🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_सात प्रकारचे चित्त_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_मनुष्यात वसणारे सात प्रकारचे चित्त पाहण्यात येतात ते असे -_*
*१)* सक्लेश म्हणजे चिकटलेले आहे असे
*२)* श्रोतापन्न व्यक्तीचे चित्त
*३)* सकृदागामी व्यक्तीचे चित्त
*४)* अनागामी व्यक्तीचे चित्त
*५)* अर्हत व्यक्तीचे चित्त
*६)* प्रत्येक बुद्धाचे चित्त
*७)* सम्यक संबुद्धाचे चित्त
*३) सकृदागामी व्यक्तीचे चित्त*
*_"लालसा, द्वेष आणि मोह हे केवळ मोहमात्र राहिले आहेत. अशा सकृदागामी व्यक्तीचे चित्त पाच अवस्थांत एकदम हलके व गतिमान असते. परंतु यापेक्षा उंच अवस्थांत जड, विकृत आणि मंद असते कारण जीवनातील खालच्या दर्जाच्या पाच अवस्थांपर्यंत चित्त परिशुद्ध झालेले असते तरी वरच्या अवस्थांत क्लेश अजून शिल्लकच आहेत, हे असे घडते."_*
_उदा. ज्याप्रमाणे वेळवांच्या रांजीतील वेळू कापून काढत असता पाच पेरांपर्यंत एकदम गुंतलेल्या शाखा प्रशाखा साफ केल्यामुळे तिथपर्यंत ओढून काढावयास मुळीच कठीन जाणार नाही. परंतु वरच्या शाखा प्रशाखा अजून रांजीत परस्परांत गुंतून असल्यामुळे तो भाग ओढून काढण्यास बरीच अडचण जाते. कां की, वेळू खाली पाच पेरांपर्यंत साफ केलेला असला तरी उरलेला वरचा भाग साफ न करता असाच सोडून देण्यात आला आहे._
*_"याप्रमाणेच ज्यांनी सकृदागामी पदाचा लाभ करून घेतला आहे.. त्यांचे चित्त जीवनातील पाच कनिष्ठ अवस्थांपर्यंत एकदम दृतगतीने विचार कार्य करीत असते का की येथे ते हलके आणि गतिमान असते. तरीपण यापेक्षा वरच्या अवस्थांत जड आणि मंदच असते. हे तिसऱ्या प्रकारचे चित्त समजावे."_*
*_क्रमशः_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*संदर्भ:*
*मिलिन्द प्रश्न*
*मेण्डक प्रश्न*
*संकलन : महेश कांबळे*
http://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment