Tuesday, 1 March 2022

होळी

 होळी 

राजेश चन्द्रा ( हिंदी )

अरविंद भंडारे ( मराठी  अनुवाद )


भगवान बुद्धांच्या काळातसुध्दा आजच्या होळी सारखाच एक उत्सव होता. ज्या मध्ये आठवडाभर लोक एकमेकांवर चिखल, शेण, रंग फेकत असत व एकमेकांना अपशब्द बोलत असत. 


हा प्रसंग *खुद्दक निकायातील धम्मपद अठ्ठकथेतील अप्पमाद* वग्गात आहे.


तथागत कोशल देशाची राजधानी श्रावस्तीच्या जेतवनात विहार करत होते. ह्या उत्सवामुळे श्रध्दाळू उपासकांनी धम्म सेवा म्हणून संघासाठी भोजन दानाची व्यवस्था केली. 

एक आठवड्यानंतर तथागत संघासोबत पिण्डपातासाठी जेतवन विहारातून बाहेर पडले. त्यासमयी उपासकांनी बुद्ध आणि संघाला महादान करून पुण्यलाभाची प्राप्ती केली. 

ह्या समयी उपासकांनी आपली व्यथा तथागतांना सांगितली. की हे सात दिवस आमच्या साठी खूप कष्टमय होते. मुर्खांव्दारे असभ्य अपशब्द ऐकून ऐकून आमचे कान फाटले. त्यांना कोणाचीही लाज अथवा संकोच नव्हता. म्हणूनच आपणाला आम्ही लोकांनी नगरात न येण्याविषयी याचना केली. 


तथागतांनी उपासकांचे अनुमोदन करताना म्हटले


मुर्खांचे कर्म असेच असतात. 

जे ज्ञानी ( मेधावी ) असतात ते अप्रमादाचे रक्षण करतात. 


हे बोलून तथागतांनी पुढील गाथा म्हटली 


*पमादमनुयंजन्ति बाला दुम्मेधिनो जना ।*

*अप्पमाद च मेधावी,धनं सेट्ठं व रक्खति ।*


मुर्ख दुर्बुध्दी प्रमाद करतात। 

मेधावी ( ज्ञानी ) श्रेष्ठ धनाची रक्षा करावी त्याप्रमाणे अप्रमादाचे रक्षण करतात. 


ह्या प्रमाणे वर्तमानात प्रचलित होळीला बौद्धांनी साजरे करणे चेष्टाच म्हटली जाईल. 


फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी तथागत कपिलवस्तुला आले होते. ह्याच पौर्णिमेला राहुल व नंद ची प्रवज्जा झाली. ह्याच पौर्णिमेला आनंद व महाप्रजापती गौतमी ची सुध्दा प्रवज्जा झाली. ह्याच पौर्णिमेला सन ८२३ मध्ये पहिल्यांदा धम्मपदाचा चिनी भाषेत अनुवाद झाला होता. 


ह्या पौर्णिमेला बौद्ध जगतातील अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या आहेत. ह्या दिवशी उपासकांनी उपोसथ धारण करावयाचे असते. 


जय भिम नमो बुध्दाय🙏🏻


पालि शब्द व त्याचे अर्थ 


पमाद - अतिउत्साह, असावधानी, बेफिकरी.


पिण्डपात - भिक्षाटन. 


बाला - मुर्ख.


मेधावी - ज्ञानी.

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...