Tuesday, 19 October 2021

तेलाची बाटली

                     🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 

                       *_तेलाची बाटली_*

                 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

                 _एका बाईला तीन मुले होती. बाईने एके दिवशी त्यातील एका मुलाला बोलावले. त्याला दहा रुपयाची नोट व एक रिकामी बाटली दिली व वाण्याच्या दुकानातून तेल आणण्यास सांगितले. त्या मुलाने दुकानात जाऊन बाटली भरून तेल विकत घेतले. परत येताना बाटली रस्त्यातच त्याच्या हातून निसटून खाली पडली. ती उचलण्यापूर्वीच त्यातील अर्धे तेल ओघळून खालू सांडले. तेल वाया गेलेले पाहून रडत रडतच तो आईकडे आला. *'अरेरे! माझ्या हातून तेल सांडले! जवळ जवळ अर्धी बाटली तेल वाया गेले! तो अतिशय दुःखी झाला'*._

                  _आईने नंतर आपल्या दुसऱ्या मुलाला दुसरी बाटली व दहा रुपयाची नोट देऊन दुकानात पाठवले. त्यानेही दुकानातून बाटली भरून घेतली. परत येतांना तोही पडला व बाटलीतले अर्धे तेल सांडले. बाटलीत उरलेले अर्धे तेल घेऊन तो आनंदात घरी परतला व म्हणाला, *'अहाहा! आई हे बघ, मी बाटलीतले अर्धे तेल वाचविले! बाटली खाली पडली. कदाचित ती फुटली असती. तेल खाली सांडायला लागले होते. कदाचित सगळेच तेल सांडले असते. पण अर्धे तेल वाचविले!'*_

                    _दोन्हीही मुले आईकडे सारख्याच परिस्थितीत अर्धी भरलेली बाटली व अर्धी रिकामी बाटली घेऊन आलेले होते. एक अर्धी बाटली सांडली म्हणून रडत होता, तर दुसरा अर्धी बाटली वाचविली म्हणून खुषीत होता._

                   _मग आईने पुन्हा आपल्या तिसऱ्या मुलाला एक बाटली व दहा रुपयांची नोट घेऊन त्याच कामासाठी पाठविले. तोदेखील इतर भावांप्रमाणे परत येतांना पडला व अर्धे तेल खाली सांडून वाया गेले. त्यानेही ती बाटली उचलली व दुसऱ्या भावाप्रमाणे हसतच आईकडे परतला._

                 _'आई आई, बघ मी बाटलीतले अर्धे तेल वाचविले' मुलगा म्हणाला. हा मुलगा विपश्यनेचा साधक होता. तो पुर्णपणे समजून होता, *'हरकत नाही. अर्धे तेल वाचले असले तरीहि अर्धे तेल वाया गेलेच,'* म्हणून तो आपल्या आईला म्हणाला, *'मी आज बाजारात जातो. खूप मेहनत करतो, पाच रुपये मिळवितो व संध्याकाळपर्यंत उरलेली बाटली तेलाने भरून आणतो. मी ती नक्कीच भरून आणीन.'*

                _*हीच तर "विपश्यना" आहे, निराशावाद नाही, तर आशावाद, वास्तववाद व क्रियापद.*

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*संदर्भ : जगण्याची कला*

*संकलन : महेश कांबळे*

*२०/१०/२०२१*

https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷


No comments:

Post a Comment

Trees and vines

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌺🌺🌺💐  *_Trees and vines_* *_रुक्खलता_* 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌺🌺🌺💐 १. Areca palm — पूगो — सुपारीचे झाड २. Bamboo — वेळ; वेणु — ...