Saturday, 8 February 2025

धर्म काय आहे ? भाग २

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_धर्म काय आहे ?_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2025/02/blog-post_8.html

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

(पूज्य गुरुदेव श्री सत्यनारायण गोयन्काजींनी प. महाराष्ट्राचे विख्यात शहर नाशिक येथील रमाबाई आंबेडकर गर्ल्स हाईस्कूल' च्या प्रांगणात सन १९९८ ला दिलेल्या तीन दिवसीय प्रवचन शृंखलेच्या प्रथम प्रवचनाचा दुसरा भाग)

_कोणताही मनुष्य दुःखी जीवन जगू इच्छित नाही. परंतु शुद्ध नाही सखोलतेने बाब समजत नाही, त्यामुळे तो वारंवार आपल्या मनात विकार जागवतो, वारंवार व्याकुळ होतो. तो बसून एखाद्या बाबीचे चिंतनही करत असेल तरी त्या विचारांसोबत विकारही चालत आहेत. जळत्या आगीत अजून पेट्रोल टाकत आहे. अरे, काय करु लागलास?_

_*उपदेशांमुळे काहीही होत नाही भाऊ ! मीसुद्धा आपल्या जीवनाची खूप वर्ष अशा उपदेशात घालवली. ऐकणे व ऐकवण्यात खूप वेळ घालवला. पाहिले की थोड्या वेळासाठी काही ज्ञान जागते.* जसे स्मशान भूमीत एखाद्या प्रिय मित्राचे शरीर चितेवर ठेऊन जाळले जातांना किती ज्ञान जागते अरे, एक दिवस लोक माझ्या शरीरालाही येथे आणून असेच जाळतील. हा मनुष्य आपल्यासोबत काहीही घेऊन गेला नाही, सर्व धनदौलत येथेच सोडून गेला. मीसुद्धा याचप्रकारे जाळला जाईन. कशासाठी हाय-हाय करतो! कशासाठी माझे-माझे करतो, अहंकार करतो, कसे जीवन जगतो ! खूप ज्ञान जागले. हे स्मशान ज्ञान आहे भाऊ ! त्याच्या एक पाऊल बाहेर पडलो तर तशाचा तसाच, मी माझे, तू तुझे. सर्व विसरला कारण ती बुद्धीच्या स्तरावर थोड्या वेळपर्यंत समजण्याची गोष्ट होती.._

_ठीक तसेच या धर्मसभांमध्ये जर कोणी केवळ बुद्धिरंजन, बुद्धिविलास, वाणीविलासासाठी आले तर काहीही मिळत नाही. मी हा माझा अनुभव सांगतो व हजारो जणांचा अनुभव सांगतो. थोडा वेळ बाब खूप चांगली वाटेल. अरे, ही बाब तर खूप चांगली आहे. आम्ही आपल्या मनाला विकारांनी विकृत करु नये. विकृत केले तर आम्ही स्वतः व्याकुळ होतो. आपल्या मनात सद्भावना जागवली पाहिजे, सद्‌गुण जागवले पाहिजेत. आम्हीही प्रसन्न राहू व इतरानांही प्रसन्न करु, अरे, बाब खूप छान आहे. पण किती वेळ? बाहेर आलात, पुन्हा जसेचे तसे._

_याला बदलण्यासाठी काय केले? वरवरच्या उपायांनी आम्हाला थोडा वेळ बरे वाटते. आपल्या मनाला एखाद्या भजन-कीर्तनात, नाम-जपात अथवा कर्मकांडात लावले वा या प्रकारच्या धर्म सभेत जाऊ, थोडा वेळ धर्माच्या बाबी ऐकू, मनाला थोडी शांती मिळेल. चला, थोडा वेळ मनाला एखाद्या चांगल्या कामात लावले. मग काय झाले ?_

_*आमच्या मनाचा जो वरवरचा भाग आहे त्याला भारताच्या जुन्या भाषेत परित्त चित्त म्हणायचे. परित्त चित्त म्हणजे परिमित चित्त, खूप छोटेसे चित्त आहे. त्याला आम्ही चांगुलपणाकडेही घेऊन जातो, वाईटपणाकडेही नेतो. त्यामुळे काही फरक पडत नाही. परंतु जे आतील चित्त आहे, ज्याला अंतर्मन म्हटले, अरे, त्याचा हिस्सा खूप मोठा असतो आणि त्याच्यापर्यंत हा संदेश (message) जातच नाही. जो संदेश आम्ही आपल्या (conscious mind) वरच्या चित्ताला देत आहोत, तो वरच्या चित्तापर्यंतच सीमित राहतो, थोडासा आत जातो (penetrate) बस. यानंतर तोच अंधकार. आतील मन तर तसेचे तसेच. थोडीशी नावडती अनुभूती झाली की एकदम प्रतिक्रिया करेल द्वेष, द्रोह, दुर्भावनेची अथवा थोडेसे आवडते झाले की आसक्ती करेल. हा त्याचा स्वभाव आहे. आवडत्याप्रती आसक्ती निर्माण करते, नावडत्याप्रती द्वेष निर्माण करते. हा न जाणे त्याचा किती जन्मांचा स्वभाव आहे. कोणी अनेक जन्म मानत नसेल, या जन्माला तर मानता ना? लहानपणापासूनच असा स्वभाव बनवला आहे की जेव्हा जेव्हा नावडती बाब होते अथवा नावडती घटना घडते, मनात विकार जागवतो, व्याकुळ होतो. आवडत्या बाबीत बाधा येते तर विकार जागवतो, आपल्या स्वतःला व्याकुळ करतो. असे याच जीवनात होत आहे ना! यातून बाहेर पडावयाचे आहे ना!*_

_सन १९६९ मध्ये जेव्हा ब्रह्मदेशातून आलो, त्याच्या २-३ वर्षांनंतरच महात्मा गांधीचा आश्रम 'सेवाग्राम', वर्धा येथे एका शिबिराचे आयोजन झाले. लोक म्हणाले जवळच 'पवनार' येथे संत विनोबा भावेजी राहातात, त्यांना भेटले पाहिजे. मी भारतात नवीन होतो. त्यांचे केवळ नावच ऐकले होते. मनात आले, जरुर भेटावे. गेलो, त्यांच्याशी चर्चा झाली, मी म्हटले की विपश्यना भारताची जुनी विद्या आहे. त्यांनी मला सांगितले अरे हो, ही तर खूप जुनी विद्या आहे. ऋग्वेदात हिची खूप प्रशंसा आहे, त्यांनी ऋग्वेदाची एक ऋचा ऐकवली आणि त्यानंतर लिहूनही पाठवली. ऋग्वेद म्हणतो -

*_यो विश्वाभि विपश्यति भुवना।_*

*_सं च पश्यति, स नः पार्शदति द्विषः ।_*

_*'यो विश्वाभि विपश्यति' जो विपश्यना करतो. कसा करतो -विश्वाच्या अभिमुख होऊन करतो.* हजारो वर्षात शब्द बदलतात, शब्दांचे अर्थ बदलतात. आज तर विश्व बाहेरच्या जगाला म्हणतात. हासुद्धा त्याचा एक अर्थ आहे. परंतु येथे हा अर्थ आहे की ज्याचा विकास होत आहे. जेव्हा पाहावे तेव्हा विस्तार होत आहे, विस्तार होत आहे. आत विकार जागतो तेव्हा केवळ क्षणभरासाठी जागत नाही. जागला की वाढत जाईल, वाढत जाईल, राग आला तर तासंतास धुमसत राहाल. वासना जागली तर तासंतास... भय जागले, अहंकार जागला तर तो वाढतो आहे. याचा विकास होतो आहे. विस्तार होतो आहे. याच्या अभिमुख होऊन विपश्यना करतो, म्हणजे आपल्या आत काय जागले त्याला जाणत *'सं च पश्यति'* सम्यक रुपाने विपश्यना करतो अर्थात जसे आहे त्याला तसेच जाणा. क्रोध आहे तर बस क्रोध आहे, इतकेच जाणा. क्रोध आहे तर त्याला दूर करण्याचा प्रयत्न नाही. ज्यावर क्रोध जागला, त्याची आठवण कराल तर तो वाढेलच. बस केवळ जाणत राहा की या वेळी माझ्या मनात क्रोध जागला, दुर्भावना जागली. या प्रकारे पाहतो तरच ही विपश्यना आहे. हेच सम्यक रुपाने पाहाणे आहे. तेव्हा *'सनः पार्शदति द्विषः* तो सर्व द्वेषांच्या पार जातो. त्या मनुष्याच्या मनात द्वेष टिकू शकत नाही, त्या माणसाच्या मनात कोणताही विकार टिकू शकत नाही._

