________________________________________________
*_धम्मपद_*
*_४ पुप्फवग्गो_*
________________________________________________
*_को इमं पठविं विजेस्सति यमलोकञ्च इमं सदेवकं ।_*
*_को धम्मपदं सुदेसितं कुसलो पुप्फमिव पचेस्सति ।।१।।_*
*_यमलोक आणि पृथ्वीला देवलोकांसह कोण जिंकेल?,_*
*_कोण चतुर या सिद्धांताना / धम्मपदांना फुलांसारखे सुंदर तयार करीत?. ।।१।।_*
*_सेखो पठविं विजेस्सति यमलोकञ्च इमं सदेवकं ।_*
*_सेखो धम्मपदं सुदेसितं कुसलो पुप्फमिव पचेस्सति ।।२।।_*
*_प्रज्ञेचा शिष्य यमलोक आणि पृथ्वीला देवलोकांसह जिंकेल,_*
*_प्रज्ञेचा चतुर शिष्य या सिद्धांतांना / धम्मपदांना फुलांसारखे
सुंदर तयार करील? ।।२।।_*
*_फेणूपमं कायमिमं विदित्वा मरीचिधम्मं अभिसम्बुधानो ।_*
*_छेत्वान मारस्स पपुप्फकानि अदस्सनं मच्चुराजस्स गच्छे।।३।।_*
*_शरीर हे फेसा सारखे, मृगजळासारखे समजून, पूर्ण ज्ञानी व्हावे,_*
*_भुलैयाला फुलासारखे तोडून, मृत्यूस अदृश्य व्हावे।।३।।_*
*_पुप्फानि हेव पचिनन्तं व्यासत्तमनसं नरं ।_*
*_सुत्तं गामं महोघो'व मच्चु आदाय गच्छति ।।४।।_*
*_फुले वेचण्यात मनस्वी मग्न मानवास,_*
*_झोपलेल्या गावाला नदी-पुराने वाहुन न्यावे, तसे घेवुन जातो. ।।४।।_*
*_पुप्फानि हेव पचिनन्तं व्यासत्तमनसं नरं ।_*
*_अतित्तं येव कामेसु अन्तको कुरते वसं ।।५।।_*
*_फुले वेचण्यात मनस्वी मग्न मानवास,_*
*_वासनांच्या अतृप्तीतच अंत / मृत्यू वश करतो. ।।५।।_*
*_यथापि भमरो पुप्फं वण्णगन्ध अहेठ्यं ।_*
*_पलेति रसमादाय एवं गामे मुनी चरे ।।६।।_*
*_जसे भ्रमर फुलाच्या रंग-गंधाला त्रास न देता,_*
*_रस घेवुन जातो, तसे मुनीने /
सुजनाने गावात वावरावे. ।।६।।_*
*_न परेसं विलोमानि न परेसं कताकतं ।_*
*_अत्तनो'व अवक्खेय्य कतानि अकतानि च ।।७।।_*
*_दुसऱ्यांच्या विरोधात, दुसऱ्यांचे कृत्य-अकृत्य न पाहता,_*
*_फक्त स्वतःचे कृत्य-अकृत्य पहावे. ।।७।।_*
*_यथापि रुचिरं पुप्फं वण्णवन्तं अगन्धकं ।_*
*_एवं सुभासिता वाचा अफला होति अकुब्बतो ।।८।।_*
*_जसे सुंदर रंगीत फुल सुगंधा विना व्यर्थ असते,_*
*_तसे कृती विना गोड बोलणे व्यर्थ होते. ।।८।।_*
*_यथापि रुचिरं पुप्फं वण्णवन्तं सगन्धकं ।_*
*_एवं सुभासिता वाचा अफला होति सकुब्बतो ।।९।।_*
*_जसे सुंदर, रंगीत फुल सुगंधामुळे सार्थ होते,_*
*_तसे सत्कृत्यामुळे गोड बोलणे सार्थ होते. ।।९।।_*
