बुद्ध वंदना
इति पि सो भगवा अरहं, स्म्मासम्बुद्धो,
विज्जाचरणसम्पन्नो, सुगतो, लोकविदु, अनुत्तरो,
पुरिसधम्मसारथि, सत्था देव अनुस्सानं, बुद्धो भगवाति ।।
विज्जाचरणसम्पन्नो, सुगतो, लोकविदु, अनुत्तरो,
पुरिसधम्मसारथि, सत्था देव अनुस्सानं, बुद्धो भगवाति ।।
बुद्धं जीवितं परियन्तं सरणं गच्छामि ।
ये च बुद्धा अतीता च, ये च बुद्धा अनागता।
पच्चुपन्ना च ये बुद्धा, अहं वन्दामि सब्बदा ।।१।।
अर्हंत (जीवनमुक्ति) , सम्यक (संपुर्ण) , सम्बुद्ध (जागृत) , विद्या व आचरण यांनी
युक्त , सुगति ज्याने प्राप्त केलेली आहे .
असा सर्वश्रेष्ठ दमनशील, पुरुषांचा सारथि व आधार देणारे,देव मनुष्य व यांचा गुरु असा हा भगवान बुद्ध आहे. अशा या
बुद्ध भगवन्ताचे जन्मभर अनुसरण करण्याचा मी निर्धार करित आहे
मागे जे बुद्ध होऊन गेलेत पुढे जे बुद्ध होतील व हल्ली जे बुद्ध
आहेत त्या सर्वांना मी सदासर्वदा वन्दन करतो / करते ।।१।।
नत्थि मे सरणं अञ्ञं, बुद्धो मे सरणं वरं।
एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमंङ्गलं ।।२।।
एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमंङ्गलं ।।२।।
माझे अन्य कोणतेही सरणस्थान नाही, फक्त बुद्ध हेच माझे सरणस्थान आहे ह्या सत्य वचनाने माझे
जयमंगल होवो ।।२।।
उत्तमग्गेन वंदे हं पादपंसु वरुत्तमं।
बुद्धे यो खलितो दोसो, बुद्धो खमतु तं ममं ।।३।।
बुद्धे यो खलितो दोसो, बुद्धो खमतु तं ममं ।।३।।
बुद्धाच्या पवित्र चरणधुळीला मस्तक वाकवून मी वन्दन करतो /
करते . बुद्धाच्या संबंधी माझ्या हातून काही दोष घडला असला तर तो बुद्ध भगवान मला
क्षमा करो ।।३।।
यं किय्चि रतनं लोके, विज्जती विविधा पुथु ।
तनं बुद्धसमं नत्थि, तस्मा सोत्थि भवंतू मे ।
।४ । ।
ह्या जगात निरनिराळ्या प्रकारची जी अनेक रत्ने आहेत, त्यापैकि बुद्धांसमान अन्य कोणतेही रत्न नाही. या सत्य वचनाने
माझे कल्याण होवो । ।४ । ।
सन्निसिन्नो वरबोधि मुले, मारं ससेनं महंति विजेत्वा
सम्बोधिमागच्चि अनंतञान, लोकत्तमो तं प नमामी बुद्ध ।।५।।
(ज्ञान प्राप्त झालेल्या)
ज्याने पुज्य बोधिवृक्षाखाली बसून मार (कामदेव) ह्याच्या अफाट सेनेसह पराभव केला .
अनन्त ज्ञान प्राप्त करुन ज्याने बुद्धत्व प्राप्त करुन घेतले आशा सर्व
जगात सर्वोत्तम असलेल्या श्रेष्ठ बुद्धाला मी नमस्कार करतो / करते ।।५।।
आयु.महेशजी कांबळे खूप चांगले ज्ञान डिजीटल तंत्रज्ञानाद्वारे योग्य मांडणी करून धम्म प्रसार व प्रचार चालू आहे.धम्मसेवकांच्या पवित्र कर्याला मंगलमय शुभेच्छा. 👍👍👍
ReplyDelete