✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
*_धम्मविमुत्ति, कुशीनगर (उ. प्र) धर्मयात्रा_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2025/03/blog-post_2.html
✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
(धर्मयात्रेदरम्यान जुन्या साधकांसाठी पूज्य गुरुजींचे प्रवचन)
माझ्या प्रिय विपश्यी साधक-साधिकांनो !
_आज आम्ही एक अशा महत्वपूर्ण स्थानावर एकत्र झालो आहोत, जिथे एका महापुरुषाची खूप दीर्घ यात्रा पूर्ण झाली. *अनंत कल्पांपूर्वी हा मानव ब्राह्मण सुमेधच्या नावाने एक तपस्वी होता. त्यावेळी जगात दीपंकर नावाचे सम्यक संबुद्ध उत्पन्न झाले होते. हा मानव त्यांच्या संपर्कात आला, तेव्हा याच्या मनात खूप मोठा धर्म संवेग जागला "मीसुद्धा याच प्रकारे सम्यक संबुद्ध बनलो, तर माझ्याद्वारे कित्येकांचे कल्याण होईल." या धर्म संवेगाच्या आधारावर तो आपली धर्म कामना दीपंकर सम्यक संबुद्धांच्या समोर प्रकट करतो.*_
_अनेक लोक असे असतात, जे एखाद्या सम्यक संबुद्धांना पाहून मनात असे भाव जागवतात की हे जगाचे किती कल्याण करत आहेत. मीसुद्धा या अवस्थेवर पोहोचून जगाचे कल्याण करु शकीन, असे भाव जागल्यावर तो आपली भावना त्या वेळच्या सम्यक संबुद्धांसमोर प्रकट करतो._
१. *सम्यक संबुद्ध पाहातात की हा खरोखर या लायक आहे अथवा नाही? सध्या लायक नाही, तर केवळ स्मितहास्य करतील.*
२. *जर पाहातील की लायक आहे, तर याच्यात लोक सेवेचा जो भाव जागला आहे, तो स्थायी आहे काय? अथवा या वेळच्या परिस्थितीत जागला आहे. उद्या समाप्त होईल काय? याच्या भावनेत दृढता किती आहे?*
३. *दुसरी बाब ही पाहातात की याच्यात किती क्षमता आहे? काय क्षमता आहे?*
४. *पूर्वीच्या अनेक जन्मात याने आपल्या पारमिता पूर्ण केल्या आहेत काय? हो, तर किती? जर त्याने इतक्या पारमिता पूर्ण केल्या आहेत की सम्यक संबुद्ध त्याला त्या वेळी विपश्यना शिकवतील तर साधना करत-करत तो भवमुक्त होईल. अरहंत होईल, तेव्हा त्याचे भविष्य पाहातात.*
_हा या लायक आहे की आजही मुक्त होऊ शकतो आणि तरीही त्याची इच्छा आहे की मी सम्यक संबुद्ध बनावे.
५. *हे समजून की सम्यक संबुद्ध बनण्यात त्याच पारमिता किती मोठ्या मात्रेत एकत्र कराव्या लागतात, अनंत जन्मांपर्यंत काम करावे लागते. पारमितांना अधिकाधिक पूर्ण करण्यात किती वेळ लागतो!*
६. *याच्यात खरोखर त्यागाची भावना आहे काय? जो त्या अवस्थेपर्यंत पोहोचला आहे तो चांगले जाणतो की मी याच वेळी यांच्या शिकवणूकीद्वारे मुक्त अवस्था प्राप्त करु शकतो. परंतु त्याच्या हातात आलेली मुक्ती तो त्यागतो. माझ्या एकट्याच्या मुक्त होण्याने काय होईल ? जसे यांनी बोधिसत्वांच्या रुपाने आपल्या अनेक जन्मात लोक कल्याण केले आणि आपल्या पारमिता वाढवीत गेले. अरे, मीसुद्धा याच प्रकारे अनेक जन्मात कितीही कष्ट झाले तरीही, आपल्या पारमितांना वाढवीत-वाढवीत-वाढवीत त्या अवस्थेपर्यंत पोहोचीन की जिथे मी सम्यक संबुद्ध बनीन._
एकीकडे ही बलिदानाची भावना हातात आलेल्या मुक्तीला त्यागतो आणि दुसरीकडे अनेक प्राण्यांच्या भल्यासाठी अनेक जन्मांचे कष्ट सहन करण्यास तयार आहे. ते पाहातात की खरोखर हा या लायक आहे, तेव्हा त्याचे भविष्य पाहातात किती कालावधीनंतर हा सम्यक संबुद्ध बनू शकेल. *तेव्हा त्याला आशीर्वाद देतात आणि भविष्यवाणी करतात की इतक्या कल्पांनंतर या घरात, या नावाने जन्म घेऊन तू सम्यक संबुद्ध बनशील ! तू कपिलवस्तूत शुद्धोधनाच्या घरी, महामायेच्या पोटी जन्म घेशील आणि त्या वेळी सम्यक संबुद्ध बनू शकशील.* तेव्हापासून हा जन्मांवर जन्म घेत आहे, कधी या योनीत, कधी त्या योनीत. भिन्न-भिन्न योनीत, त्या योनीच्या लोकांना, त्या प्राण्यांना धर्माकडे उन्मुख करण्यासाठी, त्याच्यांत धर्माची चेतना जागवण्यासाठी. तसेच आपल्या पारमितांना अधिक पुष्ट करण्यासाठी किती वेळ लागला? मोजमाप नाही!! इतका कालावधी लागल्यानंतर सिद्धार्थ गौतम नावाने जन्म झाला. *शरीरलक्षण जाणणाऱ्यांनी म्हटले की हा घरी राहिला तर चक्रवती सम्राट होईल, घर सोडेल तर सम्यक संबुद्ध होईल. त्यांना चक्रवती सम्राट बनावयाचे नव्हते. त्यांना तर सम्यक संबुद्ध बनायचे होते. सम्यक संबुद्ध बनले.*
_बोधगयेत बोधिवृक्षाखाली त्यांना सम्यक संबोधी प्राप्त झाली, मुक्त अवस्था प्राप्त झाली. इतक्या जन्मांपर्यंत लोकसेवाच लोक सेवा, लोकसेवाच लोकसेवा. जेव्हा २९ वर्ष वय होते, तेव्हा घर सोडले, ३५ वर्षाच्या अवस्थेत सम्यक संबुद्ध बनले. त्यानंतर ४५ वर्ष, रात्रंदिन लोकसेवाच लोकसेवा. *रात्री केवळ एक प्रहर (अडीच ते साडेतीन तास दिवस व रात्र ४-४ प्रहराचे मानले गेले आहेत.) झोपायचे* सतर्क राहून, संप्रज्ञानी राहून, बाकी वेळ लोकसेवाच लोकसेवा. *किती करुणा, या सर्व करुणेच्या बळावर लोकसेवा करीत या स्थानावर शरीराचा त्याग केला, ज्याला 'महापरिनिर्वाण' म्हटले गेले.*
_*निर्वाण म्हणतात त्या अवस्थेला जिथे इंद्रिय काम करणे बंद करतात. विपश्यना करत करत ती अवस्था येते. मनाचे विकार निघत-निघत ते सर्व कर्मसंस्कार जे आम्हाला अधोगतीकडे घेऊन जातात, जेव्हा ते सर्व समाप्त होतात, तेव्हा पहिल्यांदा निर्वाणिक अवस्थेचा साक्षात्कार होतो. तेव्हा त्याला 'स्रोतापन्न' म्हणतात, आता त्याच्यासाठी अधोगतीचे द्वार बंद झाले. तो जास्तीतजास्त सातदा जन्म घेईल, त्यापेक्षा अधिक नाही, त्यापेक्षा कमी जन्म होऊ शकतील. अजून पुढे जाईल तर 'सकदागामी' होईल, आता तो केवळ एकदा जन्म घेईल, या कामलोकात म्हणजे मनुष्यलोकात अथवा देवलोकात. 'अनागामी' झाला तर कामलोकातही नाही, आता केवळ ब्रह्मलोकात जन्म घेईल आणि त्यापुढे डुबकी लागली, तर 'अरहंत' झाला. तो सर्व लोकांपासून मुक्त झाला. जेव्हा सम्यक संबुद्ध बनतात तेव्हा या चारही अवस्था एकानंतर एक अशा प्राप्त होतात. सम्यक संबुद्ध झाले, तर पूर्ण मुक्त झाले, ही निर्वाणाची अवस्था आहे. त्याला 'सउपधिसेस निर्वाण' म्हणतात. सध्या उपधी आहे, म्हणजे या जन्माला पुढे वाढवणारे कर्मसंस्कार आहेत. जे नवीन जन्म तर देणार नाहीत कारण 'अरहंत' झाले, परंतु या जन्मात या शरीराचे ओझे वाहण्यासाठी 'सउपधि' म्हणजे सध्या उपधी आहे. जेव्हा अशा महापुरुषांचे, अशा अरहंताचे शरीर शांत होते, तेव्हा त्यानंतर त्यांचा कोणताही जन्म होत नाही. म्हणजे 'अनुपधिसेस', आता कोणतीही उपधी नाही, कोणताही जन्म नाही. 'परिनिर्वाण' म्हणजे परिपूर्ण निर्वाण झाले. 'महापरिनिर्वाण' कारण असे महापुरुष आहेत म्हणून 'महापरिनिर्वाण' म्हटले गेले, ज्याला त्यांनी या स्थानावर प्राप्त केले.*_
_त्यांच्यात किती करुणा आहे! सर्व जन्मात करुणाच करुणा, करुणाच करुणा. तेव्हाच तर लोकसेवा करतील, अन्यथा कसे करतील? या जीवनातही करुणाच करुणा, करुणाच करुणा, महापरिनिर्वाणाची वेळ जवळ येत आहे. *तीन महिन्यांपूर्वी ही घोषणा केली, जेव्हा की ते वैशालीत होते, की येत्या 'वैशाखी पौर्णिमे'ला, म्हणजे तीन महिन्यानंतर मी शरीर त्याग करीन.* तेथून चालत चालत इथपर्यंत आले. रस्त्यात एक दिवसाअगोदर 'चुंद' नावाच्या गृहस्थाने त्यांना भोजनदान दिले. ते भोजन अशा अळंब्यांचे होते, जे विषारी असतात. त्यांनी स्वतः तर खाल्ले, पण भिक्षुंना देण्यापासून थांबवले अजून कोणी खाऊ नये. त्यांचे तर 'परिनिर्वाण' व्हायचेच होते, पण करुणा जागते त्या चुंदवर. अरे, माझ्यानंतर लोकांनी चुंदला वाईट म्हणू नये "अरे चुंद! तू कसा वेडा आहेस! तू असे भोजन दिलेस की भगवानांचे शरीर शांत झाले लोक असे न म्हणोत. त्यामुळे आनंदाला म्हणतात "माझ्यानंतर तू जाऊन म्हणशील त्या चुंदला की तू खूप मोठे पुण्याचे काम केले आहेस." *सम्यक संबुद्ध बनण्यापूर्वीचे जे भोजन असते, खूप पुण्यशाली असते. जसे सुजाताने त्यांना खीर दिली, ते सम्यक संबुद्ध बनण्यापूर्वी. तसेच जे अंतिम भोजन असते तेसुद्धा तितकेच पुण्यशाली असते. इतक्या जन्मांपर्यंत भवसंसरण करत-करत आता हे भवचक्र समाप्त होईल, तर खूप पुण्य आहे. त्याच्या मनावर आघात होऊ नये. लोकांनीही त्याच्याबाबत अशी काही चर्चा करु नये. किती करुणा आहे! किती करुणा आहे!*_
_इथे एका जुळ्या साल वृक्षाखाली थांबून म्हटले, "बस मी इथेच झोपीन. 'आनंद ! सकाळ होता होता प्राण जातील, महापरिनिर्वाण होईल. जवळपास मल्लांचे गणराज्य आहे. त्यांना जेव्हा माहीत होईल की भगवान आमच्या गणराज्यांच्या इतके जवळ आले आणि इथे त्यांनी प्राण त्यागले. तेव्हा त्यांना वाटेल की त्यांनी अंतिम वेळी भगवानांचे दर्शन केले असते. त्यांना ही संधीच मिळाली नाही, तर ते तुला लांछित करतील. तू जा! त्यांना सुचना दे. आनंद गेले, सर्व शहरात सूचना पसरवली की उद्या पहाटे पहाटे भगवान बुद्ध 'महापरिनिर्वाणा'ला प्राप्त होतील._
_लोक तेथे येऊ लागले. इतके लोग येऊ लागले, नमस्कार करण्यासाठी. आनंदांनी इतकी मोठी गर्दी पाहिली, तेव्हा म्हणाले भाऊ ! काही लोक एकत्र होऊन बस नमस्कार करा आणि निघून जा. वेळ कुठे आहे? नमस्कार करा आणि निघून जा! या गर्दीत सुभद्र' नावाचा एक जण आला. तो म्हणतो की मी केवळ नमस्कार करण्यासाठी आलो नाही, मला तर त्यांच्याकडून विद्या शिकायची आहे. त्यांच्यानंतर न जाणे तुम्ही योग्य प्रकारे समजवू शकाल अथवा नाही, शिकवू शकाल अथवा नाही. आनंद म्हणाले, "तू वेडा झाला आहेस, आता त्यांची शरीर त्यागण्याची वेळ आहे. अशा वेळी तू त्यांना त्रास देऊ नकोस, आरामात त्यांना प्राण त्यागू दे. तो म्हणतो "नाही, मला तर त्यांच्याजवळून धर्म शिकावयाचा आहे." हे म्हणतात" नाही, तुला नमस्कार करायचा असेल तर कर, नाही तर बाजूला हो. इतरांना पुढे येऊ दे." *हे शब्द भगवानांच्या कानावर पडतात. कोणी तहानलेला गंगेच्या जवळ आला आणि दुसरा त्याचा हात पकडून म्हणतो पाणी पिऊ नकोस, गंगेला नमस्कार करुन निघून जा. तेव्हा गंगेत पूर येतो "अरे, आनंद! येऊ दे. हा योग्य पात्र आहे. याला मला धर्म शिकवू दे" आणि सुभद्रला धर्म शिकवतात. जे आपल्या शरीराचा त्याग करतांनाही इतक्या करुणेने भरलेले आहेत. अरे, एकाचे तर कल्याण व्हावे! याचे कल्याण व्हावे! हे लक्षण आहे. महापुरुषाचे, करुणेने भरलेले असतात.*_
_*या स्थानावर अजूनही महत्वपूर्ण घटना घडल्या. एक महत्वपूर्ण घटना ही घडली की एकाने विचारले "महाराज! आपल्यानंतर आपला उत्तराधिकारी कोण होईल? "कोण होईल रे? उत्तराधिकारी कोण होईल? उत्तराधिकारी धर्म होईल. जो धर्म मी शिकवला आहे, तो तुमचा आचार्य होईल, गुरु होईल. जिथे कोणा एखाद्याला उत्तराधिकारी बनवले की पंडेगिरी चालेल, पुरोहितगिरी चालेल. कोणी जोपर्यंत त्या उंच अवस्थेपर्यंत पोहोचला नसेल, तोपर्यंत एक नशा, धुंदी राहते की जसे सर्व भगवान बुद्धांचा सन्मान करतात, तसेच आता मी त्यांच्या गादीवर बसलो आहे. तर माझाही तसाच सन्मान झाला पाहिजे, ही धुंदी धर्माला घेऊन बुडते. त्यामुळे कोणी उत्तराधिकारी नाही, धर्मच उत्तराधिकारी आहे. धर्माचे जो पालन करेल, तो आपले कल्याण करेल. धर्म चांगल्या प्रकारे समजावला गेला आहे, अजून काय पाहिजे?*_
_*अजून एक महत्वपूर्ण घटना घडली. *त्यांचे 'महापरिनिर्वाण' झाले तर त्यांचे प्रमुख शिष्य 'महाकाश्यप, जे जरा दूर अंतरावर होते, सात दिवसांच्या यात्रेनंतर पोहोचतील. त्यांच्या येण्यापर्यंत भगवानांच्या शरीराची दाहक्रिया करण्यात आली नाही. काश्यप आपल्या ५०० सहकाऱ्यांसह येत आहेत. त्यापैकी 'सुभद्र' नावाचा नवीन भिक्षु, खूप वृद्ध, वय मोठे परंतु धर्मात खूप कच्चा, तो खूप आनंदी आहे "चांगले झाले, तो म्हातारा मेला. त्रासून टाकले होते असे करा, असे करु नका आता तो गेला, आम्हाला सूट आहे, आम्ही वाट्टेल ते करु. आमच्या मनात जे येईल तेच करु. मनात जे येणार नाही ते करणार नाही." काश्यपांनी पाहिले जरी सर्व संघ खूप परिपक्व आहे, पण संघात असे वेडे लोकही आहेत. त्यांच्या जाण्यानंतर तर या प्रकारचे लोक भगवानांनी जे म्हटलेही नाही, ते त्यांच्या मुखातून आले असे म्हणतील भगवानांनी हे म्हटले, असे म्हटले, असे म्हटले... तसेच जे म्हटले ते त्यांच्या अनुकूल नाही, तर त्याला काढून टाकतील. तर असे लोक धर्माला नष्ट करतील. तर काय करावे? हो, भगवानांची जितकी वाणी आहे, ती सर्व संग्रहित केली जावी.*_
_*सात दिवसांनंतर जेव्हा दाहकर्म, क्रियाकर्म पूर्ण झाले, त्याच्या तीन महिन्यानंतर, जेव्हा आम्ही राजगीरला गेलो होतो तेव्हा तेथे काही लोक वरच्या 'सतपर्णी गुफेत गेले असतील, तिथे पहिले संगायन झाले होते. ५०० अशा भिक्षुंनी जे बुद्धांच्या खूप समीप होते आणि अरहंत होते, त्यांनी बसून बुद्धवाणीचे संगायन केले. बुद्धांनी काय म्हटले? असे म्हटले, असे म्हटले, सर्व म्हणतील हो, असे म्हटले, असे म्हटले. विनयाची शिकवणूक म्हणजे भिक्षूंच्या नियमांची जी शिकवणूक होती, तिला 'उपाली' जे भिक्षूचे मोठे आचार्य होते आणि भिक्षूंच्या नियमांना उत्तम जाणत होते, त्यांनी त्यांचा पाठ केला, बाकी सर्वांनी स्वीकार केला. आनंदांना बाकी सर्व बाबींचे ज्ञान होते, त्यांनी पाठ केला, लोकांनी स्वीकार केला. ही खूप मोठी बाब झाली! त्या दिवसात काही प्रिंटिंग प्रेस तर नव्हता, कागदही नव्हता. इतके विशाल साहित्य, थोडेसे नाही. इतके विशाल साहित्य लोक पाठच तर करतील आणि आठवणीत ठेवतील. अन्यथा कोणी म्हणेल नाही, मला तर असे स्मरण आहे, कोणी म्हणेल असे तर बिघडले सर्वच्या सर्व. ऑथेंटिक काय आहे? प्रामाणिक काय आहे? असे आम्ही मिळून निश्चित करु भगवानांची ही प्रामाणिक वाणी आहे. यात कोणी आपल्याकडचे काही जोडू नये, आपल्याकडून काही काढू नये. ही प्रथम संगीती, हिने धर्माला जीवंत ठेवले. यानंतर तर ही परंपरा सुरु राहिली. पुन्हा दुसरी संगीती झाली, तिसरी झाली, चवथी झाली, पाचवी झाली, आणि आता भगवान बुद्धांच्या २५०० वर्षानंतर ब्रह्मदेशात सहावी संगीती झाली. या वेळी जी बुद्ध वाणी, त्रिपिटक, पाली भाषेत, जगात जिथे जिथे होती, पाच देशातच होती ब्रह्मदेश, श्रीलंका, थाईलैंड, कम्बोडिया आणि लाओस येथे. तेथील २५०० विद्वान भिक्षूंना एकत्र केले गेले. चला ! आम्ही पारायण करु बुद्ध वाणीचे, सर्वांचे एक मत झाले पाहिजे.*_
✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
*_लेखक :- कल्याणमित्र सत्यनारायण गोयन्का_*
_बुद्धवर्ष २५६०, चैत्र पौर्णिमा, ११ एप्रिल, २०१७ वर्ष १, अंक १_
*_संकलन :- महेश कांबळे_*
*_दिनांक :-_* ०३/०३/२०२५
✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
No comments:
Post a Comment