Sunday, 28 November 2021

मैत्री पारमिता


 *|| मैत्री पारमिता ||*

    _fraternity..._

             

      लेखन: आनंद आरकडे.


बोधी म्हणजे _"प्रज्ञा"_

आपल्या अनुभूतिद्वारे सत्याचा साक्षात्कार , आतंरिक सत्याचे ज्ञान , चार आर्यसत्याला आत्मसाद करणारे ज्ञान.

बोधी म्हनजेच _" बुद्धत्व."_

बुद्धत्व प्राप्त झालेला प्राणी म्हणजेच बुद्ध.

              बोधिसत्व ( _बुद्धत्व प्राप्तिस्तव प्रयत्नरत प्राणी_) आपल्या आयुष्यात अवघ्या जगावर उपकार आणि त्याचे परित्राण करण्याचा संकल्पयुक्त प्रयत्न करतो. असा मनुष्य बुद्धत्व प्राप्तिकरीता प्रयत्नरत असतो. बुद्धत्व प्राप्तिकारिता प्रयत्नरत असलेला मनुष्य म्हणजेच बोधिसत्व मनाच्या अवस्थांची दहा स्थित्यंतरे  पूर्ण करतो . ही स्थित्यंतरे म्हणजे दहा पारमिता. स्थाविरवादात पारमितेला _" पारमि "_ असे संबोधन आहे. _"पारमि"_ या शब्दाचा अर्थ _"पूर्णता"_.

दहा पारमिता पैकी *" मैत्री पारमिता "* अतिशय महत्वपूर्ण आहे.

                   _"मेत्ता"_ या पालि शब्दाला समानार्थी मराठी शब्द मैत्री आहे. मेत्ता म्हणजे अघाद सदिच्छा भावना. मेत्ता भावना कुल,गोत्र, जात धर्म,वंश वर्ण,श्रीमंति, सौंदर्य, सत्ता, शत्रुत्व असा भेदभाव करावयास शिकवत नाही. मेत्ता भावना केवळ मनुष्यप्राण्याकरिता सिमित नसते. मेत्ता भवना सर्व लहान, मोठ्या, दृश्य, अदृश्य, पाळीव, हिंस्त्र, पृथ्वीवरील, भूमिगत, अन्तरिक्षातील ,जीवसृष्टिमधील प्राण्यांविषयी असू शकते.

                 पूर्वाश्रमिचा पुत्र _"राहुल"_ अथवा विरोधात कटकारस्थाने रचणारा _" देवदत्त"_ या दोहोंच्या बाबतीत समसमान _" मैत्री भावना"_ बुद्धाने जोपासलि. ते सुडबुद्धिने वागणारे, विघ्नसंतोषी धर्मसंस्थापक नव्हते. बुद्ध हे समस्त मानव जातीचे *नैतिक शास्ता* आहेत. बुद्धांच्या अन्तःकरणात सर्व मनुष्य तथा प्राण्यांबाबत समान _"मैत्री भाव"_ होता. 

                तथागत बुद्धांच्या अंगी उच्चप्रतिची मंगलमैत्रीची भावना  असल्याने त्यांना कोणत्याही अवस्थेत , निद्रेत अथवा जागृत, चित्त एकाग्रतेची समाधी लाभत असे. त्या सम्यक समाधी मार्गानेच भगवंताना काया, वाचा, मनाच्या नऊ *अभिज्ञा*( _विशेष संबोधी_) प्राप्त झाली होती. त्या अभिज्ञा व शील, समाधि, प्रज्ञेच्या सहाय्यानेच बुद्ध आपली _सम्यक संबोधी_ व _धम्म विनयाचे_ संरक्षण करीत असत.

                 बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा कर्मठ हिंदूंनी आयुष्यभर छळ केला, त्यांना अपमानित केले. तरी देखील हिन्दू समाजात सुधारणा घडवून अणण्याकरिता बाबासाहेबांनी _"हिन्दूकोड बिल"_ संसदेत सादर केले. प्रसंगी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. तसेच बाबासाहेबांनी  हिन्दू समाजाबाबत आकास भाव न ठेवता सामान न्याय या तत्वावर आधारित भारतीय संविधानाची निर्मिति केलि.

म्हणजेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धांनी उपदेशीलेले _" मैत्री पारमिता"_ हे तत्व अंगी बाणवले आणि त्याची जोपासना केली. सदर उदाहरणावरुन आपणास उमगते की, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे बुद्धत्व प्राप्तिकारिता प्रयत्नरत होते म्हणजेच ते 

_" बोधिसत्व "_होते.

               बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आयुष्य हे *स्वातंत्र्य, समता, बंधुभाव( _fraternity_)*  या त्रिसूत्रावर आधारित होते. स्वातंत्र्य , समता, बंधुभाव या तत्वाच्या अधारेच त्यांची जातविरोधी चळवळ जातिवादी ठरत नाही. स्वातंत्र्य आणि समता याच्यापेक्षाही आंबेडकरांना *बंधुभावाचे तत्व* जास्त महत्वाचे वाटते.

बाबासाहेब म्हणतात...

_" माझ्या तत्वज्ञानात बंधुतेला फार उच्च स्थान आहे. स्वातंत्र्य नि समता यांचे संरक्षण फक्त बंधुभावनेतूनच होऊ शकते."_

बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धानी उपदेशीलेले "मैत्री पारमिता" ( *_fraternity_*) हे तत्व संविधानात समाविष्ट केले आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात...

_"बंधुभाव हे लोकशाहीचे दूसरे नाव होय , आपल्या सभोवतालच्या माणसांबद्दल आदराची भावना म्हणजे बंधुभाव ."_

(सं: डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषण खंड१ पृ५७)


                   बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बंधुभाव( *_fraternity_*) या तत्वाला पर्यायी शब्द म्हणून बुद्धाच्या _" मैत्री "_ या तत्वाचा स्पष्ट उल्लेख _"बुद्ध कि कार्ल मार्क्स"_ या आपल्या ग्रंथात केला आहे.


                  बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्धांना २२ प्रतिज्ञा दिल्या, त्यापैकी  १२ व १३ प्रतिज्ञा त्यांनी _"दस पारमिता"_ चे पालन करण्या संधर्भात  दिली आहे.  


                    भगवान बुद्धांनी उपदेशीलेल्या "मैत्री पारमिते"चे सार  _"जयमंगलअट्ठगाथेच्या"_ एका कवनात आढळते .


नालागिरी गजवरं अतिमत्तभूतं,

दावाग्गी चक्कमसनिव सदारुणन्तं |

मेतंबूसेक विधिना जितवा मुनिन्दो ,

तं ते जसा भवतु ते जयमंगलानि ||


अर्थ: 


_" ज्या मुनिंद्राने( बुद्धाने_) _अग्निचक्र विजेप्रमाने अत्यंत भयानक वेगाने येणाऱ्या मदोन्मत्त अशा नालागिरी हात्तीला आपल्या मैत्रीरूपी  जलवृष्टीने शांत केले, त्याला जिंकले, त्या भगवान बुद्धांच्या प्रतापाने तुमचे कल्याण मंगल होवो."_


*नमो बुद्धाय !*  *जय भीम !*


*🌼🌿🍀🍁🍂🌸🌺🌹🌻💐*

No comments:

Post a Comment

Things that are in a house

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌺🌺🌺💐 *_Things that are in a house_* *_गेह भण्डानी_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/12/things-that-are-in-house.h...