➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*झेन
कथा – ध्यानमग्नता*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_*जपानी संस्कृतीतल्या १३व्या शतकात जपानी बौद्ध धर्मगुरू मुजु यांनी सांगितलेल्या
झेन कथा रोजच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलून टाकण्याची ताकद देतात. या
गोष्टींना तात्पर्य नसते. अत्यंत हलक्या फुलक्या आणि समजायला सोप्या असणार्या या
कथांतून आपण काय व कश्याप्रकारे घेतो हे आपल्यावर निर्भय आहे. अशीच एक झेन कथा.:-*_
_तिरंदाजीच्या अनेक स्पर्धा
जिंकल्यानंतर तरुण तिरंदाजाने गावातल्या एका नावाजलेल्या म्हाताऱ्या तीरंदाजाला
आव्हान दिले. तरुण तिरंदाजाने आपल्या कौशल्याचा एक उत्कृष्ट नमुना पेश केला. दूर
अंतरावर उभ्या असलेल्या झाडावर लटकत असलेल्या फळावर बाण मारला आणि त्या मारलेल्या
बाणाचा दुसऱ्या बाणाने वेध घेतला आणि तो बाण दोन भागात छेदला. त्याने म्हाताऱ्या
तिरंदाजाला सांगितले, “हे बघ, तू असं करू शकतोस?”_
_विचलित न होता म्हातारा बघत राहिला. त्याने तरुणाला
त्याच्या मागे यायला सांगितले. ते दोघे पहाडाचा प्रचंड चढ चढून वर निबिड जंगलात
गेले. त्या पहाडाच्या टोकावर दुसऱ्या पहाडाकडे जाण्यासाठी एक बांबूचा मोडका
डुगडूगता पूल होता. त्याच्या खाली प्रचंड खोल दरी होती. ती पाहून तरुणाला भोवळ
आली. म्हातारा मोडक्या पुलाच्या मध्यभागी जाऊन उभा राहिला आणि पलीकडे लांबवर
असलेल्या झाडाच्या फळाला निशाना बनवत त्याने तीर मारला. तो निशाण्यावर लागला.
म्हातारा हळुवार सुरक्षित जागेत येत तरुणाला म्हणाला, “आता तुझी पाली.”_
_तरुण प्रचंड भीतीने जेमतेम पुलावर चढला. चालत त्यानं
थोडं अंतर पार केलं. त्याला पायाखालील जमिनीचे नाहीसे झालेले अस्तित्व जाणवले आणि
तीर मारताच तो जमिनीवर परतला. त्याचा नेम चुकला. आपल्याला आव्हान देणाऱ्या तरुणाची
भांबावलेली अवस्था म्हाताऱ्याच्या लक्षात आली. तो त्याला समजावत म्हणाला, “तुझं
तीर चालवण्याचं कौशल्य खूप सशक्त आहे; मात्र मनावरच्या पकडीच कौशल्य कमजोर आहे,
म्हणूनच तुझा नेम चुकला.”_
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संदर्भ: - झेनकथा*
*संकलन :- महेश कांबळे*
*०३/०२/२०२१*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
No comments:
Post a Comment