Friday, 18 December 2020

हे असं आहे काय?, बरं !

😇 _*झेन कथा : हे असं आहे काय?, बरं !*_ 💁‍♂️ _जपानी संस्कृतीतल्या तेराव्या शतकात जपानी बौद्ध धर्मगुरू मुजू यांनी सांगितलेल्या झेन कथा रोजच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकण्याची ताकद देतात. या गोष्टींना तात्पर्य नसते. अत्यंत हलक्या फुलक्या व समजायला सोप्या असणाऱ्या या कथांतुन तुम्ही काय व कशाप्रकारे घेता हे तुमच्यावर निर्भर आहे. अशीच एक झेन कथा वाचा..._ • झेन गुरू हाकुईन यांचं नाव आसपासच्या प्रदेशात अत्यंत सन्मानानं घेतलं जाई. शुद्ध चारीत्र्याचा दाखला म्हणून हाकुईन यांच्याकडे लोक पाहत असत. • शेजारी पाजारी, त्या प्रांतातले लहान थोर असे सगळेचजण हाकुईन यांच्या सत्वशील राहणीचे चाहते होते. • त्यांच्या मठाजवळच एक सुंदर मुलगी राहत होती. तिच्या वडिलांचं खाद्य पदार्थ विक्रीचं दुकान होतं. • एकेदिवशी अचानक पालकांच्या लक्षात आलं की, त्यांच्या मुलीला दिवस गेले आहेत. प्रचंड संतापलेल्या तिच्या पालकांनी तिला खडसावत विचारलं, तुझ्या पोटातल्या बाळाचा पिता कोण आहे? • ती आधी तोंड उघडायला तयार नव्हती. अखेर पालकांनी खूपच दटावणी केल्यानंतर तिनं तोंड उघडलं आणि सांगितलं की हाकुईन तिच्या पोटातील बाळाचा पिता आहे. • ज्याच्या शुद्ध चारीत्र्याचे गोडवे गायले जातात, तो हाकुईनमुळे आपल्या मुलीला दिवस गेल्याचे समजल्यावर तर त्यांचा राग अनावर झाला. • ते संतापलेल्या अवस्थेत तसेच हाकुईनकडे गेले आणि त्यांनी हाकुईनना ही घटना सांगत जाब विचारला. • सगळं शांतपणे ऐकून घेतल्यानंतर हाकुईन यांनी फक्त इतकंच म्हटलं... *हे असं आहे काय?, बरं!* • मुलाचा जन्म झाल्यानंतर त्या बाळाला हाकुईन यांच्याकडे आणण्यात आलं. हाकुईन यांची सगळी प्रतिष्ठा धुळीला मिळाली होती. • मानमरातब गेला होता, कुणीही विचारत नाही अशी स्थिती झाली होती. तरीही दैनंदिन आचार विचारात कुठलाही फरक न पडलेल्या हाकुईन यांनी बाळाची चांगली काळजी घेतली. • बाळाच्या पालनपोषणासाठी जे काही लागतं ते हाकुईन यांनी शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून आणले आणि त्याची चांगली काळजी घ्यायला सुरूवात केली. • असंच वर्ष निघून गेलं. त्या मुलीला हा प्रकार सहन होईना. तिनं अखेर पालकांना सत्य सांगितलं की तिच्या बाळाचा पिता हाकुईन नसून दुसराच एक तरूण आहे, जो मच्छीबाजारात काम करतो. • हे कळल्यावर शरमिंदे झालेले त्या मुलीचे आई वडील पुन्हा हाकुईनकडे गेले. त्यांच्या पाया पडून माफी मागितली आणि बाळाला पुन्हा नेत असल्याचं सांगितलं. • बाळाची काळजी घेत असलेल्या हाकुईन यांनी हे सगळं शांतपणे ऐकून घेतलं आणि म्हणाले... *हे असं आहे काय?, बरं!*

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...