Wednesday, 13 October 2021

पोहण्याची कला

               🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 

पोहण्याची कला

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

            _एकदा एक तरुण प्राध्यापक जहाजातून समुद्र प्रवास करीत होते. ते खूप शिकलेले होते. त्यांच्या नावापुढे पदव्यांची एक लांबच लांब मालिका होती. *परंतु आयुष्यातील खऱ्या अनुभवाला मात्र ते पारखे होते.* ते ज्या जहाजावरून प्रवास करीत होते, त्या जहाजाच्या कर्मचारी वर्गात एक अशिक्षित वृद्ध खलाशी होता. तो वृद्ध खलाशी रोज संध्याकाळी प्राध्यापक महाशयांच्या खोलीवर जात असे व त्यांच्याकडून विविध विषयांवरील विद्ववत्ताप्रचुर माहिती मोठ्या कौतुकाने ऐकत असे. त्या तरुण प्राध्यापकाची ती प्रचंड विद्वत्ता पाहून तो वृद्ध खलाशी अक्षरशः भारावून जात असे._

                _अशाच एका संध्याकाळी, नेहमीप्रमाणे गप्पा रंगल्या. तो वृद्ध खलाशी प्रसन्न मनाने खोलीमधून बाहेर पडू लागला. एवढ्यात प्राध्यापक महाशयांनी त्यांना विचारले, 'काय आजोबा, तुम्ही जिऑलॉजीचा अभ्यास केलाच असेल, नाही का?'_

                _त्यावर आश्चर्यचकित झालेल्या त्या वृद्ध खलाशाने, अचंब्याने उलट विचारले, 'काय म्हणता?.... जिऑलॉजी?....नाही साहेब, खरं सांगतो. मी कधीच शाळेत गेलेलो नाही त्यामुळे अभ्यास म्हणाल तर कोणत्याच शास्त्राचा झालेला नाही!'_

            _'तर मग आजोबा, तुम्ही तुमचे एक चतुर्थांश आयुष्य फुकट घालविलेत म्हणायचे!'_

                    _ते प्राध्यापक महाशय २-३ दिवस त्या खलाश्याला विचारत असे की तुम्ही ओशनग्राफी, मिटीरीऑलॉजि इ. इतर अभ्यास केला का विचारत असे आणि त्या खलाशाचे नेहमीचेच उत्तर ठरलेले असे. चौथा दिवस मात्र खलाश्याचा होता. तो धावतच प्राध्यापक महाशयांच्या खोलीवर आला. प्राध्यापक महाशय अभ्यासाच्या तयारीतच होते. ते पुस्तक उघडणार एवढ्यात तो खलाशी दार लोटून आत आला व त्यांना म्हणाला, "साहेब, तुमचा स्विमॉलॉजीचा अभ्यास हा झालेला असणार?"_

             _"ऑ?.....स्विमॉलॉजी?......स्विमॉलॉजी म्हणजे, तुम्हाला नेमके म्हणायचे तरी काय आहे?"_

             _"प्रश्न साधा आहे, तुम्हाला पोहता येते ना?"_

            _"नाही, नाही! आजोबा, मला पोहता तेवढे येत नाही!"_

         _"काय म्हणताय काय! अरेरे! एवढ्या अगडबंब शास्त्रांचा अभ्यास केलात, पण पोहायला नाही शिकलात? साहेब, आपण तर आपले पूर्ण आयुष्य वाया घालविलेत की हो! आपली बोट एका मोठ्या खडकावर आपटली आणि बुडायला लागली आहे. ज्यांना पोहता येते, ते थोड्या फार परिश्रमाने जवळपासच्या खडकाला लागतील. पण दुर्दैवाची गोष्ट सांगायलाच हवी की, ज्यांना पोहता येत नाही त्यांना मात्र बुडून मरण्यावाचून पर्यायच नाही. माफ करा, आपण मात्र खरोखरच आपले आयुष्य वाया घालविलेत!"_

                _*जीवनात, सफल शास्त्रांच्या नुसत्या प्रचंड पंडिती अभ्यासाची किंमत शून्य आहे. आवश्यकता आहे, ती शास्त्रे जिवनात प्रत्यक्ष राबविण्याचा तारक कलेची! समजा, पोहण्यासंबंधीची खूप पुस्तके तुम्ही अभ्यासलीत नव्हे, पुस्तके सुद्धा लिहिलीत, एवढेच नव्हे तर जलतरण शास्त्रावर लांबलचक प्रवचने दिलीत, पण जोपर्यंत पाण्यात प्रत्यक्ष उतरून पोहायला शिकत नाही, तोपर्यंत त्या वाचन-लेखन चर्चेची किंमत शून्य आहे. जगण्यासाठी शास्त्राबरोबर तरण्याची तारक कलाच आत्मसात करायला हवी.*_

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*संदर्भ : जगण्याची कला*

*संकलन : महेश कांबळे*

*१४/१०/२०२१*

https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷


No comments:

Post a Comment

Medicinal Herbs and drugs

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌺🌺🌺💐 *_Medicinal Herbs and drugs_* *_भेसज्जमुआदीनी_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/12/medicinal-herbs-and-drugs...