Monday, 16 March 2020

*आभा Aura शरीररश्मी* 

अनेकदा बुध्दांच्या चित्रात, शिल्पात आपणाला भगवान बुध्दांच्या शरीराभोवती किंवा डोक्यामागे आभा तेजोवलय रेखाटल्याचे दिसण्यात येते. 

*ही आभा काय असते ?* 
खरोखरच भगवान बुध्दांच्या शरीरातून अशा प्रकारचे रंगीत तेजोवलय बाहेर फेकले जात होते ? 
उत्तर आहे होय. भगवान बुध्दांच्या पावित्र्याच्या सामर्थ्यामुळे त्यांच्या शरीरातून तेजस्वी आभा प्रकट होत असे. त्यास *बुध्द रश्मी* असे म्हणतात. 
त्यात सहा रंग असतात. निळा, पिवळा, लाल, भगवा, सफेद आणि हे सर्व  एकत्रित रंग म्हणजे पभासरा. धम्मध्वजाचे रंग म्हणजेच बुध्दांच्या शरीरातून बाहेर पडलेले रंगीत तेजोवलय. हे तेजोवलय लहरींच्या स्वरूपात असतात. सर्व अर्हत तसेच ज्या व्यक्तीचा आध्यात्मिक विकास अधिक असेल त्यांचीही आभा तेजस्वी असते. 

भगवान बुध्दांच्या शरीरातील तेजोवलयासंबंधी उल्लेख महापरिनिर्वाण सुत्तात मिळतो. जेव्हा भन्ते आनंद तथागतांच्या शरीरातून तेजस्वी आभा निघत असल्याचे कारण विचारतात, तेव्हा बुध्द त्यांना सांगतात, दोन प्रसंगी हे अलौकिक तेज प्रकट होते. पहिल्यांदा सम्यक सम्बोधी प्राप्त होताना व दुसऱ्यांदा त्यांच्या परिनिर्वाणाच्या रात्री. 

माझ्या अल्प माहीतीप्रमाणे प्रथम बुध्दाची मुर्ती ही कनिष्काने बनविली त्यात सुध्दा भगवान बुध्दांच्या डोक्यामागे एक आभा दाखविली आहे. आज ख्रिश्चन असो वा हिंदू देवदेवता प्रत्येक देवांच्या मागे किंवा शरीराभोवती आभा दाखवण्याचा प्रघात इथूनच पडला. त्या तेजोवलयाचा उगम बौध्द शिल्पकलेत आहे. 

*आधुनिक विज्ञान या आभाची पुष्टी करतो काय ?* 
डॉ. बॅरोन कार्ल लुडविग वॉन रिचेनबेक ( Dr. Baron Carl Ludwig Von Reichenbach ) 
या शास्त्रज्ञाने ओडीक फोर्स ( Odic Force ) नावाचा एक प्रयोग केला. त्यात त्याला असे आढळले की, प्रभावलय ही एक नैसर्गिक गोष्ट आहे. सर्व मानवी प्राणिमात्रातच नव्हे तर चराचरांतील सर्वच वस्तूंमध्ये प्रभावलय आहे. 
त्यानंतर डॉ. बारड्युक ( Dr. Baraduc ) या शास्त्रज्ञाने प्रभावलयाचे हूबेहूब छायाचित्र घेतले. 

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...