🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_पाली पाठ_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2024/02/blog-post_20.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_!! भाग २ !!_*
*_सूचना :- आपण सर्वांनी "पाली भाषेचा" अभ्यास करावा आणि आपल्या जवळील विद्यापीठात "पाली भाषा" शिकण्यासाठी प्रवेश घ्यावा ह्या उद्देशाने सदर सत्र हे काही मोजकेच दिवस सुरू करण्यात येत आहे._*
*_शब्द_*
सब्बञ्ञु = सर्वत्र
मग्गञ्ञु = मार्गज्ञ (मार्ग जाणणारा)
अत्थञ्ञु = अर्थज्ञ
रत्तञ्ञु = जूना परिचीत
कतञ्ञु = कृतज्ञ
विदू = जाणणारा (विद्वान)
पारगू = पार जाणारा
धम्मञ्ञु = धर्मज्ञ (धम्म जाणणारा)
कालञ्ञु = कालज्ञ (वेळ जाणणारा)
मत्तञ्ञु = मात्रज्ञ (मात्रा जाणणारा)
तत्तञ्ञु = तत्त्वज्ञ
वेदगू = अर्हत
*_कृदन्त शब्द_*
दिट्ठो = दिसलेला
गतो = गेलेला
कुद्धो = रागावलेला
सुक्खो = सुकलेला, वाळलेला
भीतो = घाबरलेला
पीतो = प्यालेला
तिण्णो = पार केलेला
सिद्धो = सिद्ध झालेला
खन्तो = क्षमा केलेला
गुल्हो = लपलेला
जातो = उत्पन्न झालेला
जिण्णो = जिर्ण झालेला
ठितो = उभा झालेला
तुट्ठो = संतुष्ट झालेला
दन्तो = दमन केलेला
भूत्तो = खाल्लेला
सम्पुण्णो= भरलेला, परिपूर्ण, संपूर्ण
वुत्थो = राहिलेला
वुसितो = राहिलेला
मुल्हो= विसरलेला
भग्गो= तुटलेला
पक्को= पिकलेला
रत्तो= आसक्त झालेला
दड्ढो = जळालेला
मुत्तो = सुटलेला
वुध्दो= वाढलेला
त्रस्तो= घाबरलेला
भूतो= झालेला
पुट्ठो= विचारलेला
_*वाक्य*_
_*१) धम्मञ्ञुस्स पञ्जा वुध्दो अत्थि।* = धर्म जाणणाऱ्याची प्रज्ञा वाढलेली आहे._
_*२) वेदगुना भवचक्कं तिण्णो सन्ति।* = अर्हताने भवचक्र पार केलेला आहे._
_*३) अत्थञ्ञु तस्स कम्मेन तुट्ठो निक्खमि।* = अर्थज्ञ त्याच्या कामाने संतुष्ट झालेला निघून गेला._
_*४) वेदगुस्स चित्तं दन्तो भवति।* = अर्हताने चित्त दमन केलला असतो._
_*५) अहं तस्मिं गामे रत्तो भविं।* = मी त्या गावात आसक्त झालेलो होतो._
_*६) रत्तञ्ञु अज्ज गामे आगच्छि।* = जूना परिचीत आज गावात आला._
_*७) पारगू धितिवा सन्ति।* = पार जाणारा धैर्यवान आहे._
_*८) मग्गञ्ञुस्स ञाणं परिपुण्णो भवति।* = मार्ग जाणणाऱ्याचे ज्ञान परिपूर्ण असते._
_*९) धम्मञ्ञु सदा धम्मं वदन्ति।* = धर्मज्ञ नेहमी धम्म सांगतात._
_*१०) विदुना अहं धम्मं जानामि।* = विद्वानाद्वारे मी धम्म जाणतो._
_*११) सो मुत्तो यत्र तत्र धावति।* = तो सुटलेला जिथे तिथे धावतो._
_*१२) तदा कालञ्ञु मुल्हो आगच्छि।* = तेव्हा कालज्ञ विसरलेला आला._
_*१३) तत्थ पक्को फलं पतति।* = तेथे पिकलेले फळ पडते._
_*१४) परहियो अहं दड्डो मनुस्सो पस्सिं।* = परवा मी जळालेला मनुष्य पाहिला._
_*१५) कदाचि सो त्रस्तो भवि।* = कदाचित तो घाबरलेला होता._
*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संकलन - महेश कांबळे_*
*_दिनांक :- २०/०२/२०२४_*
*_संदर्भ :-_*
*_१) विजित संग्राम, मासिक नोव्हेंबर २०१० अंक २८, वर्ष तिसरे_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment