🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_सुखी गृहस्थ_*
एकदा अनाथपिंडक भगवंताकडे आला आणि त्यांना अभिवादन करून जवळच्या आसनावर बसला. *गृहस्थाचे सुख लक्षात आहे हे जाणण्याची अनाथपिंडाकाला उत्सुकता लागली होती.* म्हणून अनाथपिंडकाने गृहस्थाच्या सुखाचे रहस्य सांगण्याची भगवंतांना विनंती केली.
_भगवंत म्हणाले,_
*गृहस्थाचे पहिले सुख स्वामीत्वात आहे. गृहस्थाजवळ धन असते. त्याने ते न्यायाने, भलेपणाने, उद्यागाने, शरीरसामार्थ्याने आणि निढळाच्या घामाने कमावलेले असते. मी हे धन न्यायाने मिळविलेले आहे, या विचाराने गृहस्थाला सुख वाटते.*
*दुसरे सुख उपभोगाचे, गृहस्थाजवळ धन असते ते त्याने न्यायाने, भलेपणाने, उद्यागाने, शरीरसामार्थ्याने आणि निढळाच्या घामाने कमावलेले असते. त्या धनाचा तो उपयोग घेतो आणि पुण्यकृत्य करतो. न्यायाने मिळविलेल्या माझ्या धनाच्या जोरावर मी पुण्यकृत्य करीत आहे, या विचाराने त्याला सुख लाभते.*
*तिसरे सुख म्हणजे अन् - ऋण. गृहस्थ कोणाचेही लहानमोठे ऋण लागत नाही यामुळे तो सुखी असतो. मी कोणाचेही लाही ऋण लागत नाही, ह्या व अशा विचाराने तो सुखी होतो.*
*चौथ सुख निर्दोषतचे. काया, वासिगा, मनसा निर्दोष कृत्ये करीत राहिल्यामुळे गृहस्थ सुखी होतो.*
_अनाथपिंडक, जर गृहस्थ प्रयत्न करील तर खरोखर त्याला ह्या चारही प्रकारचे सुख लाभेल._
*संदर्भ: बुद्ध आणि त्यांचा धम्म*
*संकलन : महेश कांबळे*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment