Monday, 21 December 2020

अभया

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *२७ अभया* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ _उज्जैनी नगरीत इका उच्च कुळांत हिचा जन्म झाला होता. हि अभयमातेची मैत्रीण होती. अभय मातेसोबत हि पण प्रव्राजित झाली होती. राजगृहात राहत असताना एके दिवशी अशुभ भावनेकरिता जंगलात गेली. भगवंतांचा उपदेश ऐकून तिला अर्हत्वपद प्राप्त झाले. तेव्हापासून ती खालील गाथा वारंवार म्हणू लागली. :-_ *_”अभये! हा देह भग्न होणारा आहे, असे असूनसुद्धा येथे अज्ञानी लोक आसक्त आहेत. संपूर्ण जाणीव ठेवून व स्मृतीमान होऊन मी हा देह सोडीन.”!!३५!!_* *_मी पुष्कळ दुःखद गोष्टीशी सामना करीत दक्ष राहून तृष्णेचा नाश केला आणि भगवान बुद्धांच्या शासनाप्रमाणे आचरण केले.!!३६!!_* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *संदर्भ: - थेरिगाथा* *संकलन :- महेश कांबळे* *२२/१२/२०२०* https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...