Tuesday, 16 November 2021

अशोकचक्र

 अशोकचक्र  


अशोकचक्र म्हणजे ' धम्माने' प्रेरित असलेल्या सदाचारणाचे चक्र होय. या चक्राला चोवीस आरे असतात. मौर्य साम्राज्याच्या अनेक अवशेषांवर असे अशोकचक्र मोठ्या प्रमाणावर कोरलेले आहे. हेच अशोकचक्र भारतीय प्रजासत्ताकाच्या राष्ट्रध्वजात विराजमान झालेले दिसते. पांढर्‍या रंगाच्या पार्श्वभूमीवर गडद निळ्या रंगाचे हे चक्र फारच उठावदार दिसते. या राष्र्टध्वजाच्या साक्षीने काम करणार्‍यावर नियंत्रण ठेवणारे तत्त्व म्हणजे सत्य आणि धम्मपालन, म्हणजे सदाचार हेच असायला हवे. हे चक्र म्हणजेच गतिमानतेचे द्दोतक आहे. गतिमानता म्हणजेच क्रियाशिलता.. 
        कुठल्याही राष्ट्राच्या प्रगतीसाठी त्या राष्ट्रातील जनता कार्यशील असणे गरजेचे असते. क्रियाशिलता म्हणजेच आयुष्य, जिवंतपणा. देशाने आणि देशातील नागरिकांनी सतत कार्यरत राहून प्रगती साधली पाहिजे. शांततेच्या मार्गाने होणार्‍या बदलांची, सुधारणांची, आणि प्रगतीची गतीशिलता दाखवणारे प्रतिक म्हणजे हे चक्र होय.

         त्यावरील चोवीस आरे हे दिवसाच्या चोवीस तासांचे प्रतिनिधित्व करतात. त्याचप्रमाणे २४ आरे एका व्यक्तीचे २४ गुण दर्शवतात. अशोकचक्रामध्ये अशा सर्व गुणांचा उल्लेख केलेला आहे. अशोकचक्राला कर्तव्याचे चाकही म्हटले जाते.

