_*प्रश्न ७ :* पण आपणा सर्वांना हे माहितीये की, *महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत असे काही बाबा आणि बुवा आहेत, जे चमत्कार केल्याचा दावा करतात. त्यांचे काही कार्यकर्ते किंवा भक्त 'होय, आम्ही चमत्कार पाहिलाय', असाही दावा करतात. असं जर आव्हान कोणी तुमच्यासमोर ठेवलं, तर ते तुम्ही स्वीकाराल का ?*_
_*उत्तर :* तुम्हाला हे माहीत असेलच, *एक महाराज असा दावा करायचे की, 'मी अमुक अमुक एवढे चमत्कार करतो.' त्यांच्या लीलामृतात ते लिहिलेलं होतं. त्या महाराजांचं नाव मी एवढ्यासाठी घेत नाही की, त्यांचं नाव घ्यायचं म्हणजे मला माझंच नाव घ्यावं लागतं. तर मी त्या महाराजांच्याकडे नाणीजला गेलो. त्यांची-माझी आमने-सामने चर्चा झाली, त्या चर्चेची २० मिनिटांची चित्रफीत उपलब्ध आहे. 'कोणताही चमत्कार मला येत नाही' असं त्यांनी त्या चर्चेत कबूल केलं आहे.*_
_चमत्कार करण्यासाठी जो माणूस तयार असेल, त्याला आमचं २१ लाख रुपयांचं आव्हान आहे असं मी एके ठिकाणी बोललो. तर एक पत्रकार उठले आणि म्हणाले, 'तुमच्याकडे खरंच २१ लाख रुपये आहेत का?' तुम्ही का हसलात? *तुम्हाला वाटलं असणार, 'फाटका माणूस आहे, याच्याकडे कुठून २१ लाख रुपये असणार!' वस्तुस्थिती अशी आहे की, ज्या वेळी चमत्कार सिद्ध करण्याचं आव्हान आम्ही दिलं होतं, त्या वेळी ते एक लाख रुपयांचं होतं, पण आमच्याकडे एक लाख रुपयेही नव्हते. त्यामुळे जर कोणी आव्हान स्वीकारलं, तर दाभोलकर त्यांचं स्वतःचं घर बँकेकडे गहाण टाकायचे. बँक सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट द्यायची की, 'दाभोलकरांच्या घराची किंमत एक लाख रुपये आहे. संबंधितांनी चमत्कार केला, तर घर ताब्यात घेऊन त्याला एक लाख रुपये देऊ.'*_
_*नंतर जसजशी चळवळीची ताकद वाढली, तसं ते आव्हान आधी पाच लाखाचं झालं, मग ११ लाखाचं झालं. आता चळवळीचं ते आव्हान २१ लाख रुपयांचं आहे, परंतु आत्तापर्यंत एकाही माणसाने ते आव्हान पेललेलं नाही.*_
_*त्यासाठी आमची एक समिती आहे. तिच्यात प्रतापराव पवार, एन.डी.पाटील, ज्येष्ठ शास्त्रज्ञ वसंत गोवारीकर आणि ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू आहेत. त्यांच्यापर्यंत जाण्याची मला आजवर कधी तसदी पडलेली नाही. ज्यांनी ते आव्हान स्वीकारलं ते-ते सगळे पराभूत झालेले आहेत. तेव्हा ज्या-ज्या बाबाबुवांना २१ लाख रुपये पाहिजे असतील, त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे की, त्यांनी या मुलाखतीची सीडी बघितल्यानंतर चमत्कार करायला जरूर पुढे यावं.*_
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संकलन - महेश कांबळे_*
*_दिनांक :- ०४/०१/२०२४_*
*_संदर्भ :-_*
*_१) प्रश्न तुमचा, उत्तर दाभोलकरांचे (मुलाखत - विनोद शिरसाठ दिनांक ०८/०४/२०१३)_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2024/01/blog-post_4.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment