🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_शील सुगन्ध उत्तम आहे_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2024/04/blog-post_7.html
*_!! ॐ मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_न पुप्फगन्धो पटिवातमेति न चंदनं तगरमल्लिका वा ।_*
*_सतञ्च गन्धो पटिवातमेति सब्बा दिसा सप्पुरिसो पवाति।।_*
*_अर्थ :- पुष्पाचा सुगन्ध मग ते पुष्प चन्दनाचे असो, तगराचे असो वा चमेलीचे असो, वाऱ्याच्या उलट दिशेला जाऊ शकत नाही. परंतु सन्ताचा सुगंध वाऱ्याच्या उलट दिशेने सुध्दा जातो. सत्पुरुषांचा सुगन्ध सर्व दिशांना पसरतो._*
_श्रावस्ती जेतवन महाविहारातून एके दिवशी आनन्द ध्यान संपवून भगवंतांकडे गेले आणि वंदन करून म्हणाले - "भन्ते ! सारगंध, मूलगंध आणि पुष्पगंध वाऱ्याच्या दिशेनेच वाहतात, विरूद्ध दिशेने वाहत नाहीत. काय असा एखादा गंध आहे, जो वाऱ्याच्या दिशेनेही वाहतो आणि विरूद्ध दिशेनेही वाहतो ? भगवंतांनी उत्तरादाखल ही गाथा सांगितली._
*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*
*_!!ॐ मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संकलन - महेश कांबळे_*
*_दिनांक :- ०८/०४/२०२४_*
*_संदर्भ :-_*
_*१) धम्मपद - पुप्फवग्गो*_
_*२) धम्मपद - गाथा आणि त्यांच्या अट्ठकथा*_
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment