Monday, 19 May 2025

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक कमिटी, मुंबई (विभाग देवरुख)

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक कमिटी, मुंबई (विभाग देवरुख)_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2025/05/blog-post_19.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

          _*सन १९३२ साली संगमेश्वर तालुक्यातील कार्यकर्त्यांची सभा श्री. सजनबुवा पुरकर यांच्या अध्यक्षतेखाली साडवली येथे झाली. या सभेत सर्वश्री शिवराम कांबळे, हवालदार पुरकर, भिकाजी गमरे विघ्रवलीकर, पांडू सुभाना पोमींडकर, रामचंद्र यशवंत साडवलीकर हजर होते.* या सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करण्यात आला आणि तालुक्यात त्यांच्या विचारांचा प्रचार व जनजागृती करण्याचा, त्यासाठी तालुका संघटन करण्याचा निर्णय घेण्यात आला. *डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अत्यंत विश्वासू सहकारी व कामगार नेते श्री गणपत महादेव जाधव तथा मडकेबुवा यांच्या अध्यक्षतेखाली सन १९३३ मध्ये संगमेश्वर तालुक्यात कसबा (फाशीचा आंबा) व साडवली येथे जोरदार सभा झाल्या. या सभेत मडकेबुवांनी महार वतन, बलुते, गांवात भिक व सण मागणे, स्पृश्यांना जोहार घालणे अशा अनेक रुढी, परंपरा आणि समाजावर लाचारीचे जीवन लादणाऱ्या जातीयतेवर प्रखरपणे हल्ला चढविला. त्यांनी समाजाला अन्यायाविरोधी लढण्यासाठी संघटीत होण्याचे आवाहन केले._

      _या सर्व सामाजिक घडामोडीचा असा परिणाम झाला की *सन १९३३ सालात संगमेश्वर तालुक्यात*...._

१. संगमेश्वर महाल, 

२. फुणगुस महाल, 

३. देवरुख महाल, 

४. देवळे महाल 

*_आणि रत्नागिरी तालुक्यात...._*

५. हातखंबा महाल, 

६. बावीसखेडे महाल, 

७. पावस महाल, 

८. नेवरे महाल, 

९. केळये महाल, 

१०. हरचेरी महाल, 

११. धामणसे-तरवळ महाल, 

          _याप्रमाणे अकरा महालातील पूर्वाश्रमीचा महार समाज महालस्तरावर संघटीत झाला आणि त्यांनी सामाजिक सुधारणा चळवळीस सुरुवात केली._

_त्यावेळी *संगमेश्वर तालुक्यातील कार्यकर्ते रामजी सोमाजी कुरधुंडकर, भिवा रामा बेलारकर, रामजी काळू आंबेडकर, धर्मा काळू करजुवेकर, कृष्णा गोविंद कडवईकर, रामजी नामा साडविलकर, विठोबा चांगदेव कर्लीकर, गणपत सखाराम काटविलकर, मानका लक्ष्मण पुरयेंकर, तुकाराम धर्माजी दाभोळकर, सोमा तानू फुणगुसकर, रत्नू गुणाजी सोनारवाडकर, अर्जुन राजू उंब्रेकर, अर्जुन राघो निगुडवाडकर, विठ्ठल रामा डिंगणकर, रावजी सुभाना धामापुरकर, महादू रामजी नांदलजकर, पांडू बोरसुतकर, बुधा भागा सायेलकर, रत्नू रामजी कुचामकर, पांडु धर्मा शिनगारपूरकर, बाबू भिवा ईलकर*_

      _*या बावीस पुढाऱ्यांनी डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचा शहरात व खेडोपाडी जोरदार प्रचार केला आणि लोकांना संघटीत करुन सन १९३५ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मौजे देवरुख येथे सामाजिक परिषद घडवून आणली.* या परिषदेला खेडया-पाडयांतून स्त्री-पुरुष, शेतमजूर, कामगार, चाकरमनी मोठ्या संख्येने, आशेने, हिमतीने सामर्थ्यानिशी हजारोंच्या संख्येत हजर होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, या गगनभेदी घोषणांनी सारा देवरुख परिसर दुमदुमला होता. लोकांच्या गर्दीने गजबजला होता. *या परिषदेची सर्व व्यवस्था श्री. पांडुरंग गुणाजी पाटगांवकर यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख ठेवली होती. या परिषदेत डॉ. बाबासाहेबांचे जवळचे, जिव्हाळयाचे सहकारी भिवा रामा बेलारकर यांनी तालुक्यातील बावीस पुढारी व जनतेच्या वतीने दलितांचे उद्धारकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना फेटा बांधला. त्यांना मानपत्र देण्यात आले.* यावेळी सन्मानार्थी उपस्थित जनतेने टाळयांचा कडकडाट केला. बाबासाहेबांच्या जय जयकारांच्या घोषणांनी आसमंत भरुन पावला. आपल्या नेत्याच्या सन्मानाने कार्यकर्ते, जनता धन्य झाली._

            _*डॉ. बाबासाहेब परिषदेला मार्गदर्शन करताना म्हणाले, तुम्ही गरीब आहात, दरिद्री आहात हे खरे आहे. घाणीची कामे करण्यासाठीच तुमचा जन्म झाला आहे असे सवर्णांचे मत बनले आहे. त्यामुळे गावाची घाण तुम्ही उचलू नका. स्वतःचे घर स्वच्छ ठेवा, मुलांना शिकवा, मृतमांस खाऊ नका, मेलेली गुरे-ढोरे ओढू नका, त्यामुळे तुमच्याविषयी सवर्णांच्या मनात घृणा निर्माण झाली आहे. तुमच्या जमिनी गहाण टाकू नका, परिश्रमाने गरीबीवर मात करा. महारकीकरिता तुमचे स्वतःचे स्वत्व गमाऊ नका, स्वाभिमानाने जगा. निर्धाराने अत्याचाराचा मुकाबला करा. देव-देवस्कीच्या कल्पनेतून बाहेर पडा. कोणीही देव तुमचे कल्याण करणार नाही. मांत्रिक तांत्रिकावर विश्वास ठेवू नका. स्त्रीयांनी चांगले रहाण्याची सवय अंगी बाणवली पाहिजे, त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण तयार होईल. पुढे त्यांनी खोती पद्धती, वतनदारीमुळे दलितांचे कसे हाल होत आहेत या विषयीची वस्तुस्थिती मांडली आणि शेतकऱ्यावर होणाऱ्या अन्यायाचे विदारक चित्र परिषदेसमोर उभे केले. हिंदू सनातनी अन्यायी वृत्तीचा त्यांनी तीव्र शब्दात धिक्कार केला. डॉ. बाबासाहेबांच्या या मर्मभेदी भाषणाने सर्व जनता मंत्रमुग्ध झाली.*_

_*दुसरी महत्वाची घटना म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिनांक १७ सप्टेंबर १९३७ या दिवशी मुंबई प्रांतिक विधीमंडळात खोतीव्यवस्था निर्मुलन विधेयक सादर केले आणि खोतीपद्धत रद्दबातल करण्याची मागणी जोरकसपणे मांडली. या विधेयकासंबंधी विशेषतः कोकण प्रांतात शेतकरी व कामकरी वर्गाला वेळोवेळी संबोधीत केले. मौजे देवरुख येथे दिनांक १५ मे १९३८ रोजी भरविण्यात आलेल्या शेतकरी सभेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या प्रमुख पुढारी मंडळीसह उपस्थित राहीले. या सभेला स्पृश्य-अस्पृश्य शेतकरी बांधवांसह मुसलमान शेतकरी बांधवही हजारोंच्या संख्येने उपस्थित होते._*

         _या सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर शेतकरी वर्गाला उद्देशून म्हणाले, त्यांच्या विधेयकाचा हेतू खोती बिल पास करणे आणि शेतकरी वर्गाची गरीब परिस्थिती सुधारणे हा आहे. शेतकऱ्यांनी आपला सनदशीर लढा लढावा व तो लढत असता सर्व बाजूंनी शेतकऱ्यांनी आपली संघटना करावी. काँग्रेसने जर खोती बिल नामंजूर केले तर पुढे सत्याग्रह मोहिमेस शेतकऱ्यांनी सज्ज राहावे. बहुसंख्यांक असा शेतकरी व कामकरी वर्ग या देशाचा खरा सत्ताधारी वर्ग बनला पाहिजे आणि त्याच दृष्टीने स्वतंत्र मजूर पक्ष धडाडीने कार्य करावयास पुढे सरसावलेला आहे. डॉ. बाबासाहेबांच्या या ओजस्वी वाणीने शेतकरी वर्गात नवचैतन्य निर्माण झाले आणि त्यांना त्यांचा तारणहार नेता गवसला; या आत्मविश्वासाने जय आंबेडकर, खोतीशाही नष्ट होवो या गगनभेदी घोषणांनी गरजला._

*_डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक कमिटी, मुंबई (विभाग देवरुख)_*

           _*मुक्काम देवरुख येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक बांधणे, देवरुख विभागातील बौद्धांच्या सर्वांगीण उनतीसाठी प्रयत्न करणे, विद्यार्थी वसतीगृह चालविणे, प्रचारासाठी आवश्यक ते साहित्य प्रकाशित करणे इत्यादी ध्येय-उद्देशपूर्तीसाठी दिनांक २ ऑक्टोबर १९५८ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक कमिटी, मुंबई (विभाग, देवरुख, ता. संगमेश्वर) ही संस्था अस्तित्वात आली आणि या संस्थेची सन १९५९ मध्ये धर्मादाय आयुक्त कार्यालय, मुंबई येथे मुंबई विश्वस्त कायदा व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम अंतर्गत नोंदणी करण्यात आली.*_

         _*सर्वश्री भिकाजी बाबू कांबळे, बाळू पांडुरंग जाधव, पांडुरंग भाऊराव कांबळे, देवराज अर्जुन कांबळे, गणपत हीराजी कांबळे, लक्ष्मण भागुराम जाधव, गणपत सखाराम जाधव, गोविंद शिवा कांबळे, भिवा रामा जाधव, सदाशिव गणपत कांबळे, अर्जुन विठ्ठल कर्लीकर, धर्माजी गोपाळ जाधव, विठ्ठल शिवराम जाधव, गुणाजी भोरु कांबळे, तुकाराम धर्माजी जाधव, कमळाकर भिकाजी मोहिते, लक्ष्मण काळया जाधव, भिकू गंगाराम ताम्हणकर, हरिश्चंद्र देवू गमरे, भागुराम बाळाजी जाधव, रावजी देवजी जाधव, महादेव रावजी जाधव, गणपत धर्मा जाधव, यशवंत महादेव जाधव, रावजी राघो कदम, बाबू सादू जाधव, रत्नू जानू जाधव, विश्राम बाळू कांबळे, गेणू राजू कांबळे, विठ्ठल सोनू मोहिते, दौलत भागोजी मोहिते, कानू गौरा जाधव, सावळाराम देवू गमरे, अमृता गणू जाधव, गंगाराम अमृता जाधव, रोंगा राघू जाधव, पंडया दाजी जाधव, विठ्ठल भाऊराम कांबळे, रामचंद्र नामेदव जाधव, बाळू नामेदव कांबळे, शिवराम रामजी शिगवण, तुकाराम जानू जाधव, धोंडीराम सखाराम जाधव, गोपाळ रोंगाजी जाधव, रावजी लक्ष्मण जाधव, देवू सजना पवार, रामचंद्र जानू कदम, बाबूराव पांडूरंग जाधव, सिताराम राघो कांबळे, बुधाजी बाळू कांबळे, रावजी गोविंद कांबळे हे सर्व मान्यवर देवरुख विभाग संस्थेचे संस्थापक सदस्य आहेत.*_

