Tuesday, 12 December 2023

चार महाप्रदेशकथा

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_चतुमहापदेसकथा_*

*_चार महाप्रदेशकथा_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

_भंडग्राममध्ये राहिल्यानंतर तथागत आयुष्यमान आनंदला म्हणाले, "चल आनंद! आपण हस्तिग्रामला जाऊ, तेथून आम्रग्राम, जम्बूग्राम करीत करीत भोगनगरला जाऊ."_

_"होय भंते!" असे आयुष्यमान आनंदने उत्तर दिल्यानंतर तथागत भिक्षु महासंघासह भोगनगरला गेले._

_भोगनगरच्या आनंद-चैत्यामध्ये राहत असताना *भगवान भिक्षूंना म्हणाले, "भिक्षूंनो ! मी तुम्हांला धम्माच्या चार कसोट्या कथन करतो. त्या तुम्ही ध्यानात ठेवा."*_

_"होय भंते!" असे उत्तर आल्यानंतर सुगत म्हणाले._

_*१._ हे भिक्षूंनो! यदाकदाचित एखादा भिक्षु असे म्हणाला, "आयुष्यमानांनो, हे मी भगवंतांच्या तोंडून ऐकले आहे, त्यांनी असेच सांगितले होते. हा धम्म आहे, हा विनय आहे, हा तथागतांचा उपदेश आहे. तर त्या भिक्षूच्या बोलण्यास दुजोरा देऊ नका. किंवा त्याची निंदादेखील करू नका. तो *सांगत असलेल्या उपदेशाला व्यवस्थित ऐका. माझ्या धम्म सुत्ता (गाथा) बरोबर त्याची तुलना करा. विनयाबरोबर त्याला मोजा; पारखा. जर तो उपदेश मी सांगितलेल्या धम्म उपदेशाबरोबर मेळ खात नसेल, मी सांगितलेल्या विनयासह त्याचा ताळमेळ जमत नसेल, एका सूत्रात जर दोन्ही बसत नसतील तर विश्वास ठेवू नका. निश्चित समजा की, मी सांगितलेला तो धम्म नव्हे. ते तथागताचे वचन नव्हे.*तो विचार, तो धम्म त्या भिक्षुने स्वतः रचलेला अथवा माझ्या नावाने सांगितलेला तो अधम्म असेल. सद्धम्म नव्हे.* असा प्रसंग आल्यास त्या भिक्षुला क्षमा करा. त्याला सोडून द्या. परंतु *माझ्या उपदेशाची तुलना केल्यानंतर तो धम्माशी, विनयाशी, (गाथेशी) तंतोतंत जुळत असेल तर, विश्वास ठेवा की, तो भगवंतांनी सांगितलेला खरा धम्म आहे.* तर भिक्षूंनो! *ही माझ्या धम्माची पहिली कसोटी आहे."*_

_*२.* "आणि पुन्हा भिक्षूनो! जर एखादा भिक्षू असे म्हणत असेल, "आयुष्यमानांनो, *अमुक एका ठिकाणी स्थविरयुक्त भिक्षुसंघाचा प्रमुख भिक्षू राहत आहे.* त्या प्रमुख भिक्षूच्या तोंडून मी असे ऐकले आहे. त्यांनी असेच सांगितले होते. हा धम्म आहे, हा विनय आहे, हा तथागतांचा उपदेश आहे. तर त्या भिक्षुच्या बोलण्यास दुजोरा देऊ नका किंवा त्याची निंदादेखील करू नका. तो सांगत असलेल्या उपदेशाला व्यवस्थित ऐका. माझ्या धम्म सुत्ता (गाथा) बरोबर त्याची तुलना करा. विनयाबरोबर त्याला मोजा; पारखा . जर तो उपदेश मी सांगितलेल्या धम्म उपदेशाबरोबर मेळ खात नसेल, मी सांगितलेल्या विनयासह त्याचा ताळमेळ जमत नसेल, एका सूत्रात जर दोन्ही बसत नसतील, तर विश्वास ठेवा, निश्चित समजा की, मी सांगितलेला तो धम्म नव्हे. ते तथागताचे वचन नव्हे. तो विचार, तो धम्म त्या भिक्षूने स्वतः रचलेला अथवा माझ्या नावाने सांगितलेला तो अधम्म असेल. सद्धम्म नव्हे. असा प्रसंग आल्यास त्या भिक्षुला क्षमा करा. त्याला सोडून द्या; परंतु *माझ्या उपदेशाची तुलना केल्यानंतर तो धम्माशी, विनयाशी, (गाथेशी) तंतोतंत जुळत असेल तर, विश्वास ठेवा की, तो भगवंतांनी सांगितलेला खरा धम्म आहे.* तर भिक्षूनो ! *ही माझ्या धम्माची दुसरी कसोटी आहे.*_