_अरे, इतकी पुरातन विद्या भारताची परंतु केवळ चर्चा राहिली, करणे विसरलो. करणे विसरलो तेव्हा २६०० वर्षांपूर्वी या देशाच्या एका महापुरुषाने जेव्हा ही विद्या शोधून काढली तेव्हा म्हणतो अरे -_

*_पुब्बे अननुस्सुतेसु धम्मेसु चक्खुं उदपादि..।_"

_*मी पूर्वी कधीही ऐकलेही नाही, अशा धर्मात माझे ज्ञान चक्षु जागले.* ऐकलेच नाही. का ऐकले नाही भाऊ ! वडिलांनी तर त्या वेळचे जे काही धार्मिक साहित्य होते सर्व शिकवले. ऋग्वेदही शिकवला - त्याच्या या ऋचाही समोर आल्या असतील. तेव्हा असे कसे म्हणतो? खोटे बोलणार नाही. त्यानंतर म्हणतो अर्थ बदलले, कारण काम करणे बंद केले. विद्या जीवनात कशी उतरवावी, अनुभवावर कशी उतरवावी, धर्माला कसे धारण करावे ही बाब एका बाजुला राहिली. आता तर हा केवळ एक मंत्र बनून राहिला. याचा जप करा, द्वेष दूर होईल. अरे, जपामुळे द्वेष कसे दूर होईल भाऊ? अंतर्मुखी होऊन तुम्हाला पाहाणे शिकवले गेले. तुमच्या आत जे जागले त्याला समतेने, अनपेक्ष होऊन, जसे आहे तसे, पाहाणे सुरु करा तेव्हा त्याचा स्वभाव समजू लागेल, तो स्पष्ट होत जाईल, ही विद्याच विसरले._

_इतकी जुनी विद्या भारतातून लुप्त झाली. पुन्हा जागली तेव्हा संपूर्ण भारतात ५०० वर्षापर्यंत हिने खूप कल्याण केले. परंतु महाराष्ट्राची विशेषता आहे की त्याने २०० वर्षांपर्यंत अजून सांभाळली. जवळपास ७०० वर्षांपर्यंत या प्रदेशात विपश्यना चालत राहिली. लोक हिचा लाभ घेत राहिले. येथील इतक्या गुहा, लेण्या एका काळात विपश्यना करण्याच्या गुहा होत्या. तप करण्याच्या गुहा होत्या. हळूहळू कर्मकांडात बदलल्या आणि हळूहळू । धर्म लुप्त होत गेला._

_ह्या बाबीला समजा की धर्म काय आहे? *धर्म हा आहे की आम्ही आपल्या चित्ताला निर्मळ कसे करावे. निर्मळ कराल तर धर्म आमच्या आचरणात उतरु लागला. जेव्हा जेव्हा आपल्या मनाला मलिन करतो, तेव्हा मलिन मनाने कोणतेही काम वाणीचे वा शरीराचे करु, चुकीचेच होईल, योग्य होणार नाही. दुराचारच दुराचार होईल. तसेच मन निर्मळ होईल तेव्हा आम्हाला आपल्या वाणी व शरीराच्या कर्माची चिंता करण्याची गरज नाही. ते आपोआप खूप चांगले होऊ लागतील. कारण आम्ही मनावर पहारा लावला. मनाला निर्मळ करण्याच्या कामात लागलो. मनाला विकार विहीन करण्याच्या कामात लागलो, त्याचा परिणाम आपोआप येऊ लागेल. जीवनात उतरु लागेल. जीवनात खूपच सुख, शांतीच शांती येईल. पण काही चमत्कार होत नाही. काम करावे लागते.*_

_कोणी १० दिवसीय शिबिरात बसेल आणि म्हणेल की आता तर मी बिल्कुल समजून गेलो. आता माझा क्रोध जागणार नाही, द्वेष जागणार नाही...: अरे, नाही भाऊ नाही! सध्या तर ही विद्या शिकत आहात, आता याचा प्रयोग कराल, जीवनात उतरवण्याचा प्रयत्न कराल, तेव्हा पाहाल परिवर्तन येऊ लागले, परिवर्तन येतेच._

_कारागृहात शिबिर लागतात, ही विद्या तर सर्वांसाठीच आहे. कारागृहातील अपराधी बिचारे, त्यांनी देशाच्या नियमांप्रमाणे काही चूक केली, त्याची शिक्षा भोगत आहेत, पण कसे भोगत आहेत? ते आपल्या परिवारापासून, आपल्या मुलाबाळांपासून दूर झाले. त्यांच्यासोबत राहू शकत नाहीत. आपल्या घरच्या सुख-सुविधांपासून दूर झाले तर व्याकुळ आहेत. आम्ही त्यांना समजावतो की एक व्याकुळता तुम्ही अजून निर्माण करत आहात. काय चिंतन करत रहाता तुम्ही? जेव्हा-जेव्हा निवांत असता तेव्हा काय चिंतन करता? हेच ना की माझ्या केसमध्ये अमुक माणसाने साक्ष दिली. म्हणून मी पकडला गेलो. बाहेर निघाल्यावर पहिले काम त्याची हत्या करीन. या न्यायाधीशाने माझ्याविरुद्ध चुकीचा निकाल दिला, त्याचा बदला घेईन. हाच विचार करता ना ! काय करावे, काय विचार करावा?_

_तुम्ही कधी पाहिले आहे की जेव्हा जेव्हा द्वेष, दुर्भावना वा क्रोधाचे चिंतन करता, तेव्हा तेव्हा तुमच्या आत काय होऊ लागते? आता विपश्यना करु लागलात तर पाहू लागलात. अरे, खरोखर जेव्हा-जेव्हा मी असे विकारांनी भरलेले विचार जागवतो, खूप व्याकुळ होतो. एक व्याकुळता तर होतीच, आता दुसरी व्याकुळता अजून निर्माण करु लागलो. कारले निंबावर चढले, अजूनच कडू झाले. अरे, काय करु लागलो! *आता १० दिवसाच्या शिबिरात ही शुद्ध येईल की जेव्हा जेव्हा आपल्या मनात विकार जागवतो, आपल्या स्वतःला व्याकुळ करतो. राज्यांने मला जो अपराधाचा दंड दिला, तो तर दिला, आता हा निसर्गाचा दंड अजून भोगतो आहे. नवीन-नवीन अपराध करत आहे, आपल्या स्वतःला दुःखी बनवत आहे.*_

_आपल्या देशात एक असा धर्म सम्राट झाला जो कारागृहात अपराध्यांना व बाहेर लोकांना हेच शिकवायचा की तुम्ही आपल्या स्वतःला पाहा आणि जेव्हा पाहाल परिवर्तन येणे सुरु होईल. कारागृहात परिवर्तन येणे सुरु झाले. आज तेच अपराधी म्हणतात आमचे तर जीवनच बदलले. अरे, बरे झाले आम्ही कारागृहात होतो, बाहेर असतो तर न जाणे एखाद्या शिबिरात गेलो असतो अथवा नाही. येथे तर बंदी आहोत, सरकारने म्हटले शिबिरात बसा, बसलो. आम्हाला काय माहित होते की यात इतके सुख आहे, इतकी शांती आहे._

_भाऊ ! आम्ही तर म्हणतो की केवळ तेच कारागृहाचे बंदी नाहीत, जितके लोक बाहेर आहेत, सर्व बंदी आहेत. प्रत्येक मनुष्य अपराधी आहे, म्हणून बंदी आहे. आपल्याच कारागृहात बंदी आहे. विकार जागवतो, व्याकुळ होतो, आपल्या स्वभावाच्या पकडीचा गुलाम झाला आहे. असा स्वभाव बनवला की थोडेसेही मनाविरुद्ध झाले की विकार जागवतो. थोडेसेही मनासारखे झाले की विकार जागवतो. व्याकुळताच व्याकुळता, व्याकुळताच व्याकुळता._

_कोण जबाबदार आहे भाऊ? आता आम्ही प्रार्थना करु या देवीला, या देवतेला, याला, त्याला.... हे भगवान आम्हाला ह्या दुःखातून पार करा! कोण भगवान दुःखाच्या पार करेल, जरा विचार करुन पाहा? आपल्या मनाला बिघडवण्याला जबाबदार कोण? बिघडवत मी जाईन आणि सुधरवणार कोणी दुसरा. अरे भाऊ, होणारी बाब नाही, असे होत नाही. कोणत्या गुंत्यात पडलात? आपले जे पूज्य आहेत, देवी, देवता, ईश्वर, ब्रह्म, संत ज्या कोणाच्या प्रती श्रद्धा असेल त्याच्या सद्‌गुणांना आठवा, तसे सद्‌गुण माझ्या जीवनात येत आहेत तर मी त्याचा खरा भक्त आहे. येत नाहीत तर कसली भक्ती! मी त्याचा भक्त वा अनुयायी कसा काय? त्याचे सद्गुण माझ्या जीवनात येणे सुरु झाले तर धर्माचे, भक्तीचे खरे स्वरुप समोर येऊ लागले._

_*सदाचाराचे जीवनच धर्म आहे आणि दुराचाराचे जीवन अधर्म. ही बाब समजू लागली तर उपदेशांची गरज नाही. आता तर आपल्या भल्यासाठी, आपल्या कल्याणासाठी व सुख शांतीसाठी सदाचाराचे जीवन जगू लागलो. मनात विकार जागवल्याविना वाणी वा शरीराने कोणताही दुराचार करुच शकत नाही.*_

_*आपल्या येथे सदाचारासाठी म्हटले गेले कोणाचीही हत्या करु नका, चोरी करु नका, व्याभिचार करु नका, खोटे बोलून कोणालाही फसवू नका, कोणालाही कठोर बोलू नका, कोणाचीही चुगली करु नका, परनिंदा करु नका आणि मदिरा वा नशेचे सेवन करु नका. ह्या सर्व सदाचाराच्याच बाबी आहेत आपल्या इथे.*_

_जेव्हा कोणी विपश्यनेला येतो तेव्हा सखोलतेने बाब समजते की हिंसा इत्यादी का करु नये. विकार जागताच व्याकुळ झाला. तर आपल्या भल्यासाठी भाऊ, कोणावर उपकार करत नाही. तसाही मनुष्य सामाजिक प्राणी आहे सदाचाराचे जीवन जगेल तर समाजात सुख शांती राहील. म्हणूनही आवश्यक आहे की आम्ही सदाचाराचे जीवन जगावे. दुराचारापासून दूर राहावे. शरीराला स्वस्थ ठेवण्यासाठी आम्हाला शरीराची काही कसरत करावी लागते ना! आसन करा, प्राणायाम करा वा अन्य एखाद्या प्रकारची कसरत करा, शरीराला स्वस्थ ठेवायचे आहे. ठीक याच प्रकारे मनाला स्वस्थ ठेवण्यासाठी आम्हाला मनाचीही काही कसरत करावी लागते. मनाची ही कसरत परिणाम दर्शविणारी (result oriented) आहे. आत्ताच आपला परिणाम दाखवू लागते. जशी शरीराची कसरत शरीराला स्वस्थ सबळ बनवण्यात आपला परिणाम दाखवते तशीच मनाची ही कसरत मनाला स्वस्थ, सुखी, शांत बनवण्यात आपला प्रभाव दाखवू लागते. आत्ताच फळ देऊ लागते. तर आजच्या सभेत जे-जे आले आहेत, ते सर्व धर्माच्या सखोलतेला समजा. समजून याला जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करा. सर्वांचे कल्याण होवो, सर्वांची स्वस्ती मुक्ती होवो !_

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_लेखक :- कल्याणमित्र सत्यनारायण गोयन्का_*

_बुद्धवर्ष २५५९, फाल्गुन पौर्णिमा, २३ मार्च, २०१६, वर्ष २ अंक १२_

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :-_* ०९/०२/२०२५

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

No comments:

Post a Comment

Things that are in a house

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌺🌺🌺💐 *_Things that are in a house_* *_गेह भण्डानी_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/12/things-that-are-in-house.h...