             _या संस्थेचे पहिले कार्यकारी मंडळ येणे प्रमाणे होते. अध्यक्ष-लक्ष्मण भागुराम जाधव, उपाध्यक्ष-भिवा रामा जाधव, जनरल सेक्रेटरी-अर्जुन विठ्ठल कर्लीकर, दुय्यम सेक्रेटरी-धर्माजी गोपाळ जाधव, खजिनदार - गुणाजी भोरु कांबळे, दुय्यम खजिनदार बाबूराव पांडुरंग जाधव, सभासद-तुकाराम धर्माजी जाधव, कमळाकर भिकाजी मोहिते, एस. आर. जाधव, पांडुरंग भाऊराव कांबळे, गणपत हिराजी कांबळे, देवराम अर्जुन कांबळे, गंगाराम भागुराम जाधव, विठ्ठल शिवराम जाधव, गणपत सखाराम जाधव, सदाशिव गणपत कांबळे, बाळू पांडुरंग जाधव, गोविंद शिवा कांबळे, लक्ष्मण काळया जाधव, भिकाजी बाळू कांबळे, भिकाजी गंगाराम कांबळे, सिताराम राघो कांबळे, शिवराम रावजी शिगवण._

         _*संस्थेने मुक्काम देवरुख येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह बांधण्यासाठी माहे फेब्रुवारी १९६० मध्ये जमीन खरेदी केली आणि या खरेदीखतपत्रावर संस्थेचे उपाध्यक्ष भिवा रामा जाधव यांनी स्वाक्षरी केली. त्याच ठिकाणी देवरुख विभाग ३६ गावे ग्रामिण व मुंबई बौद्धजन भावकी संघटनांच्या सहकार्यातून "डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहाची" उभारणी झाली आणि संस्थेच्या उद्देशपूर्तीचा पहिला टप्पा पुर्णत्वास गेला.*_

             _मौजे देवरुख येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह हे एक आंबेडकरी चळवळीचे केंद्र आहे. येथूनच संगमेश्वर तालुक्यातील डॉ. आंबेडकर प्रणित सामाजिक, राजकीय, धार्मिक व सांस्कृतिक चळवळीला दिशा देण्याचे काम केले जाते. *डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली सन १९३५ मध्ये पार पडलेली सामाजिक परिषद, दिनार्क १५ मे १९३८ रोजी शेतकरी वर्गाची सभा पार पडली.*_

             _या महत्वपूर्ण घटना देवरुख परिसराचे ऐतिहासिक महत्व अधोरेखीत करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मशताब्दी वर्षात (सन १९९१-९२) देवरुख येथे त्यांचा उभारण्यात आलेला पुर्णाकृती पुतळा हे आंबेडकरी समाजाचे प्रेरणादायी स्फूर्तीस्थान आहे. या अनेक गोष्टीमुळे मौजे देवरुख परिसराला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे._

            _या संघटनेच्या वतीने सन २००१ मध्ये निवड झालेल्या श्री. श्रीपत ल. मोहिते यांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारी मंडळाच्या अधिपत्याखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह इमारतीची पुर्नबांधणी करण्यात आली आणि यावेळी सभागृहाला आंबेडकरी चळवळीला साजेसे अनुरुप देण्यात आले आहे. या नवीन सभागृह इमारत उभारणीत सर्वश्री वाय. जी. पवार, राजाराम रा. कदम, यांचे महत्वपूर्ण योगदान आहे._

              _देवरुख विभाग (मुंबई/ग्रामिण) संघटनेच्या वाटचालीत व कामकाजात सर्वश्री भरत बा. जाधव (कुडवली), श्रीपत ल. मोहिते (तुळसणी), प्रदिप का. कांबळे (सोनारवाडी), डी. के. जाधव (पाटगांव), हिराजी सि. मोहिते (तुळसणी), प्रकाश गु. कांबळे (तळेकांटे), विलास शिवगण (हातीव), अनंत स. जाधव (निवे), सुरेश शि. शिगवण (हातीव), प्रकाश स. मोहिते (आंबवली), भरत ल. जाधव (बेलारी), विठ्ठल मोहिते (तुळसणी), सुधाकर र. कांबळे (तळेकांटे), पांडुरंग कांबळे (फणसट), देवजी बा. जाधव (खडीनिवे), अजित सो. कांबळे (तामनाळे), अशोक जाधव (आंगवली), चंद्रकांत दे. जाधव (निगुडवाडी), प्रदिप का. जाधव (सोनारवाडी), गणपत ह. कांबळे (खडी ओझरे) शंकर रत्नू जाधव (कर्ली), प्रकाश पवार (बोंडये), प्रकाश ज. मोहिते (तुळसणी), रमेश गो. जाधव (विघ्रवली), यशवंत वि. जाधव (कर्ली), सदानंद भि. कांबळे (तामनाळे) व्ही.एच. कांबळे (तामनाळे), डी. एस. सकपाळ (देवधामापूर), विजय गौ. मोहिते (साडवली), बी. व्ही. जाधव (आंगवली), एस. आर. जाधव (कर्ली), विलास कृ. पवार (बोंडये), दिलीप ग. कांबळे (फणसट), दिपक शि. शिगवण (हातीव), संतोष द. जाधव (काटवली), दिपक ज. कांबळे (वायंगणे), संतोष गं. कांबळे (हरपुडे), दिलीप का. मोहिते (आंबवली), अनिल ना. जाधव (काटवली), सचिन भ. जाधव (निवेखुर्द), बबन शं. मोहिते (साडवली), प्रशांत वि. जाधव (बामणोली), शशिकांत स. जाधव (ताम्हाणे), नंदु दे. जाधव (देवघर), दिलीप बा. कदम (देवरुख), प्रशांत वि. जाधव (बामणोली), वाय. जी. पवार (बोंडये), राजाराम कदम (देवरुख), कृष्णा कदम (देवरुख), चंद्रकांत बा. जाधव (कुडवली), संजय मोहिते (आंबवली), बी. आर. कांबळे (हरपुडे), कमलाकर ह. कांबळे (माळवाशी) या अनेक कार्यकर्त्यांचा सहभाग व योगदान आहे._

        _श्री. अशोक भि. जाधव (निवेबु।।) यांच्या अध्यक्षतेखाली खाली कार्यकारी मंडळ सद्या कामकाज करीत आहे._

१) अशोक भिकाजी जाधव (अध्यक्ष)

२) संजय रामचंद्र मोहिते (उपाध्यक्ष)

३) मनोहर शिवराम मोहिते (उपाध्यक्ष)

४) रमेश बाबू जाधव (उपाध्यक्ष)

५) सुनिल श्रीपत जाधव (सेक्रेटरी)

६) संदिप गोविंद पवार (उपसेक्रेटरी)

७) संतोष दत्ताराम जाधव (उपसेक्रेटरी)

८) महेश हरिश्चंद्र कांबळे (उपसेक्रेटरी)

९) विलास कृष्णा पवार (खजिनदार)

१०) दिलीप रामचंद्र कदम (उपखजिनदार)

११) दिलीप काशिराम मोहिते (हिशोब तपासणीस)

१२) राहूल शिवराम गमरे (सल्लागार)

१३) मिलिंद तुकाराम जाधव (सल्लागार)

१४) भालचंद्र रघुनाथ कांबळे (सल्लागार)

१५) अनिल सोमा जाधव (सल्लागार)

१६) संजय विठ्ठल कांबळे (सल्लागार)

१७) अनिल नारायण जाधव (सभासद)

१८) कमलाकर हरी कांबळे (सभासद)

१९) प्रकाश गणपत जाधव (सभासद)

२०) संदीप यशवंत जाधव (सभासद)

२१) रमेश बाळू कांबळे (व्यवस्थापक)

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संकलन :- महेश कांबळे (तळेकांटे)_*

*_संदर्भ :- संगमेश्वर तालुका - डॉ. आंबेडकर प्रणित सामाजिक चळवळ : वास्तव आणि वाटचाल_*

*_मुळ लेखक :- वि ल मोहिते_*

*_दिनांक :- २०/०५/२०२५_*

*_टिप :- संगमेश्वर तालुक्यातील आंबेडकरी चळवळीचा इतिहास अभ्यासाचा असेल तर वरील पुस्तक अभ्यासावे_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

No comments:

Post a Comment

Things that are in a house

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌺🌺🌺💐 *_Things that are in a house_* *_गेह भण्डानी_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/12/things-that-are-in-house.h...