Tuesday, 9 July 2024

सुखी गृहस्थ

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_सुखी गृहस्थ_*

*_!! ॐ मणी पद्मे हूँ !!_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/07/blog-post_25.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

             _एकदा तथागत जेथे वास्तव्याला होते तेथे अनाथपिंडक आला. त्याने तथागतांना वंदन केले आणि निकटच आसनस्थ झाला. *गृहस्थाचे सुख कशात आहे हे जाणून घेण्यासाठी अनाथपिंडक आतुर होता.* त्या अनुसार अनाथपिंडकाने गृहस्थाच्या सुखाचे रहस्य कथन करण्याची तथागतांना प्रार्थना केली. तथागत म्हणाले :-

१. "गृहस्थाचे प्रथम सुख स्वामित्वात आहे. *गृहस्थ धन धान्य संपन्न असतो. ही धन संपदा त्याने न्यायाच्या मार्गाने, धम्माच्या मार्गाने, घोर परिश्रमाने संपादन केलेली असते. ही धन संपदा त्याने बाहुबलाने, निढळाच्या घामाने संपादन केलेली असते. आणि तो जेव्हा विचार करतो की, "मी ही धन संपदा न्याय्य मार्गाने अर्जित केली आहे." तेव्हा त्याला सुख प्राप्त होते."*

२. दुसरे सुख उपभोगाचे आहे. गृहस्थ धनधान्य संपन्न आहे. त्याने न्याय्य मार्गाने, धम्म मार्गाने, बाहुबलाने, कठोर परिश्रमाने, निढळाच्या घामाने ही धनसंपदा संपादित केली आहे. *तो धन संपदा उपभोगतो आणि पुण्य कर्म करतो. तो मनी विचार करतो की, "मी न्याय्यमार्गाने संपादित या धन संपदेचा उपयोग पुण्यकर्म करण्यासाठी करतो आहे." या विचाराने त्याला सुख प्राप्त होते.*

३. तिसरे सुख ऋण नसण्याचे सुख होय. जो गृहस्थ कोणाचेही लहान मोठे ऋण देणे लागत नाही त्याला सुख प्राप्त होते. तो असा विचार करतो की, *"मी कोणाचेही देणे लागत नाही." आणि त्याला सुख प्राप्त होते.*

४. चवथे सुख निष्कलंक असण्याचे आहे. *जो गृहस्थ काया, वाचा आणि मनाने निष्कलंक असतो त्याला निष्कलंक असण्याचे, दोष रहित असल्याचे सुख प्राप्त होते.*

_अनाथपिंडका, जर गृहस्थ निरंतर प्रयासात असेल तर, खरेच त्याला या चार सुखांची प्राप्ती होऊ शकते._

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- १०/०७/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...