☘️🌿☘️🌿☘️🌿☘️🌿☘️🌿☘️
_*हाच क्षण : जीवन साफल्याचा*_
☘️🌿☘️🌿☘️🌿☘️🌿☘️🌿☘️
_ज्याप्रमाणे भांड्यात जळलेली भाजी पाहून कुणा साधिकेच्या मनांत आपल्या सर्व पूर्वसंचित कर्मबीजांचा विपश्यना साधनेच्याद्वारे नाश करण्याची उत्साहवर्धक प्रेरणा जागी झाली, तद्वतच अतीत कालांत अशा अनेक घटना आहेत की त्यामुळे प्रेरित होऊन अनेक साधिकांनी अत्यंत उत्साहाने विपश्यना साधना आत्मसात करून परम मुक्तीचा लाभ करून घेतला._
_*कोसल नरेश प्रसेनजित ह्यांच्या ब्राह्मण राजपुरोहिताची कन्या दँतिया अशीच भगवान बुद्धांच्या सान्निध्यात आली. म्हणजेच शुद्ध धर्माच्या संपर्कात आली.* श्रावस्ती नगराजवळील अनाथपिंडीक द्वारा निर्मित जेतवन विहारात अनेक भिक्षु-भिक्षुनी, गृहस्थ, पुरुष आणि महिला विपश्यना साधना करीत असत. दँतिया देखील श्रद्धायुक्त अंतःकरणाने काही दिवस साधना करीत असत. साधनेत जसजशी प्रगती होत गेली तसतशी भिक्षुनी बनण्याची वैराग्य भावना प्रबळ होत गेली. महाप्रजापती गौतमीकडून तिने संन्यस्त जीवन स्वीकारले व भिक्षुनी बनून विपश्यना साधनेत मग्न झाली._
_एकदा भिक्षुनी संघासमवेत भ्रमणयात्रा करीत करीत राजगिरीच्या भिक्षुनी विहारात पोहोचली. तिथे रहात असतांना एक दिवस दुपारचे भोजन आटोपून गिज्झकूट पर्वत पायथ्याशी एका वृक्षाखाली विचारमग्न अवस्थेत बसली होतो. तिने एक प्रचंड ताकदीचा विशालकाय हत्ती समोरच नदीच्या प्रवाहात जल विहार करून नदी किनारी विश्राम घेत बसलेला पाहिला. एवढ्यात एक अकुंशधारी माहूत तेथे आला. त्याने त्या विशाल हत्तीला फर्माविले 'पाय पसर' हत्तीने पाय पसरले. त्यावर चढून तो माहूत हत्तीच्या पाठीवर जाऊन बसला. त्याच्या आज्ञेप्रमाणे तो हत्ती शहराच्या दिशेने वाटचाल करू लागला._
_भिक्षुनी विचार करू लागली. *एक अंकुशधारी माहूत या शक्तिशाली प्राण्याला आपल्या अधीन ठेवू शकतो तर मी माझ्या मनाला स्वाधीन का ठेऊ शकत नाही? अवश्य ! हे मी करू शकेन. या छोट्याशा घटनेने तिला खूप काही शिकविले.* जवळच्याच वनात ती गेली. दृढसंकल्प केला आणि प्राणपणाने तिने मुक्तीदायिनी विपश्यना साधनेचा अभ्यास सुरू केला. अथक निरंतर प्रयत्नांनी अल्पावधीतच तिने मनांतील सर्व दुर्वासनांचे बल क्षीण केले. विकारांचे पूर्ण निर्मूलन केले. *अर्हन्त - विमुक्तावस्था प्राप्त करून घेतली.* संसारचक्राच्या रहाटगाड्यातून जन्म मरणाच्या फेऱ्यांतुन मुक्त झाली. *मानवी जीवन सफल केले.*_
🌿☘️🌿☘️🌿☘️🌿☘️🌿☘️
*_संदर्भ :- जागे पावन प्रेरणा_*
*_संकलन - महेश कांबळे
*०१/१२/२०२१*
http://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
☘️🌿☘️🌿☘️🌿☘️🌿☘️🌿☘️
No comments:
Post a Comment