🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_अस्थिर मनाला स्थिर करा_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2024/04/blog-post_11.html
*_!! ॐ मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_फन्दनं चपलं चित्तं दुरक्खं दुन्निवारयं ।_*
*_उजु करोति मेधावी उसुकारो व तेजनं ॥_*
*_अर्थ - चित्त हे ओढाळ, चंचल दुर्निवार व दुर्धर आहे. बाण बणविणारा जसा बाणाला सरळ करतो तसा मेधावी अधवा बुध्दिवान पुरुष अशा चित्ताला एकाग्र व सरळ करतो._*
_एकदा तथागत चालिका नगरात चालिक नामक पर्वतावर विहार करीत होते. त्यावेळी आयुष्यमान मेधिय स्थविर हे त्यांचे उपस्थापक होते. आयुष्यमान मेधिव एकदा बुद्धांकडे आले व किमिकाला नदीकिनारी आम्रवनात विहार करण्याची परवानगी मागू लागले. तथागत म्हणाले " मेधिव ! मी एकटाच आहे. दुसरा भिक्षु येईपर्यन्त थांब." मेधिय स्थविर तथागतांचे न ऐकताच न थांबताच तेथुन निघून गेले. त्यांचे चित्त एकाग्र होत नव्हते. नाना प्रकारचे वितर्क उत्पन्न होत होते. संध्याकाळी परत येऊन त्यांनी हा प्रकार तथागतांना सांगितला. तथागत म्हणाले - *"मेधिय ! भिक्षूने इच्छाचारी होऊ नये. हे चित्त क्षणिक आहे, याला आपल्या ताब्यात ठेवले पाहिजे"* पुढे उपदेश करतांना त्यांनी ही गाथा सांगितली._
*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*
*_!!ॐ मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संकलन - महेश कांबळे_*
*_दिनांक :- १२/०४/२०२४_*
*_संदर्भ :-_*
_*१) धम्मपद - चित्तवग्गो*_
_*२) धम्मपद - गाथा आणि त्यांच्या अट्ठकथा*_
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment