Thursday, 3 December 2020

मुत्ता (दुसरी)

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *११ मुत्ता (दुसरी)* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ _कोशल देशातील ओघाटक नावाच्या ब्राह्मणाच्या घरी मुत्तेचा जन्म झाला होता. वयात आल्यावर एका दरिद्री व ठेंगण्या ब्राह्मणाशी तिचा विवाह झाला. “मला सांसारिक जीवन अवघड झाले” असे तिने पतीला सांगितले. शेवटी पतीची आज्ञा मिळाल्यानंतर तिने प्रव्रज्या घेतली. विपस्सना ध्यान साधनेसाठी तिने खूप प्रयत्न केले. तरीसुद्धा तिचे चित्त बाह्यवस्तूकडे आकर्षित होत होते. परंतु शेवटी चित्ताचे दमन करून तिने अर्हत्व प्राप्त केले. परमपद प्राप्त झाल्याच्या आनंदात तिने उस्फूर्त गाथा (उदान) ती वारंवार म्हणत असे_ *_मी सुमुक्त झाली आहे. मी चांगल्याप्रकारे मुक्त झाली आहे. मी तीन कुटिल वस्तूंपासून मुक्त झाली आहे. उखळ, मुसळ व कुबड्या पतीपासून त्याचप्रमाणे जन्म-मरणापासून सुद्धा मी मुक्त झालेली आहे. माझी तृष्णा समुळ नष्ट झाली आहे. !!११!!_* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *संदर्भ : - थेरिगाथा* *संकलन :- महेश कांबळे* *०३/१२/२०२०* https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1

No comments:

Post a Comment

योग

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_योग_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_19.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 _भगवंतांनी संबोधी मार्गा...