*_यथापि पुप्फरासिम्हा कयिरा मालागुणे बहु ।_*
*_एवं जातेन मच्चेन कत्तब्बं कुसलं बहु ।।१०।।_*
*_जसे फुलांच्या राशींमधुन अनेक माळा करतात,_*
*_तसे जन्मलेल्या मर्त्याने / मानवाने अनेक सत्कृत्य करावी. ।।१०।।_*
*_न पुप्फगन्धो पटिवातमेति न चन्दनं तगरमल्लिका वा ।_*
*_सतञ्च गन्धो पटिवातमेति सब्बा दिसा सप्पुरिसो पवाति ।।११।।_*
*_चंदन, तगर-चमेली आदी फुलांचा गंध
वारा-विरोधी दिशेने वहात नसतो,_*
*_सुजनांचा गंध वारा-विरोधी दिशेने वाहतो, सर्व दिशांना पसरतो. ।।११।।_*
*_चन्दनं तगरं वापि उप्पलं अथ वस्सिकी ।_*
*_एतेसं गन्धजातानं सीलगन्धो अनुत्तरो ।।१२।।_*
*_चंदन, तगर-चमेली अथवा कमळाच्या गंधाहून,_*
*_सुशीलाचा / चांगल्या शीलाचा सुगंध श्रेष्ठ आहे. ।।१२।।_*
*_अप्पमत्तो अयं गन्धो या'यं तगरचन्दनी ।_*
*_यो च सीलवतं गन्धो याति देवेसु उत्तमो ।।१३।।_*
*_तगर-चंदनाचा हा गंध अत्यल्प आहे,_*
*_परंतु शीलवान माणसाचा गंध महाजनांपर्यंत / देवांपर्यंत जातो.
।।१३।।_*
*_तेसं सम्पन्नसीलानं अप्पमादविहारिन ।_*
*_सम्मदञ्ञाविमुत्तानं मारो मग्गं न विन्दति ।।१४।।_*
*_त्या शील संपन्न, अप्रमादात
राहणाऱ्या,_*
*_योग्य ज्ञानामुळे मुक्त मानवाचा मार्ग भुलैया अडवीत नाही. ।।१४।।_*
*_तथा सङकारधानस्मिं उज्झितस्मिं महापथे ।_*
*_पदुमं तत्थ जायेथ सुचिगन्धं मनोरमं ।।१५।।_*
*_जसे महामार्गावर टाकलेल्या कचऱ्यातून,_*
*_मनोहर सुगन्धि कमळ उगवते........... ।।१५।।_*
*_एवं सङकारभूतेसु अन्धभुते पुथुज्जने ।_*
*_अतिरोचति पञ्ञाय सम्मासम्बुद्धसावको ।।१६।।_*
*_तसेच कचऱ्यासमान, अज्ञानाने
अंधळ्यासमान सामान्य जनांत,_*
*_सम्यक संबुद्धाचे शिष्य प्रज्ञेने खूप चमकतात ।।१६।।_*
________________________________________________
*प्रतिज्ञा आपण करूया*
*१) जीवसृष्टी आहे असीम; ती भवसागरपार नेण्याची*
*२) आपणांत दोष असंख्य; ते नष्ट करण्याची*
*३) आहेत सत्य अनंत, पूर्ण आकलण्याची*
*४) भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग, तो संपूर्ण साध्य करण्याची*
*डॉ बाबासाहेब आंबेडकर*
*बुद्ध आणि त्याचा धम्म*
________________________________________________
*_सर्व प्राणी सुखी होवोत, सर्वांचे कल्याण होवो, सर्वांना हिताचा मार्ग सापडो, कोणालाही दुःख न होवो, सर्वांचे मंङ्गल हो!!_*
*_साधु साधु साधु_*
*महेश कांबळे*
________________________________________________