🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_अर्हतपद प्राप्त भिक्षुचा मार्ग माराला सापडत नाही_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2024/04/57.html
*_!! ॐ मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_तेसं सम्पन्नसीलानं अप्पमादविहारिनं ।_*
*_सम्पदा विमुत्तानं मारो मग्गं न विन्दति ॥_*
*_अर्थ - त्या शीलसम्पनांचा, अप्रमादाने वागणाऱ्यांचा, सम्यक ज्ञानामुळे मुक्त झालेल्यांचा मार्ग माराला सापडत नाही._*
_आयु. गोधिक राजगृहाच्या इसिगिली पर्वताच्या कालशिळे जवळ विहार करित होते. एका असाध्य रोगामुळे सहावेळा ध्यान करूनही अपेक्षित साध्य ते करू शकले नाही. रोगामुळे त्रस्त होवून गोधिकाने वस्तऱ्याने स्वतःचा गळा कापून घेतला. पण मरण्यापूर्वी काही वेळ आधी त्यांनी अर्हतपद प्राप्त केले होते. तथागतांनी दिव्यदृष्टीने हे पाहिले आणि भिक्षुंसह त्या ठिकाणी आले. आयु. गोधिकाचे शरीर बिछान्यावर तसेच पडून होते. पापीमार त्यांच्या पूनर्जन्म जाणिवेचा शोध घेत तेथे आला. त्यावेळी बुद्धांनी स्पष्ट केले की *"पापीमार ! गोधिक कुलपुत्राच्या पुनर्जन्माच्या स्थानाला तुझ्यासारखे शेकडो, हजारो सुद्धा पाहू शकत नाही."* पुढे त्यांनी हि गाथा म्हणाली._
*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*
*_!!ॐ मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संकलन - महेश कांबळे_*
*_दिनांक :- १०/०४/२०२४_*
*_संदर्भ :-_*
_*१) धम्मपद - पुप्फवग्गो*_
_*२) धम्मपद - गाथा आणि त्यांच्या अट्ठकथा*_
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment