Wednesday, 10 July 2024

माणसाचे अधःपतन का होते?

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_माणसाचे अधःपतन का होते?_*

*_!! ॐ मणी पद्मे हूँ !!_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/07/blog-post_10.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

_एकदा तथागत श्रावस्ती येथे अनाथ- पिंडकाच्या जेतवनारामात वास्तव्याला होते. एके दिनी उत्तररात्री एक देव आपल्या दीप्तीने जेतवनाचा सारा आसमंत आलोकित करीत तथागतांकडे आला. तो तथागतां निकट आला. आदराने त्याने तथागतांना वंदन केले. तो एका बाजूला उभा राहिला. तो तथागतांना उद्देशून म्हणाला._

_"तथागत, मी आपल्या समक्ष शंका निरसनासाठी उपस्थित आहे. हे श्रमण गौतमा, मी माणसाच्या अधःपतनाविषयी जाणून घेऊ इच्छितो. *कृपया मला माणसाच्या अधःपतनाची कारणे स्पष्ट करावी." तथागतांनी माणसाच्या अधःपतनाची कारणे सांगण्याचे मान्य केले.*_

१. "उन्नतोन्मुख माणसाची लक्षणे सहज जाणता येतात. पतनोन्मुख माणसाची लक्षणेही सहज जाणता येतात. जो धम्मावर प्रेम करतो. *जो धम्मप्रवण आहे तो उन्नतोन्मुख आहे. जो धम्माचा द्वेष करतो, जो अधम्म मार्गाचा अनुयायी आहे. तो पतनोन्मुख जाणावा."*

२. *ज्याला असत्पुरुष प्रिय आहेत त्याला सत्पुरुष अप्रिय आहेत. ज्याला असत्पुरुषाचा धर्म प्रिय आहे. हे मनुष्याच्या अधःपतनाचे दुसरे निमित्त होय.*

३. जो तंद्राधीन आहे. *ज्याला मित्र सहवासात व्यर्थ समय व्यतीत करणे प्रिय आहे, जो कठोर परिश्रमी नाही, जो आलस्यग्रस्त आहे. तो क्रोधी आहे, तो पतनोन्मुख जाणावा.* हे त्याच्या पतनाचे तिसरे निमित्त होय.

४. *जो धनधान्य संपत्र असूनही आपल्या गत यौवनी मातापित्याला आश्रय देत नाही. तो पतनोन्मुख जाणावा* हे त्याच्या पतनाचे चवथे निमित्त होय.

५. *जो मिथ्या कथन करून, श्रमण ब्राह्मण किंवा अन्य संन्याशांना नाडवितो. ने तो पतनोन्मुख जाणावा* हे त्याच्या पतनाचे पाचवे कारण होय.

६. *जो धनधान्य संपन्न आहे. सोने, रुपे आणि धान्याचे भांडार ज्याच्याकडे आहे. पण तो एकटाच त्याचा भोग घेतो. तो पतनोन्मुख जाणावा.* हे त्याच्या पतनाचे सहावे निमित्त आहे.

७. *ज्याला आपल्या जन्म जातीचा, धनाचा, वंशाचा अभिमान वाटतो. जो आपल्या आप्तस्वकीयांचा तिरस्कार करतो तो  पतनोन्मुख जाणावा.* हे त्याच्या पतनाचे सातवे निमित्त होय.

८. *जो मनुष्य व्यभिचारी आहे, मद्यपी आहे, जुगारी आहे, जो आपले धन ऐशआरामात उधळतो तो पतनोन्मुख जाणावा.* - हे त्याच्या पतनाचे आठवे कारण होय.

९. *जो आपल्या भायेंने संतुष्ट नाही. जो वेश्यागामी आहे. परस्त्रीगामी आहे. तो पतनोन्मुख जाणावा* हे त्याच्या पतनाचे नववे कारण होय.

१०. *जो माणूस असंग, उधळ्या स्वभावाच्या स्त्री अथवा पुरुषाला अधिकारपद बहाल करतो तो पतनोन्मुख जाणावा.* हे त्याच्या पतनाचे दहावे कारण होय.

११. *जो क्षत्रिय अल्पसाधने, अल्पक्षमता असूनही मोठा महत्त्वाकांक्षी आहे. राजा होण्याची त्याची आकांक्षा आहे. तो माणूस पतनोन्मुख जाणावा.* हे त्याच्या पतनाचे अकरावे कारण होय.

_माणसाच्या अधःपतनाची ही लक्षणे जाणून घ्यावी. हे श्रेष्ठ देवा, तू जर यांच्यावर विजय संपादन करू शकलास तर तू सुरक्षित आहेस असे जाणावे._

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- ११/०७/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म*_

*_२) पराभव सुत्त_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...