Wednesday, 16 August 2023

संघादिसेस

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संघादिसेस_* 

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_* 

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

               _*'संघादिसेस' हा दण्ड पाराजिका पेक्षा थोडा शिथिल आहे. तेवढा गंभीर अपराध मानला जात नाही. संघच ह्या अपराधाच्या दण्डाचा निर्णय करू शकतो तसेच योग्य दण्ड देऊ शकतो. म्हणूनच ह्याचे नाव संघादिसेस म्हणजे संघाचा आदेशच पूर्व दिशा आहे.*_

          _ह्या दण्डासाठी अपराधी भिक्षूला काही दिवसांसाठी परिवास (संघातून अलग होणे) करावा लागतो अर्थात थोड्या दिवसांसाठी संघापासून अलग, वेगळे रहावे लागते आणि प्रायश्चित्त म्हणून त्याला एकट्यालाच एकटे राहून ध्यानभावनेत निमग्न रहावे लागते. नंतर तो शुद्ध होऊन संघात प्रवेश करतो अथवा त्याला सघ पुन्हा संघात घेतो._

*_संघादिसेस या प्रकारात येणारे अपराध (आपत्त्या) तेरा (१३) आहेत-_*

*_(१)* जाणून समजून वीर्य नाश करणे. अज्ञात रूपाने अर्थात स्वप्नदोषामुळे वीर्यस्खलन झाल्यावर या होत असेल, तो अपराध मानल्या जाणार नाही_ 

*_(२)* कामवासनेने स्त्रीला हात लावणे_

*_(३)* कामवासनेने स्त्रीबरोबर वार्तालाप करणे_

*_(४)* आपला मोठेपणा दाखवून, फुगीरपणा करून कामुक उद्देशाने स्त्रीला आपलस करून घेणे_ 

*_(५) विवाहसंबंध निश्चित करण्यासाठी मध्यस्थ होणे किवा दोन प्रेमींना मिळविणे_*

*_(६)* सघाची अनुमती न घेता आपणासाठी विहार बनविणे_

*_(७)* संघाची अनुमती न घेता मोठ्यात मोठे विहार बाधण्याची तयारी करणे वा बांधणे_

*_(८)* रागाच्या भरात अर्थात द्वेषाने दूषित होऊन निरापराधी भिक्षूला 'पाराजिक धम्माचा' अपराधी ठरविणे अथवा अपराध लावणे_ 

*_(९)* 'पाराजिक अपराधासारखा त्याला मिळताजुळता कोणतातरी अपराध त्याला पाराजिक अपराध सागून आपल्या संगतीला असलेल्या भिक्षूला अपराधी ठरविणे_

*_(१०)* वारवार चेतावनी देऊनही संघात फुट पाडण्याचा प्रयत्न करणे_

*_(११)* फुट टाकणाऱ्याची सहायता करणे_

*_(१२)* गृहस्थाच्या घरी जावून त्याच्या अनुमतीविना त्याच्या घरात घुसणे_ 

*_(१३)* वारवार नियमित चेतावनी देऊनही संघ अथवा साथीदार भिक्षूच्या सांगण्याला न ऐकणे._

*_हे तेरा 'सघादिसेस' अपराध आहेत. भिक्षूने हे न करण्याचा नेहमी प्रयत्न करणे._*

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :- १६/०८/२०२३_*

*_संदर्भ :- विनय पिटक_*

              *_पातीमोख्य - भिक्खू _पातीमोख्य

https://mikamblemahesh.blogspot.com/2023/08/blog-post.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...