☘️🌿🌼🌷☘️🌿🌼🌷☘️🌿🌼
*_पंच चक्षु_*
☘️🌿🌼🌷☘️🌿🌼🌷☘️🌿🌼
_*भगवान बुद्धांना पाच प्रकारचा दृष्टीलाभ झाला होता किंवा त्यांना पंच चक्षु प्राप्त झाले होते. त्यांच्या मांस चक्षूंची* दृष्टी इतकी तीव्र - तेजस्वी होती की निरनिराळ्या बियाण्यांच्या ढिगाऱ्यात एखादे शिसम वृक्षाचे बीज टाकले असल्यास ते सुद्धा त्यांच्या दृष्टीस पडत असे._
_त्यांच्या *प्रज्ञा चक्षुने* ते व्यक्तीची गती ओळखीत असत. व्यक्तीचे गुण-दोष, पाप - पुण्य जाणत असत. त्यांची दृष्टी अमर्याद आणि अनंत होती._
_निर्वाणाकडे जाणारा मार्ग प्रज्ञेने त्यांनी जाणला म्हणून ते *प्रज्ञा चक्षु* आहेत. अतीत, वर्तमान आणि अनागत काळातील प्रत्येक वस्तू त्यांच्या दृष्टीच्या, ज्ञानाच्या आवाक्यात होती._
_*बुद्ध चक्षूं द्वारा* ते बुद्धिमान किंवा कमी बुद्धीचे, थोडेसे किंवा जादा अशुद्ध, तेजस्वी अथवा मंद संस्कारांच्या सत्वांबद्दल, त्यांच्या आंतरिक जडणघडणीची माहिती घेवून त्या व्यक्तीला, त्याच्या कुवती प्रमाणे धम्म शिकवण देत असत._
_*समंत चक्षु अत्यंत तेजस्वी, अंतर्वेधी आणि सारिपूत्ता सारख्या प्रज्ञावंताला देखील मार्गदर्शन करू शकतील असे, आकाशात विचरणाऱ्या विहंगाप्रमाणे, त्यांना हे चक्षु प्राप्त झाले होते.*_
_*सर्व काही पाहणाऱ्या त्यांच्या चक्षूंना सर्वज्ञ देखील म्हणतात. म्हणून बुद्धापासून काही लपून राहण्यासारखे नव्हते. काम, रूप आणि अरुप त्यांच्या ज्ञानाच्या कक्षेत येई. संस्कारित आणि असंस्कारित वस्तू ते जाणित. संस्कार, विकार, लक्खण, निब्बाण, पञ्ञति हे ज्ञानाचे पाच दृष्टिकोन ते जाणत.*_
☘️🌿🌼🌷☘️🌿🌼🌷☘️🌿🌼
*संदर्भ : बौद्ध पौर्णिमा*
*संकलन : महेश कांबळे*
*०३/१०/२०२१*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
☘️🌿🌼🌷☘️🌿🌼🌷☘️🌿🌼
No comments:
Post a Comment