➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*_नीचाची संगत करू नये_*
*_(गोध जातककथा)_*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_एका जन्मी बोधिसत्त्व घोरपडीच्या कुळांत जन्मला होता. त्याच्या मुलाची सरड्याबरोबर मैत्री जमली, त्यांची मैत्री इतकी घट्ट झाली की, उठल्या सुटल्या बोधिसत्त्वाचा मुलगा सारड्यापाशी जाऊ लागला. जेव्हा बोधिसत्त्वाने हे पाहिले तेव्हा तो आपल्या मुलाला म्हणाला, "सरड्याचा आणू आपला संबंध शोभत नाही, अशा नीच प्राण्याशी संगती केली असता त्याचे परिणाम भयंकर होत असतात. तेव्हा आम्हा सर्वांच्या हितासाठी तू त्या हलकटाची संगती सोडून दे."_
_परंतु बोधिस्तवाच्या मुलाने वडिलांचे न ऐकता सरड्याबरोबर असलेली मैत्री तोडली नाही आणि त्यावर आपला सर्व विश्वास टाकला; त्याने आपल्या बिलाची सर्व माहिती त्याला सांगितली. आणि तो त्याच्या सहवासात खूपच आनंद मानू लागला. लहान असताना ही दोघे जवळजवळ सारखेचग हिते; परंतु दिवसेंदिवस हा सर्फयाच्या चौपट दसपट वाढत गेला. ते पाहून सरडा त्याचा मनातल्या नात फार मत्सर करू लागला. मी आहे तेवढा आहे आणि हा मात्र आयत्या पिठावर रेघा ओढणाऱ्या श्रीमंत बापाच्या पोराप्रमाणे एकसारखा फुगत चालला आहे! असे वाटून सरड्याचे चित्त झुरणीस लागले._
_एके दुवशी एक पारधी हातात कुदळ घरून पुष्कळ कुत्रांसह घोरपडीची शिकार करण्यासाठी त्या जंगलात फ़िरत होता. त्याला पाहून सरडा म्हणाला, "तुम्ही कुदळ आणि कुत्रे घेऊन कोठे जाता?"_
_पारधी म्हणाला, "घोरपडीची शिकार करण्यासाठी मी या जंगलात आलो आहे."_
_सरडा म्हणाला, "तुमचे कुत्रे मला काही इजा करणार नसेल तर मी तुम्हाला एक मोठे बिल दाखवतो."_
_पारध्याने सरड्याला आश्वासन दिले आणि सरड्याने दाखवून दिलेल्या बिळाच्या तोंडावर पाचोळा गोळा करून आग लावली आणि धुरामुळे घोरपडी गुदमरून जातील असे केले. बिचाऱ्या घोरपडी आपला जीव वाचविण्यासाठी बिळाच्या दुसऱ्या तोंडावाटे बाहेर पडू लागल्या. कित्येकीला पारध्याने तर उरलेल्यांना कुत्र्यांनी पकडले. बोधिसत्त्व आणि त्याचे काही मित्र पारध्याच्या आणि कुत्रांच्या हाती लागले नाही. सगळ्या घोरपडी मेल्या असे वाटून पारधी आपले कुत्रे आणि मिळालेली शिकार घेऊन घरी गेला. तेव्हा बोधिसत्त्व बिळाच्या बाहेर येऊन आपल्या मित्रांना म्हणाला, "मित्रांनो, आपण आत्ता हिते सुरक्षित नाही. माझ्या मुलाने सरड्याची संगती केली, तेव्हा आपण येथे न राहता दुसरीकडे जायला पाहिजे. *का की, कुळांतील एकाने दुष्टाची संगति केली म्हणजे त्या सर्व कुळांवर संकट ओढवल्या वाचून राहात नाही."*_
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संदर्भ : - जातक कथा संग्रह*
*संकलन :- महेश कांबळे*
*०७/१२/२०२०*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
No comments:
Post a Comment