Monday, 14 December 2020

अभिरूपा नंदा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *१९ अभिरूपा नंदा* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ _अभिरूपा नंदाचा कपिलवस्तू नगरातील खेमक नावच्या एका क्षत्रीय कुटुंबात जन्म झाला. तिचे नाव नंदा ठेवण्यात आले परंतु अतिशय रूपवान असल्यामुळे अभिरूपा हे विशेषण तिच्या नावाबरोबर जोडण्यात आले. ती वयात आल्यावर चरभूत नावाच्या एका शाक्य कुमाराबरोबर तिचे लग्न ठरले. परंतु लग्नाच्या दिवशीच तो मरण पावला. त्यामुळे आईवडिलांनी तिची इछा नसतानासुद्धा तिला प्रव्रजित केले. संघात प्रवेश घेतल्यानंतरही तिचा सौंदर्याचा गर्व नाहीसा झाला नाही. ती आपले सौंदर्य पाहून आनंदित होत असे, आणि तिला त्याचा अभिमान वाटत असे. भगवान बुद्ध रूपसौंदर्याचा दुष्पपरिणाम दाखवतात म्हणून ती त्यांच्याकडे जात नसे. ती ज्ञान प्राप्त करून घेण्यास पात्र आहे हे जाणून भगवान बुद्धाने महापजापती गोतमीला सर्व भिक्खुंनींना क्रमाक्रमाने उपदेश ग्रहण करण्यास पाठविण्यास सांगितले. परंतु जेव्हा नंदाचा क्रम आला तेव्हा तिने आपली प्रतींनिधी म्हणून दुसर्‍याच भिक्खुणीला पाठवले. त्यावर भगवंत म्हणाले, “स्वतःचा क्रम आल्यावर स्वतःच आले पाहिजे. दुसर्‍या भिक्खुणीला पाठवू नये.” यावेळी मात्र ती तथागतांच्या बोलण्याप्रमाणे इतर भिक्खुंनिंप्रमाणे भगवंतांकडे गेली. भगवंतांनी आपल्या अलौकिक योग सामर्थ्याने एका अतिशय सुंदर स्त्रीचे दर्शन तिला घडवले त्यानंतर एका स्त्रीची म्हातारपणाची अवस्था दाखविली. तेव्हा नंदामध्ये विरक्ती उत्पन्न झाली. भगवंतांनी तिला दोन गाथा सांगितल्या. दुसरी गाथा ऐकल्यावर तिला अर्हत्व प्राप्त झाले. ह्या दोन्ही गाथा ती वारंवार म्हणत असे :-_ *_नंदा ! व्याधिग्रस्त, अशुद्ध आणि दुर्गंधयुक्त असे हे शरीर पहा. एकाग्र व समाधीयुक्त चित्ताने शरीरातील अशुभाची भावना कर !!१९!!_* *_अहंकाररूपी मळ नष्ट कर, संस्कार निमित्तापासून मुक्त असे जे अनिमित्त निब्बाण आहे त्याची भावना कर. अहंकार नष्ट झाल्यावर तू शांत व निर्मल चित्त होऊन विचरण करशील !!२०!!_* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *संदर्भ: - थेरिगाथा* *संकलन :- महेश कांबळे* *१४/१२/२०२०* https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1

No comments:

Post a Comment

योग

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_योग_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_19.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 _भगवंतांनी संबोधी मार्गा...