Tuesday, 25 May 2021

अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम - प्रश्न ८८

 *_प्रश्न ८८ – लहानपणापासनू आजूबाजूचे लोक सांगतात, "हेच तुझे वडील!" मी श्रद्धेने ते मानतो, याची चिकित्सा मी करावी का?_*


*उत्तर 👉*  अंधश्रद्धा निर्मुलनाच्या कामात हमखास विचारला जाणारा हा एक तिरकस प्रश्न. असा प्रश्न तावातावाने विचारणाऱ्या  एका वकील महोदयांना, 'तुमची दोन मुले तुमचीच कशावरुन' ? असा प्रतिप्रश्न विचारताच त्यांनी घाईघाईने काढता पाय घेतला होता.


         *खरे तर हा प्रश्न  विचारणे हे कोणत्याही स्त्रीच्या संदर्भात आणि आपल्या आई वा पत्नीच्या संदर्भात हिणकस, विकृत मनोवृत्ती प्रकट करणे आहे.* यांचा अपवाद वगळता सर्व स्त्रिया  या अव्यभिचारी निष्ठेने एकाच पुरुषाबरोबर म्हणजे आपल्या पतीबरोबर राहात असतात. त्यामुळे *आई ज्या पुरुषाबरोबर राहते ते माझे वडील आहेत हे प्रत्यक्ष पुराव्याने नसले तरी बळकट तर्कावर सिद्ध करता येते. (ज्ञानाच्या क्षेत्रात म्हणूनच सुसंगत तर्क आणि अनुमान यांना मोठे प्रामाण्य आहे.)*


           मात्र हा तर्क चिकित्सेला खुला असतो. समजा, मोठे झाल्यावर मुलाला समजले कि, आपल्याला अनाथ आश्रमातून संगोपनासाठी आणण्यात आले, तर ही गोष्ट तो अनाथाश्रमाच्या रेकॉडवरून तपासू शकतो आणि आपले लालन पालन करणारे माता-पिता आपले जन्मदाते नाहीत हे त्याला कळते. काही वेळा भाऊ वा बहीण वंध्यत्व असलेल्या आपल्या भावाला वा बहिणीला स्वत:चे मुल अगदी लहानपणापासून सांभाळावयास देतात. मुल मोठे झाल्यावर त्याला आपले जन्मदाते आई-बाप समजू शकतात. तेव्हा कोणत्याच पातळीवर हा प्रश्न श्रद्धेचा नाही. दुसऱ्या बाजूने आधुनिक अनुवंशिक शास्त्राच्या (Genetic Engineering) अंगाने विचार  केल्यास रंगसूत्राच्या तपासणीवरूनही आई वडीलांची शास्त्रीय खात्री येऊ शकेल.


         आपले आईवडील कोण हे सत्य कळूनही त्यामुळे आपणाला सांभाळणाऱ्या स्त्री - पुरुषावर आई वडीलांसमान प्रेम असणारे व्यक्तीचे प्रेम कमी होत नाही, कारण ते श्रद्धेवर अवलंबून नसनू प्रत्यक्ष व्यवहारात त्यांच्यापासनू जे प्रेम मिळते, त्या अनुभवाधिष्टीत विश्वासावर आधारित असते.


*डॉ. नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे*

*यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार*


https://mikamblemahesh.blogspot.com/

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...