_*३.* तसेच भिक्षूंनो ! जर कोणी भिक्षु असे म्हणत असेल, "हे आयुष्यमानांनो ! *अमुक एका विहारामध्ये खूप ज्ञानी, धर्मधर, विनयशील, अभिधम्माचे सखोल ज्ञान असलेला भिक्षु राहत आहे. मी त्या महास्थविर (प्रमुख भिक्षु) यांच्या मुखातून असे ऐकले आहे.* त्यांनी असेच सांगितले होते. हा धम्म आहे, हा विनय आहे, हा तथागतांचा उपदेश आहे. तर त्या भिक्षूच्या बोलण्यास दुजोरा देऊ नका किंवा त्याची निंदादेखील करू नका. तो सांगत असलेल्या उपदेशाला व्यवस्थित ऐका. माझ्या धम्म सुत्ता (गाथा) बरोबर त्याची तुलना करा. विनयाबरोबर त्याला मोजा; पारखा. जर तो उपदेश मी सांगितलेल्या धम्म उपदेशाबरोबर मेळ खात नसेल, मी सांगितलेल्या विनयासह त्याचा ताळमेळ जमत नसेल, एका सूत्रात जर दोन्ही बसत नसतील तर विश्वास ठेवा, निश्चित समजा की, मी सांगितलेला तो धम्म नव्हे. ते तथागताचे वचन नव्हे. तो विचार, तो धम्म त्या भिक्षूने स्वतः रचलेला अथवा माझ्या नावाने सांगितलेला तो अधम्म असेल. सद्धम्म नव्हे. असा प्रसंग आल्यास त्या भिक्षुला क्षमा करा. त्याला सोडून द्या; परंतु *माझ्या उपदेशाची तुलना केल्यानंतर तो धम्माशी, विनयाशी, (गाथेशी) तंतोतंत असेल तर, विश्वास ठेवा की, तो भगवंतांनी सांगितलेला खरा धम्म आहे. तर भिक्षूनो! ही माझ्या धम्माची तिसरी कसोटी आहे."*_

_*४.* "तर भिक्षूनो ! जर कोणी भिक्षू असे म्हणत असेल, "हे आयुष्यमानांनो! *अमुक एका विहारात एक धम्मज्ञानी राहत आहे. मी त्या धम्मज्ञानी माणसाकडून प्रत्यक्ष असे ऐकले आहे. त्यांनी असेच सांगितले होते. हा धम्म आहे, हा विनय आहे, हा तथागतांचा उपदेश आहे.* तर त्या भिक्षूच्या बोलण्यास दुजोरा देऊ नका. किंवा त्याची निंदादेखील करू नका. तो सांगत असलेल्या उपदेशाला व्यवस्थित ऐका. माझ्या धम्म सुत्ता (गाथा) बरोबर त्याची तुलना करा. विनयाबरोबर त्याला मोजा; पारखा. जर तो उपदेश मी सांगितलेल्या धम्म उपदेशाबरोबर मेळ नसेल, मी सांगितलेल्या विनयासह त्याचा ताळमेळ जमत नसेल, एका सूत्रात जर दोन्ही बसत नसतील तर विश्वास ठेवा, निश्चित समजा की, मी सांगितलेला तो धम्म नव्हे. ते तथागताचे वचन नव्हे. तो विचार, तो धम्म त्या भिक्षूने स्वतः रचलेला अथवा माझ्या नावाने सांगितलेला तो अधम्म असेल. सत्धम्म नव्हे. असा प्रसंग आल्यास त्या भिक्षुला क्षमा करा. त्याला सोडून द्या. परंतु *माझ्या उपदेशाची तुलना केल्यानंतर तो धम्माशी, विनयाशी, (गाथेशी) तंतोतंत जुळत असेल तर, विश्वास ठेवा की, तो भगवंतांनी सांगितलेला खरा धम्म आहे. तर भिक्षूनो ! ही माझ्या धम्माची चौथी कसोटी आहे."*_

_भोगनगर येथील *आनंद-चैत्य विहारात असताना तथागत सदैव हाच धम्म उपदेश देत असत. "हे शील आहे, ही समाधी आहे, ही प्रज्ञा आहे, तसेच सर्व प्रकारच्या मुक्तता या धम्माचे ज्ञान प्राप्त केले आहे. बुद्धाने त्यांना ओळखूनच भिक्षूंना धम्माचा उपदेश केला आहे. दुःखाचा अंत करणाऱ्या बुद्धाने दिव्यचक्षु प्राप्त केला आहे."*_

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- १२/१२/२०२३_*

*_संदर्भ :-_*

*_१) महापरिनिब्बानसुत्त (मराठी अनुवादासह - संपादक आयु अरविंद भंडारे_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2023/12/blog-post_12.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...