Sunday, 1 November 2020

प्राण्याचा वध करून श्राद्ध करणे इष्ट आहे काय?

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*_प्राण्याचा वध करून श्राद्ध करणे इष्ट आहे काय?_*

                        *_(मतकभत्त जातककथा)_*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖  

               _वाराणशीमध्ये एक वेदशास्त्रसंपन्न प्रख्यात ब्राह्मण राहत होता. त्याच्याजवळ वेदाध्ययन करण्यासाठी पुष्कळ शिष्य राहत असे. वडिलांच्या श्राद्धाच्या दिवशी त्याने सांभाळल्या एका मेंढ्याला आपल्या शिष्यांच्या स्वाधीन करून तो म्हणाला, "ह्या मेंढ्याला नदीवर नेऊन अंघोळ घालून *पंचांगुलिक* देऊन सजवून आणा, आज याला मारून मी पितरांचे श्राद्ध करणार आहे."_

              _शिष्यांनी त्या मेंढ्याला नदीवर नेऊन त्यांच्या गुरूने जसे सांगितले तसे कसे. तेव्हा तो मेंढा हसला व नंतर मोठ्याने रडला. ते पाहून शिष्यांना आश्चर्य वाटले आणि त्यांनी त्या मेंढ्याला असा का वागलास असे विचारले._

             _त्या मेंढ्याने त्या शिष्यांना सांगितले की तुम्हाला पडलेला प्रश्न तुम्ही तुमच्या आचार्यांसमोर विचारा तेव्हा मी उत्तर देईन. शिष्यांनी त्या मेंढ्याला आपल्या आचार्याजवळ नेऊन नदीवर घडलेला प्रसंग सांगितला. तेव्हा आचार्यांनी मेंढ्याला असे वागण्यामागचे कारण विचारले._

             _मेंढा म्हणाला, "भो ब्राह्मण, मी पाचशे जन्मापूर्वी तुझ्या सारखाच मोठा प्रख्यात ब्राह्मण होतो. त्या जन्मी वडिलांच्या श्राद्धासाठी मी एकदाच काय तो एक मेंढा मारला होता, त्या कर्मामुळे मला पाचशे खेपा मेंढ्याच्या कुळांत जन्म घेऊन शिरच्छेद करून घ्यावा लागला. पण माझी शेवटची पाळी असल्यामुळे मी आज पशुयोनीतून मुक्त होणार आहे. अशा विचाराने मला आनंद झाला व त्यामुळे मी हसलो. पण जेव्हा तुमची आठवण झाली तेव्हा मला खूप वाईट वाटले. आपण ह्या जन्मीचे माझे अन्नदाते - पालनकर्ते आहात, पण ह्या कर्मामुळे आपणाला माझ्यासारखे मेंढयाच्या कुळात पाचशे जन्म घ्यावे लागतील व त्या प्रत्येक जन्मांत शिरच्छेदाचे दुःख भोगावे लागेल, या विचाराने माझे अंतःकरण कळवळले आणि माझा शोक अनावर झाल्यामुळे मला रडू आले." मेंढ्याचे बोलणे ऐकून ब्राह्मणाने त्याला मारण्याचा विचार सोडून दिला आणि मेंढ्याला सांगितले की माझ्या शिष्यांसह त्याचे रक्षण करेन असे सांगितले._

             _मेंढ्याचे रक्षण करण्यासाठी आपल्या शिष्यांसह रक्षणाचा बंदोबस्त केला. मेंढा गावाबाहेर एका खडकाच्या बाजूला वाढलेल्या झुडुपांचा पाला खाऊ लागला. इतक्यात मोठा कडकडाट होऊन त्या शिळेवर वीज पडली व तिचे एक शकल उडून त्याने मेंढ्याची मान धडापासून निराळी केली. ते आश्चर्य पाहण्यासाठी पुष्कळ लोक तेथे आले त्यात आमचा बोधिसत्त्व ही होता._

            _बोधिसत्त्व जमलेल्या लोकांना म्हणाला, "मनुष्यप्राणी इहलोकी जन्म पावणे दुःखकारक आहे असे जर जाणते, तर त्यांनी इतर प्राण्यांचा वध केला नसता! प्राणघातामुळे किती दुःख भोगावे लागते हे ह्या मेंढ्याच्या उदाहरणावरून स्पष्ट होत आहे!" बोधिसत्त्वाचा उपदेश ऐकून ते लोक प्राणघातापासून विरत झाले._


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


*संदर्भ : - जातक कथा संग्रह*


*संकलन :- महेश कांबळे*

*०२/११/२०२०*


https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1


🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...