Wednesday, 4 March 2020



*!! धम्मपद !!*

*यमकवग्गो*

🌼🌼🌼🌼

*मनोपुब्बङ्गमा धम्मा, मनोसेढा मनोमया।*
*मनसा चे पदुद्वेन, भासति वा करोति वा ।*
*ततो नं दुक्खमन्वेति, चक्कं व वहतो पदं !!१!!*

🌷 *अर्थ* 🌷

*स्वभावाच्या पुढे मन असते, मन (सर्व) श्रेष्ठ आहे,*
*विकृत मनाने बोलतो व कृती करतो तेंव्हा*
*त्याच्या मागे दुःख असे येते जसे (बैलाच्या) पावलांमागे चाक जाते !!१!!*

 

*मनोपुब्बङ्गमा धम्मा, मनोसेढा मनोमया।*
*मनसा चे पस्सनेन, भासति वा करोति वा ।*
*ततो नं छाया व अनपायिनी !!!!* 
                                                                   🌷 *अर्थ* 🌷

*स्वभावाच्या पुढे मन असते, मन (सर्व) श्रेष्ठ आहे,*
*प्रसन्न मनाने बोलतो व कृती करतो तेंव्हा*
*त्याच्या मागे सुख असे येते जशी सावली !!२!!*

 

*अक्कोच्छीमं अवधी मं अजनी मं अहासी मे!*
*ये तं न उपनयंहनति वेरं तेसं न सम्मति !!३!!*

 🌷 *अर्थ* 🌷

*मला आपमानिले, मला जिंकले, माझा शेवट केला,*
*असे वैर जे धरतात, त्यांचे वैर शमत नाही !!३!!*

 
*अक्कोच्छीमं अवधी मं अजनी मं अहासी मे!*
*ये तं न उपनयंहनति वेरं तेसूप सम्मति !!४!!*

🌷 *अर्थ* 🌷

*मला आपमानिले, मला जिंकले, माझा शेवट केला,*
*असे वैर जे धरतात, त्यांचेच वैर शमते !!४!!*

 
*न हि वेरेन विरानि सम्मंतिध कुदाचनं !*
*अवरेन च सम्मंति एस धम्मो सनंतनो !!५!!*

🌷 *अर्थ* 🌷

*वैराने वैर कधीच शमत नाही, ते अवैरानेच शमते, असा पूर्वापार सिद्धांत आहे !!५!!*

 
*परे च न विजानंती मयमेथ्य यमामसे !*
*ये च तथ्य विजानंती ततो सम्मंति मेधगा !!६!!*

 🌷 *अर्थ* 🌷

*त्यांचे नव्हे, आपण मरणारच आहोत हे जे जाणित नाहीत,*
*त्यांचेच वैर शमते, आपण मरणारच आहोत हे जे जाणतात!!६!!*

 
*सभानुपस्सी विहरन्त इंद्रियेसू असंवुतं !*
*भोजन्मही अमत्तय्यु कुसीतं हिनविरिय !*
*तं वे पसहती मारो वातो रुक्ख'व दुब्बलं !!७!!*

 
                                                                        🌷 *अर्थ* 🌷

 *(फक्त) चांगलेच पहात फिरणारा, इंद्रियांवर ताबा नसलेला,*
*भोजनाची (योग्य) मात्रा न जाणणारा, निरुद्योगी, हिंमत हरलेला,*
*त्याला, भुलैया असे जिंकतो, जसे वारा दुर्बल झाडाला (वाकवितो) !!७!!*

 

*असभानुपस्सी विहरन्त इंद्रियेसु सुसंवुतं!*
*भोजन्मही च मत्तय्युसद्ध आरद्धविरियं !*
*तं वे नप्पसहती मारो वातो सेलं'व पब्बतं !!८!!*

 
                                                                       🌷 *अर्थ* 🌷

*(फक्त) चांगलेच न पहात फिरणारा, इंद्रियांवर योग्य ताबा असलेला,*
*भोजनाची (योग्य) मात्रा  जाणणारा, प्रयत्नशील, हिंमतवान,*
*त्याला, भुलैया जिंकु शकत नाही, जसे वारा शैल पर्वताला हलवू शकत नाही  !!८!!*

 

*अनिक्कसावो कासवं यो वथ्य परिदहेस्सति!*
                                                              *अपेतो दमसच्चेन न सो कासावमरहती !!९!!*

 🌷 *अर्थ* 🌷

*मलयुक्त चित्ताने जो भगवी वस्त्र परिधान करतो तो,*
*सत्य व संयमाहुन दूर गेलेला, भगवी वस्त्र धारण करण्यास लायक नाही !! ९!!*

 

*यो च वंतकसावस्स सिलेसु सुसमाहितो!*
*उपेतो दमसच्चेन स वे कासावमरहती !!१०!!* 

🌷 *अर्थ* 🌷

*जो दोषविरहित आहे, शीलवान आहे, चांगला एकाग्रचित्त आहे,*
*सत्य व संयमा जवळ असणारा, तो भगवी वस्त्र धारण करण्यास लायक आहे  !! १० !!*
 

