Tuesday, 28 December 2021

तवांग मध्ये चीनच्या युद्धात शहीद झालेल्या सैनिकांचे स्मृतिस्थळ

 *तवांग मध्ये चीनच्या युद्धात शहीद झालेल्या सैनिकांचे स्मृतिस्थळ* 

Tawang War Memorial Stupa


१९६२ साली चीन बरोबर झालेल्या युद्धात तवांग ( अरुणाचल प्रदेश ) येथे  २४४२ भारतीय सैनिक धारातीर्थी पडले. त्यांच्या स्मरणार्थ तेथे स्मृतिस्थळ उभारण्यात आले आहे. जाट, मराठा, गुरखा पलटणीतील वीरमरण आलेल्या सैनिकांची नावे तेथे नोंदली आहेत. त्यांची यादी वाचताना मन खिन्न झाले. मराठा पलटणीतील भोसले, जाधव, कुंभार, गावडे, शेळके अशी नावे बघताना उर भरून आला. हे युद्ध होऊन साठ वर्षे झाली. पण आजही आपल्या देशासाठी धारातीर्थी पडलेल्या सैनिकांची याद येथे जपली आहे.


याच स्मृतीस्थळावर बुद्ध शिल्प उभारले असून तवांगच्या बौद्ध संस्कृतीचे प्रतिबिंब तेथे पडल्याचे दिसते. स्मृतिस्थळाचा आकार हा तिबेटी बौद्ध स्तुपासारखा असून पायऱ्या चढून वर गेल्यावर तेथे चारही दिशेस विरमरण आलेल्या सैनिकांची नावे लिहिली आहेत. मध्यभागी स्तूप आणि बुद्ध प्रतिमा असून अदभूत शांतीचा प्रभाव तेथे जाणवतो. आजूबाजूस मिलीटरी कॅम्प असून बर्फाळ पर्वतराजीतील हे ठिकाण पाहून १९६२ साली कशी दुर्गम परिस्थिती असेल याची कल्पना येते. भारतमातेच्या या सुपुत्रांना सॅल्युट.


---संजय सावंत ( नवी मुंबई ) https://sanjaysat.in


⚛️⚛️⚛️







No comments:

Post a Comment

Things that are in a house

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌺🌺🌺💐 *_Things that are in a house_* *_गेह भण्डानी_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/12/things-that-are-in-house.h...