_*प्रश्न ६ -* आत्तापर्यंतच्या पाचही प्रश्नांची जी उत्तरं तुम्ही दिलीत किंवा त्यांचं - विवेचन केलंत, त्यातून तुम्ही जवळपास असं म्हणताय की, चमत्कार असा काही अस्तित्वात नसतो. तुमचे कार्यकर्तेही प्रत्यक्ष काम करताना *'जगात कोणत्याही प्रकारचा चमत्कार नसतो',* असं अतिशय ठामपणे म्हणतात. तर पुढचा प्रश्न असा आहे की, तुमचा आणि कार्यकर्त्यांचा हा इतका ठामपणा कशाच्या आधारावर आहे?_
_*उत्तर -* अहो, साधी गोष्ट आहे. मी जर असं म्हटलं की, जिथं प्रकाश असतो तिथं अंधार नसतो आणि जिथं अंधार असतो तिथं प्रकाश नसतो; तर तुम्ही मला असं म्हणाल का की, 'दाभोलकर तुम्ही असं ठामपणे कसं म्हणता ?' *वैज्ञानिक दृष्टिकोन याचा अर्थ कार्यकारणभाव जाणणं, चमत्कार याचा अर्थ काय, तर कार्यकारण- भावाचा अभाव.* म्हणजे एखादा जादूगार रिकामी हॅट दाखवतो आणि त्यातून जिवंत ससा काढतो. किंवा एखादा बाबा रिकामा हात दाखवतो आणि त्यातून अंगारा काढतो. पण तुम्ही कार्यक्रम संपल्यानंतर जाऊन जादूगाराचे पाय धरत म्हणता का की, 'तुम्ही रिकाम्या हॅटमधून ससा काढलात, आत्ता रिकाम्या हॅटमधनं माझ्या उद्याच्या परीक्षेची प्रश्नपत्रिकापण काढून द्या.' तुम्ही असं करत नाही, कारण तो बिचारा जादूगार पोटार्थी कलाकार असतो आणि बाबाचा चमत्कार हा दैवी शक्तीचा आविष्कार असतो असे तुम्ही मानता. असो. तर ही गोष्ट खरीच आहे की, *आत्तापर्यंत कोणीही चमत्कार सिद्ध केलेला नाही. याचं कारण तुम्हाला माहिती आहे का? चमत्कार सिद्ध होणं ही कल्पनाच मुळात अंतर्विसंगत आहे. चमत्कार सिद्ध होणं म्हणजे काय माहितीये? एक गोष्ट तुम्हाला कधीच करता येणार नाही, कारण ती तुम्ही केलीत तर चमत्कार ठरेल. ती म्हणजे, तुम्ही किती वाजता गाढ झोपी गेलात, हे स्वतःच्याच हातांनी लिहून ठेवणं. तुम्ही जर ते स्वतःच्या हातांनी लिहून ठेवलंत, तर त्याचा अर्थ तुम्ही गाढ झोपी गेलेले नव्हता आणि गाढ झोपी गेलेले असाल तर स्वतः लिहून ठेवू शकत नाही. तसं चमत्कारांचं आहे. आपल्याकडे लोकांना संतांच्या चमत्कारांचं फार कौतुक आहे आणि त्याबद्दल बोललेलं त्यांना आवडत नाही.*_
_माझं सोडा, तुकडोजी महाराज यांचं नाव एका विद्यापीठाला दिलंय. तुकडोजी काय म्हणतात, ते पाहा-
*_'चमत्काराच्या भरी भरोनी। झाल्या अनेकांच्या धूळदाणी।।_*
*_संत चमत्कार यापुढे कोणी। नका वर्ण सज्जनहो।।_*
*_लोकांचिया ओळखून भावा। अनेक दांभिक येती गावा।।_*
_लुटति जनास ढोंगी बाबा। मागे लागूनिया।।'_
_आणि मग लोक काय करतात ?_
*_'प्रयत्नाचा मार्ग सोडति । अल्पसायासे लाभ इच्छति।।_*
*_चमत्काराच्या थापेत जाति । गारुडीयांच्या।।'_*
_*म्हणजे चमत्कार लोकांना प्रयत्नवादापासून परावृत्त करतात, ही त्यांची अधिक घातक बाजू आहे.*_
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संकलन - महेश कांबळे_*
*_दिनांक :- ०३/०१/२०२४_*
*_संदर्भ :-_*
*_१) प्रश्न तुमचा, उत्तर दाभोलकरांचे (मुलाखत - विनोद शिरसाठ दिनांक ०८/०४/२०१३)_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2024/01/blog-post_45.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment