🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_भिक्षुने गावात भ्रमरासमान वागावे_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2024/04/blog-post_3.html
*_!! ॐ मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_यथापि भमरो पुप्फं वण्णगन्धं अहेठयं ।_*
*_पलेति रसमादाय एवं गामे मुनी चरे ॥_*
*_अर्थ - फुलांच्या वर्णाला व सुगन्धाला धक्का न लावता ज्या प्रमाणे भ्रमर त्याचा रस घेवून निघून जातो. त्याचप्रमाणे मुनीने गावात वावरावे._*
_राजगृहाजवळ सक्खर नावाच्या खेड्यात कोसिय नावाचा एक कंजूस सावकार राहत होता. तो गडगंज श्रीमंत असुनही कधी कोणास काहीही दान देत नव्हता आणि स्वतःही उपभोग घेत नव्हता. एके दिवशी तो आपल्या घराच्या सातव्या मजल्यावर एकटाच खाण्यासाठी मालपुवा बनवत होता, तेव्हा आयु. मोद्गल्यायन आपल्या ऋद्धिबलाने तेथे जाऊन त्याचे दमन करून त्याला उपदेश केला आणि मालपूव्यासाठी त्याला तथागतांकडे घेऊन आले. त्याने भगवन्तासह साऱ्या भिक्षु संघास मालपूवा खाऊ घातला. बुद्ध, धम्म, संघास शरण जाऊन आपली सर्व संपत्ती बुद्ध शासनात खर्च केले. एके दिवशी भिक्षु बैठकीत आयु. मोद्गलायनाची ह्या संबधात प्रशंसा करीत होते, तेव्हा तथागतांनी तेथे येऊन त्यांची चर्चा ऐकून *"भिक्षुंनो ! कुळाचे दमन करणाऱ्या भिक्षुने लोकांची श्रद्धा वृद्धिंगत करतांना भ्रमरा समान भिक्षाटन करावे, जसा माझा पूत्र मोद्गल्यायन करतो."* असे म्हणाले. उपदेश करतांना ही गाथा सांगितली._
*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*
*_!!ॐ मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संकलन - महेश कांबळे_*
*_दिनांक :- ०३/०४/२०२४_*
*_संदर्भ :-_*
_*१) धम्मपद - पुप्फवग्गो*_
_*२) धम्मपद - गाथा आणि त्यांच्या अट्ठकथा*_
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment