✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
*_मित्र कसा असावा ?_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2025/01/blog-post_17.html
✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
_मैत्रीचे खरे प्रतीक दाखवण्यासाठी लोक लेबल घेऊन येत नाहीत. खरे मित्र असणे हा जीवनातील सर्वात मोठा आशीर्वाद आहे, परंतु सर्व मैत्री समान निर्माण होत नाहीत. किंबहुना, बरेच लोक त्यांचे खरे मित्र कोण आहेत आणि कोण फक्त ढोंग करत आहेत हे ओळखण्यासाठी धडपडत आहेत. खरा मित्र असा असतो जो जाड आणि पातळ अशा परिस्थितीत तुमच्या पाठीशी उभा राहतो, तुम्हाला आधार देतो आणि तुमचे यश साजरे करतो. तुमच्यासाठी ऐकणे कितीही कठीण असले तरीही तेच तुम्हाला सत्य सांगतील._
_पण कोणीतरी खरा मित्र आहे की फक्त ढोंग करत आहे हे कसे कळेल? भगवान बुद्ध म्हणतात *चार प्रकारच्या लोकांना मित्रांच्या वेशात (रूपात) आपले शत्रु आहेत असे समजावे. कोणते चार ?*_
१) *_जो व्यक्ति मित्राच्या मालकीच्या वस्तुंना आपल्याच मानतो व त्यांना गिळंकृत करण्याचा प्रयत्न करतो._*
२) *_जो व्यक्ति मित्राच्या तोंडावर केवळ बोलघेवडेपणा करतो, केवळ वाणीने बोलत राहतो._*
३) *_जो व्यक्ति मित्राच्या तोंडावर अवाढव्य अवास्तव अशी फाजील स्तुति करतो._*
४) *_जो व्यक्ति मित्रांवर संकटे आणून त्याला -हासाला, अधोगतीला पोहचवितो._*
_*मित्राच्या धन संपत्तीला धूर्तरुपे आपलीच मानणारा मित्राच्या रूपात शत्रु आहे. हे चार प्रकारे ओळखावे.*_
१. _जो मित्राच्या धन संपत्तीला गनिमी काव्याने माझीच संपत्ती आहे, असे मानतो._
२. _जो मित्र म्हणून थोडे देतो व जास्तीत जास्त मागत असतो._
३. _जो मित्र म्हणून केवळ भितीपोटी आपले कर्तव्य काम करतो._
४. _जो केवळ आपल्या स्वार्थासाठी केवळ आपल्या फायद्यासाठी संगत करण्याचा प्रयत्न करतो._
*_केवळ वाणीने बोलघेवडेपणा करणारा मित्राच्या रूपात शत्रु आहे, हे चार प्रकारे ओळखावे._*
१. _केवळ भूतकाळातील कर्तव्य कर्माच्या गोष्टी सांगून जो मित्रता जोडीत असतो._
२. _केवळ भविष्य काळातील कर्तव्य कर्माच्या गोष्टी सांगून जो मित्रता जोडीत असतो._
३. _केवळ शब्दांचे जाळे रचून को-या शब्दांच्या (वाणीच्या) बळावर जो आपले हित स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतो._
४. _जेव्हा मित्राची खरी सेवा करण्याची वेळ येते, त्या वेळी जो कोणते तरी कारण सांगून आपली असमर्थता प्रकट करतो._
*_मित्राच्या अधःपतनाला कारणीभूत होणारा व्यक्ति मित्राच्या स्वरूपात शत्रु आहे, हे चार प्रकारे ओळखावे._*
१. _जो मादक द्रव्याचे सेवन करण्यामध्ये व स्वैराचारी बनविण्यात तसेच अधिकाधिक व्यसनाधीन करण्यात साथ देतो._
२. _जो अयोग्य वेळी रात्री बेरात्री बाहेर भटकवितो, मित्राला अनुचित वेळी भटकवित राहतो._
३. _नाच, गाणे, खेळ, तमाशा अशा थिएटरमध्ये वारंवार त्याला नेण्यासाठी मित्रता करतों._
४. _जो सट्टा जुगार खेळण्यामध्ये व मित्राला वाईट मार्गावर नेण्यामध्ये साथीदारी करतो._
_मित्र म्हणून मित्राच्या धन संपत्तीवर जो बळकावण्याच्या दृष्टीने अधि- कार गाजवितो, जो मित्राची केवळ वाणीच्या माध्यमाने बोलून मदत करण्याचा आव आणतो, जो मित्रांची तोंडावर अवास्तविक अवाढव्य फाजील स्तुति करतो, जो मित्राच्या ऱ्हासाला, अधःपतनाला कारणीभूत होतो, अशा चार प्रकारच्या व्यक्तिला बुध्दिमान सभ्य माणसाने मित्राच्या रूपात आपला शत्रु ओळखावा. त्याला भेटण्याचे टाळावे. त्याला दूर करावे. जो-हासाला कारणीभूत होतो._