*असारे सारमतीनो सारे चासारदस्सीनो !*
*ते सारं नाधिगच्छंती मिच्छासंकप्पगोचरा !!११!!* 

🌷 *अर्थ* 🌷

*सत्वहीनात सत्व पाहणारा, सात्विकात सत्वहीनता पाहणारा,*
*खोटे संकल्प पाहणारा (करणारा) सात्त्विकता प्राप्त करीत नाही  !! ११ !!* 

 

*सारय्य सारतो यत्वा असारयच्च असारतो !*
*ते सारं अधिगच्छंती सम्मासंगकप्पगोचरा !!१२!!* 

🌷 *अर्थ* 🌷 

*सात्विकतेतच सत्व पाहणारा,  सत्वहीनतेत असत्व पाहणारा,*
*सम्यक संकल्प पाहणारा (करणारा) सात्त्विकता प्राप्त करतो !! १२ !!*

 

*यथागारं दुच्छन्न वुठ्ठी समतिविज्जति !*
*एवं अभावित्त चित्त रोगो समतिविज्जति !!१३!!*
 
🌷 *अर्थ* 🌷 

*जसे छतविरहित घरात पाऊस आरपार जातो,*
*तसे अननुभवीच्या (मानवाच्या) मनात रोगाचा प्रवेश होतो !! १३ !!*
 

*यथागारं सुच्छन्न वुठ्ठी न समतिविज्जति !*
*एवं सुभावित्त चित्त रोगो न समतिविज्जति !!१४!!* 

🌷 *अर्थ* 🌷

*जसे चांगला छताच्या घरात पाऊस प्रवेश करीत नाही,*
*तसे अनुभवीच्या (मानवाच्या) मनात रोगाचा प्रवेश होत नाही !! १४ !!*
 
                                     
                                                       *इध सोचती पेच सोचती पापकारी उभयथ्य सोचती !*
*सो सोचती सो विहय्यती दिस्वा कम्मकिलीठ्ठमत्तनो !!१५!!*

🌷 *अर्थ* 🌷

*इथेही चिंतीत, मृत्योत्तरही चिंतीत, दुष्कर्मी दोन्हीकडे चिंतीत असतात*
*ते केलेल्या कुकर्मांना पाहून चिंतीत होतात, पीडित होतात !! १५ !!*
 

*इध मोदती पेच्च मोदती कतपुय्यो उभयथ्य मोदती !*
*सो मोदती सो पमोदती दिस्वा कम्मविसुद्धमत्तनो !!१६!!*

🌷 *अर्थ* 🌷

*इथेही आनंदित, मृत्योत्तरही आनंदित, सत्कर्मी दोन्हीकडे आनंदित असतात*
*ते केलेल्या सत्कर्मांना पाहून आनंदित होतात, अधिक आनंदित होतात !! १६ !!*

 
*इध तप्प्यती पेच्च तप्पती पापकारी उभयथ्य तप्पती !*
*पापं मे कतंति तप्पती भीय्यो तप्पती दुग्गतींगतो!!१७!!*

🌷 *अर्थ* 🌷 

*इथेही तप्त, मृत्योत्तरही तप्त, दुष्कर्मी दोन्हीकडे तप्त असतात*
*ते केलेल्या कुकर्मांना पाहून तप्त होतात, दुर्गातीकडे जातात !! १७ !!* 

 

*इध नंदती पेच्च नंदती कतपुय्यो उभयथ्य नंदती !*
*पूयं मे नंदति तप्पती भीय्यो नंदती सुग्गतींगतो!!१८!!*

🌷 *अर्थ* 🌷 

*इथेही प्रसन्न, मृत्योत्तरही प्रसन्न, सत्कर्मी दोन्हीकडे प्रसन्न असतात*
*मी सत्कर्म केले (या विचारांनी) प्रसन्न होतात, अधिक प्रसन्न होतात !! १८ !!*

 

*बहूंपि चे सहितं भासमानो न तक्करो होति नरो पमतो!*
*दोपो व गावो गणयं परेसं न भगवा सामय्यस्स होति !!१९!!* 

🌷 *अर्थ* 🌷

*पुष्कळ (ग्रंथ) वाचून तस्कर वा प्रमादी मानव (भाग्यवान श्रमण होत नाही,*
*दुसऱ्यांच्या गाई मोजून गो-पालक असा (मानव) श्रमणत्वाचा अधिकारी नसतो!! १९ !!*

 
*अप्पम्पि चे सहीतं भासमानो धम्मस्स होति अनुधम्माचारी!*
*रागच्च दोसच्च पहाय मोहं समप्पजाणो सुविमुत्तचित्तो!*
*अनुपादियानो इध वा हुरं वा स भागवा सामय्यस होति !!२०!!*

🌷 *अर्थ* 🌷 

*थोडेसे (ग्रंथ) वाचून सैद्धांतिक आचरणाने सदाचारी होतो,*
*राग, द्वेष, मोह त्यागून, सम्यक जाणिवेने, मुक्त चित्ताने, अनासक्त, असा (मानव) श्रमणत्वाचा अधिकारी असतो. !! २० !!*

No comments:

Post a Comment

घट सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_घट सुत्त_*  *_(संयुक्त निकाय)_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_47.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼...