🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_माणसाची अधोगती कशाने होते?_*
_एके समयी भगवान श्रावस्ती येथील जेतवनातील अनाथ पिंडकाच्या विहारात राहत होते. त्या वेळी मध्यरात्र उलटल्यानंतर आपल्या तेजाने जेतवन दिप्तीमान करित एक देव भगवंतांच्या बाजूला उभा राहिला आणि त्यांच्या सन्निध जाऊन आदराने त्यांना अभिवादन करून बाजूला उभा राहिला आणि भगवंतांना उद्देशून म्हणाला -_
*_गौतमा, मी तुला अधःपतन पावणाऱ्या माणसाविषयी काही प्रश्न करणार आहे. कृपा करून अधःपतनाची कारणे काय असतात ते मला सांग!'_*
*भगवंतांनी सांगण्याचे मान्य केले आणि ते म्हणाले :*
*_'कोणाची उन्नती होत आहे आणि कोन अघोगतीला जात आहे हे सहज समजण्यासारखे आहे. धर्मप्रेमी हा उन्नतपथावर, तर धर्मद्वेष्टा हा अधोगतीच्या पथावरील वाटसरू आहे हे अधोगतीचे / अधःपतनाचे पहिले कारण होय._**
*_'अधोगतीच्या वाटसरूला दुर्गुणी माणसे प्रिय वाटतात आणि सद्गुणी माणसे अप्रिय वाटतात. त्याची दुर्गुणी माणसांवर श्रद्धा असते हे त्याच्या अधोगतीचे / अधःपतनाचे दुसरे कारण होय._*
*_'झोपाळूपणा, गप्पा मारण्याची आवड, निरुद्योगीपणा, आळस, क्रोधाविष्टता ही सर्व अधोगतीचे / अधःपतनाचे तिसरे कारण होय._*
*_आईबाप वृद्ध झाले असताना जवळ संपत्ती असूनही त्यांचे पालनपोषण न करणे अधोगतीचे / अधःपतनाचे चौथे कारण होय._*
*_'ब्राह्मण, श्रमण किंवा अन्य साधूंना असत्य भाषणांनी ठकविणे हे अधोगतीचे / अधःपतनाचे पाचवे कारण होय._*
*_'जवळ विपुल द्रव्य, सुवर्ण, धनधान्य असूनही त्या सर्वांचा एकट्यानेच उपभोग घेणे हे अधोगतीचे / अधःपतनाचे सहावे कारण होय._*
*_'आपले कुळ, संपत्ती, जात यांचा अभिमान बाळगून आपल्या आप्तेष्टांचा तिरस्कार करणे हे अधोगतीचे / अधःपतनाचे सातवे कारण होय._*
*_'व्यभिचार, मध्यपान, जुगार यांमध्ये द्रव्याचा अपव्यय करणे हे अधोगतीचे / अधःपतनाचे आठवे कारण होय._*
*_'स्त्रीमध्ये समाधान न पावता वेश्या, गणिका आणि परस्त्रीया यांचा समागम करणे हे अधोगतीचे / अधःपतनाचे नववे कारण होय._*
*_'जो गतयौवन (वयातील) पुरुष तींबरु वृक्षाच्या फळाप्रमाणे (लहान) स्तन असलेल्या (तरुण) स्त्रीशी लग्न करतो व तिच्या ईर्षेने झोपत नाही हे अधोगतीचे / अधःपतनाचे दहावे कारण होय._*
*_'असंयमी, उधळी स्त्री अथवा पुरुष यांच्या हाती आपल्या व्यवहाराची सत्ता देणे हे अधोगतीचे / अधःपतनाचे अकरावे कारण होय._*
*_'जवळची साधने अल्प असूनही क्षत्रिय कुळात जन्म झाला, या जोरावर अफाट महत्वकांक्षा आणि सार्वभौमतेची इच्छा बाळगणे हे अधोगतीचे / अधःपतनाचे बारावे कारण होय._*
*_'हे कुलोत्तम देवा, ही सर्व अधःपाताची कारणे आहेत. या सर्वांवर विजय मिळवलास तरच तू वाचशील.'_*
*संदर्भ: बुद्ध आणि त्यांचा धम्म*
*संकलन : महेश कांबळे*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment