Monday, 21 December 2020

अभय माता

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *२६ अभय माता* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ _उज्जैनी नगरीत या थेरीचा जन्म झाला होता. हि त्या नगरीतील प्रसिद्ध गणिका होती. तिचे नाव पद्मावती होते. बिंबिसार राजाने तिच्या रुपसौंदर्याचे बाबतीत ऐकून पुरोहिताला सांगितले, “उज्जैनीतील पद्मावतीला पाहण्याची इच्छा आहे.” तेव्हा पुरोहिताने पद्मावतीची भेट राजाशी घडवून आणली. त्यानंतर राजापासून तिला एक मुलगा झाला. *त्याचे नाव अभय ठेवण्यात आले.* तो सात वर्षांचा झाल्यावर पद्मावतीने त्याला राजाकडे पाठविले. राजाने त्याचे आपल्या पुत्राप्रमाणे लालनपालन केले. काही वर्षांनी त्याला धम्माप्रती श्रद्धा उत्पन्न झाल्याने त्याने प्रव्रज्या घेतली. मुलाचा उपदेश ऐकून काही दिवसांनी त्याची आईसुद्धा प्रव्रजित झाली. विपस्सना साधना करीत तिने दिव्यज्ञान प्राप्त केले. मुलाने दिलेला उपदेश ती वारंवार म्हणू लागली. :-_ *_”हे आई! पायाच्या तळव्यापासून वर डोक्यापर्यंत आणि डोक्यावरील केसापासून खाली तळव्यापर्यंत तू या अशुद्ध व दुर्गंधयुक्त शरीराचे निरीक्षण कर.” !!३३!!_* *_अशा प्रकारे उपदेश ऐकून आचरण करीत असता माझी संपूर्ण वासना समूळ नष्ट झाली. पीडा शांत झाली. निब्बाण प्राप्त करून मी परमशांती मिळविली आहे. !!३४!!_* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *संदर्भ: - थेरिगाथा* *संकलन :- महेश कांबळे* *२१/१२/२०२०* https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...