेकाची वृद्धी करावी !! १६ !*!
 

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...