अशोकचक्रातील प्रत्येक आर्‍याला वेगळा अर्थ आहे तो खालीलप्रमाणे.
*१. पहिले आरे :* पहिल्या आऱ्याचा अर्थ शुद्धता आहे, जे साधे जीवन जगण्यास प्रेरित करते.
*२. दुसरे आरे :* दुसऱ्या आऱ्याचा अर्थ आरोग्य आहे, जे शरीर आणि मन निरोगी राखण्यासाठी प्रेरणा देते.
*३. तिसरे आरे :* तिसऱ्या आऱ्याचा अर्थ शांती आहे, जे संपूर्ण देशात शांती आणि एकता राखून ठेवण्यासाठी प्रेरणा देते.
*४. चौथे आरे :* चौथ्या आऱ्याचा अर्थ त्याग आहे, जे देश आणि समाजासाठी कोणत्याही बलिदानासाठी तयार असण्यासाठी प्रेरित केले.
*५. पाचवे आरे :* पाचव्या आऱ्याचा अर्थ नैतिकता आहे, जे व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात उच्च नैतिकता टिकवून ठेवण्यासाठी प्रेरणा देते.
*६. सहावे आरे :* सहाव्या आऱ्याचा अर्थ सेवा असा होतो, जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा देश आणि समाजासाठी सेवा प्रदान करण्याची तयारी दाखवण्यास सांगते.
*७. सातवे आरे :* सातव्या आऱ्याचा अर्थ क्षमा असा होतो, जे मनुष्य आणि इतर प्राण्यांना क्षमा करण्याची भावना निर्माण करते.
*८. आठवे आरे :* आठव्या आऱ्याचा अर्थ प्रेम आहे,  जे देवाबद्दल आणि इतर सर्व प्राण्यांवर प्रेम करण्याची भावना निर्माण करते.
*९. नववे आरे :* नवव्या आऱ्याचा अर्थ मैत्री आहे, जे सर्व नागरिकांबरोबर मैत्रीचे नाते ठेवण्यास सांगते.
*१०. दहावे आरे :* दहाव्या आऱ्याचा अर्थ बंधुता असा होतो, जे देशातील बंधुत्वाची भावना विकसित करण्याचे काम करतात.
*११. अकरावे आरे :* अकराव्या आऱ्याचा अर्थ संघटन असा होतो, जे राष्ट्राची ऐक्य आणि अखंडता बळकट करण्याची प्रेरणा देते.
*१२. बारावे आरे :* बाराव्या आऱ्याचा अर्थ कल्याण करणे असा होतो, जे देश आणि समाजाच्या कल्याणासाठी झटण्याची प्रेरणा देते.
*१३. तेरावे आरे :* तेराव्या आऱ्याचा अर्थ समृद्धी असा होतो, जे देशाच्या विकासामध्ये सक्रियपणे सहभागी होण्यास सांगते.
*१४. चौदावे आरे :* चौदाव्या आऱ्याचा अर्थ उद्योग असा होतो, जे देशाला त्याच्या औद्योगिक प्रगतीसाठी मदत करण्याची प्रेरणा देते.
*१५. पंधरावे आरे :* पंधराव्या आऱ्याचा अर्थ सुरक्षितता असा आहे. जे सांगते की, देशाच्या संरक्षणासाठी नेहमी तयार राहा.
*१६. सोळावे आरे :* सोळाव्या आऱ्याचा अर्थ जागरूकता असा होतो. जे सत्याबद्दल जागरूक असणे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्यास सांगते.
*१७. सतरावे आरे :* सतराव्या आऱ्याचा अर्थ समता असा होतो. जे समानतेवर आधारित समाजाची स्थापना करण्याची प्रेरणा देते.
१८. अठरावे आरे : अठराव्या आऱ्याचा अर्थ पैसा असा होतो. जे  पैशाचा इष्टतम उपयोग करण्याची प्रेरणा देते.
*१९. एकोणिसावे आरे :* एकोणिसाव्या आऱ्याचा अर्थ धोरण असा आहे. जे देशातील धोरणावर विश्वास ठेवण्यास सांगते.
*२०. विसावे आरे :* विसाव्या आऱ्याचा अर्थ न्याय असा आहे. जे सर्वांसाठी योग्य न्याय देण्याबाबत विश्वास ठेवण्यास सांगते.
*२१. एकविसावे आरे :* एकविसाव्या आऱ्याचा अर्थ सहकार असा आहे. जे एकत्र काम करण्याची प्रेरणा देते.
२२. बाविसावे आरे : बाविसाव्या आऱ्याचा अर्थ कर्तव्ये असा आहे. जे प्रामाणिकपणे आपल्या कर्तव्यांचे पालन करण्याची प्रेरणा देते.
*२३. तेविसावे आरे :* तेविसाव्या आऱ्याचा अर्थ अधिकार असा आहे. जे आपल्याला आपल्या अधिकारांचा गैरवापर करू नका असे सांगते.
*२४. चोविसावे आरे :* चोविसाव्या आऱ्याचा अर्थ बुद्धी असा आहे. जे आपल्याला पुस्तकांच्या बाहेरील ज्ञान घेण्यासाठी प्रेरणा देते.

         अशाप्रकारे प्रत्येक गुणांचा अंगिकार करणारी व्यक्ती किंवा देश प्रगत झाल्याशिवाय राहणार नाही. ह्या चक्राचा निर्माणकर्ता, निर्मीतीशील राजा चक्रवर्ती सम्राट अशोक, पुन्हा या धम्मचक्राचे स्मरण करुन देणे गरजेचे आहे...हे धम्मचक्र कायम फिरते ठेवणे ही प्रत्येक भारतीय नागरिकाची जबाबदारी आहे.

               जयभीम...!

No comments:

Post a Comment

Things that are in a house

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌺🌺🌺💐 *_Things that are in a house_* *_गेह भण्डानी_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/12/things-that-are-in-house.h...