Thursday, 31 December 2020

सोमा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *३६ सोमा* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ _हि थेरी राजगृह नगरीतील बिंबिसार राजाच्या पुरोहिताची मुलगी होती. भगवंतांनी राजाला दिलेला धाम्मोपदेश ऐकून तिच्या मनात धम्माबद्दल श्रद्धा निर्माण झाल्याने ती भगवंतांची उपासिका झाली. काही काळानंतर संसारातून उदासीन झाल्याने तिने प्रव्रज्या घेऊन भिक्खुणी संघात प्रवेश केला. परिश्रमपूर्वक ध्यानसाधना केल्यानंतर अल्पावधीतच तिने अर्हतपद प्राप्त केले. श्रावस्तीमध्ये राहत असताना एके दिवशी दुपारची ध्यानाभावना करण्यासाठी अन्धवनांत गेली आणि एका झाडाखाली बसली. तेव्हा तिच्या मार्गात अडचण आणण्याकरिता मार तिला म्हणाला :-_ *_जे पद प्राप्त करण्यासाठी ऋषींनासुद्धा अत्यंत कठीण आहे, ते दोन अंगुली-प्रज्ञाव असलेल्या स्त्रियांनी प्राप्त करणे शक्य नाही. ||६०||_* _यावर सोमा म्हणाली. :-_ *_हे मारा! चित्त समाधिस्त झाल्यावर सत्याचे ज्ञान झाल्यावर आणि धम्माचे सम्यक दर्शन झाले असताना स्त्री-भाव आमच्या मार्गात कोणते अडथळे आणू शकेल? (स्त्री असल्यामुळे निर्वाण मार्गात अडथळे येऊ शकत नाही). ||६१||_* *_माझी तृष्णा सर्व ठिकाणातून नष्ट झाली आहे. माझा अज्ञानान्धकार सुद्धा नष्ट झाला आहे. हे पापी मारा, प्राण्याचा नाश करणाऱ्या, आज तुझाच नाश झालेला आहे हे जाणून घे. ||६२||_* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *संदर्भ: - थेरिगाथा* *संकलन :- महेश कांबळे* *३१/१२/२०२०* https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...