*_चार प्रकारच्या मित्राला कल्याण मित्र समजावे. कोणते चार ?_*
१) _जो सतत उपकार करणारा सोबती असतो._
२) _जो सुखामध्ये आणि दुखः मध्येही साथ देणारा असतो._
३) _जो नेहमी मंगलमय सल्ला देणारा असतो._
४) _जो हृदयातून कळवळा दाखविणारा व सहानुभूती बाळगणारा असतो._
*_चार प्रकारे उपकार करणा-या सोबत्याला, कल्याण मित्र आहे असे समजावे._*
१. _जो मित्र म्हणून अनेक वेळा मित्रास प्रमादापासून, अनेक संकटांपासून सावध करीत असतो._
२. _जो आपत्ती विपत्ती पासून मित्रांच्या धन संपत्तीचे योग्य संरक्षण करीत असतो._
३. _संकट समयी व दुखःद प्रसंगी जो मित्राचा आधार बनतो, मदत करतो._
४. _एखादी जबाबदारी स्विकारण्याचे वचन दिले असल्यास त्या जबाबदारीची वेळ आल्यावर तो त्याहीपेक्षा दुप्पट मदत करतो व अधिक पटीने जबाबदारी पार पाडतो._
*_सुख आणि दुःखाच्या प्रसंगी समान भावनेने मित्रासोबत उभा राहून चार प्रकारे जो मदत करतो त्याला कल्याण मित्र ओळखावे._*
१. _त्याला माहीत असलेली गोपनीय माहीती अगोदरच सांगत असतो._
२. _त्याची स्वतःबद्दलची काही गोपनीय माहीती असेल तर तो मित्राजवळ सांगून ठेवतो._
३. _मित्रावर ओढवलेल्या संकटाप्रसंगी, आपत्ती विपत्ती प्रसंगी तो मुद्दाम त्याची साथ सोडत नाही, धैर्याने सोबत उभा राहतो._
४. _वेळप्रसंगी स्वतःचे जीवदान देखील तो मित्राच्या संकट प्रसंगी अर्पण करीत असतो._
*_मित्राचा हित चिंतक म्हणून जो चार प्रकारे हिताचा सल्ला देतो त्याला कल्याणमित्र ओळखावे._*
१. _जो मित्राला वाईट व्यसनांपासून व दुष्कृत्यापासून नेहमी परावृत्त करण्याचा प्रयत्न करतो, त्यांना वाईट कृत्य करू देत नाही._
२. _जो मित्राला नेहमी सत् कार्य करण्याकरीता प्रेरीत करतो, चांगल्या कार्याकरीता सतत प्रोत्साहन देत असतो._
३. _ज्या गोष्टींची मित्राला जाणीव नसेल, त्याने ज्या ऐकल्या नसतील अशा हितकारक गोष्टींची जो माहीती देतो._
४. _दुःख मुक्ति करणा-या परम् सुख शांतीमय निर्वाणाच्या मार्गाचे जो पथ प्रदर्शन करतो._
*_मित्रत्वाच्या सद्भावनेने जो चार प्रकारे कळवळा व्यक्त करतो त्याला कल्याण मित्र ओळखावे._*
१. _मित्रावर ओढवलेल्या संकट प्रसंगी जो कधीही आनंदित होत नाही._
२. _मित्राच्या उत्कर्षामध्ये, प्रगतीमध्ये जो नेहमी आनंदित होत असतो व मनाने पून्हा प्रगतीची मंगल कामना करतो._
३. _मित्राबद्दल दुसरे कोणीही मागे किंवा पुढे वाईट बोलत असतील, त्या वेळी जो त्यांना वाईट बोलण्यापासून रोखीत असतो._
४. _मित्राबद्दल दुसरे कोणीही मागे किंवा पुढे चांगले बोलत असतील अशांची जो प्रशंसा करतो._
*_सुख-दुःखामध्ये जो साथ देणारा असतो, जो हित चिंतक म्हणून नेहमी हित-सुखाचा सल्ला देतो, सद्भावनेने वागवणारा व नेहमी मित्रावर जो अनुकंपा तथा उपकार करणारा असतो अशा चार प्रकारच्या मित्रांना बुध्दिमान माणसाने कल्याण मित्र ओळखावा व माता ज्याप्रमाणे आपल्या एकुलत्या एक मुलाचे त्याग व सेवा भावनेने संरक्षण करते त्या प्रकारे कल्याण मित्राचे, बुध्दिमान सभ्य माणसाने संगोपण करावे._*
✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
*_संदर्भ :-_*
_१) सिगाल सूत्त_
_२) करणीमेत्त सुत्त_
_३) आदर्श बौद्धांची आचार संहिता.. लेखक भदंत राहुल बोधी_
*_लेखन :- महेश कांबळे_*
*_दिनांक :-_* १८/०१/२०२५
✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
No comments:
Post a Comment