🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_कल्याणमित्र_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2024/03/blog-post.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
_कल्याणमित्र हा कोणता मनोरचित शब्द नाही, भगवंतांच्या वाणीतून आलेला खूप महत्वपूर्ण शब्द आहे. कल्याणमित्रतेच्या विषयात भगवान बुद्धांनी अनेक उपदेश दिले. *अङ्गुत्तरनिकायमध्ये एककनिपातच्या कल्याणमित्तादिवर्गामध्ये भगवान म्हणतात-*_
_*“
_मी असा एकही धर्म पाहत नाही जो अनुत्पन्न कुशल धर्माचा उत्पाद करेल, उत्पन्न अकुशल धर्माचा प्रहाण करेल जसे की भिक्षूंनो- कल्याणमित्रता. कल्याणमित्रच अनुत्पन्न कुशल धर्माला उत्पन्न करतात आणि उत्पन्न अकुशल धर्माचे प्रहाण._
_अङ्गत्तरनिकायच्या सत्तकनिपातमधील दुतियमित्तसुत्तात भगवान कल्याणमित्राच्या सात धर्मामधील दक्षतेचा परिचय करवून देतात-_
_*“
_सात धर्माना प्राप्त असलेला भिक्षु (कल्याण) मित्र आहे, सेवेच्या योग्य आहे, पूजनाच्या योग्य आहे, त्याने आपल्याजवळ बोलावले नाही तरी त्याच्याजवळ राहण्यायोग्य आहे. कोणते सात धर्म?_
_१) (लोक) प्रिय असतो (पियो), सुखद असतो (मनापो),_
_२) गुरु असतो (गरु),_
_३) आचरणाने युक्त असतो (भावनीयो),_
_४) वक्ता असतो (वत्ता),_
_५) मधुर वाणी बोलणारा असतो (वचनक्खमो),_
_६) गंभीर विषयांवर संभाषण करणारा असतो (गंभीरञ्च कथं कत्ता),_
_७) जो कुशलतेकडे जाण्यासाठी प्रेरित करणारा असतो (नो च अट्ठाने नियोजेति)_
_असा सात धर्मांना प्राप्त असणारा भिक्षु कल्याणमित्र आहे, सेवेच्या योग्य आहे, पूजनाच्या योग्य आहे, त्याने आपल्याजवळ बोलावले नाही तरी त्याच्याजवळ राहण्यायोग्य आहे._
*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संकलन - महेश कांबळे_*
*_दिनांक :- ०१/०३/२०२४_*
*_संदर्भ :-_*
*_१) विपश्यना साधक (मराठी), बुद्धवर्ष २५६७, पौष पौर्णिमा, २५/०१/२०२४ वर्ष ७, अंक ११_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment