Thursday, 24 December 2020

उत्तमा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *३० उत्तमा* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ _श्रावास्तीच्या एका श्रीमंत व्यापार्याच्या घरी हिचा जन्म झाला होता. पटाचारा भिक्खुनिचा उपदेश ऐकून हिने प्रव्रज्या घेतली. परंतु बरेच दिवस झाले तरी परमज्ञानाची प्राप्ती करणे तिला शक्य झाले नाही. पटाचारेने तिच्या चित्ताची अवस्था पाहून विशेष उपदेश केला. तो उपदेश ऐकून उत्तमा परिश्रमपुर्वक साधना करू लागली. त्यामुळे तिला परमज्ञानाचा साक्षात्कार झाला. ज्ञानप्राप्तीने आनंदित होऊन ती खालील गाथा वारंवार म्हणू लागली.:-_ *_चार पाच वेळा चित्तशांतीसाठी विहारातून बाहेर पडले. परंतु चित्त ताब्यात नसल्यामुळे चित्तशांती मिळाली नाही. !!४२!!_* *_जी माझी श्रद्देया होती त्या भिक्खुनिकडे मी गेले. तिने मला स्कंध, आयतन व धातू यांचा उपदेश दिला. !!४३!!_* *_तिने मला जसा उपदेश केला, तसा तिचा धम्म ऐकून मी एक आठवडा एकाच आसनावर बसून ध्यानाच्या आनंदाचा घेऊ लागले. आठव्या दिवशी मी पाय पसरले तेव्हा माझा अज्ञानांधकार नष्ट झाला होता. !!४४!!_* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *संदर्भ: - थेरिगाथा* *संकलन :- महेश कांबळे* *२५/१२/२०२०* https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...