Thursday, 30 December 2021

विचार

 विचार


एकदा वेगवेगळ्या गावातील दोन मित्र, दुसऱ्या गावातील एका झेन आचार्यांकडे गेले. नवीन गावाचे निरीक्षण करीत ते विहारात पोहोचले. सुरुवातीचे संभाषण झाल्यानंतर एक जण म्हणाला,

"आचार्य, हे गाव छान दिसतंय. मला वाटतं येथे येऊन राहावं. कसं आहे हे गाव?

आचार्य म्हणाले, "तुझं आधीचे गाव कसे होते?

तो उत्तरला,"अतिशय वाईट लोकं होती. रागीट आणि भांडखोर होती."

आचार्य म्हणाले,"इथली लोकं तर त्यापेक्षा ही वाईट आहेत. फार भयानक. तू तेथेच रहा"


आचार्यांनी दुसऱ्याला विचारले,"तुझ्या गावची लोकं कशी आहेत?

दुसरा उत्तरला,"खूपच चांगली आहेत लोकं. सर्वजण एकमेकांशी प्रेमळ वागतात, मदत करतात आणि मंगल कामना करतात"

आचार्य म्हणाले,"इथली लोकं देखील अशीच आहेत. तुझे या गावात स्वागत आहे"


बुद्ध म्हणतात -


मनोपुब्बंगमा धम्मा मनोसेट्ठा मनोमया ।

मनसा चे पदुट्ठेन भासति वा करोति वा ।


जसे तुम्हीं विचार करता तसे वातावरण तुम्हीं तयार करता व इतरांना देखील तसेच पाहता.....एस धम्मो सनन्तनो

Wednesday, 29 December 2021

हुएनत्संगच्या पायवाटेवर - सम्राट अशोककालीन दोन स्तुपांचा शोध

 *हुएनत्संगच्या पायवाटेवर - सम्राट अशोककालीन दोन स्तुपांचा शोध*   

Xuanzang's Trail - The site where Siddhartha Cut His Hair.


इ.स.पूर्व २६१ मध्ये सम्राट अशोक यांनी कलिंग युद्धानंतर बुद्ध तत्वज्ञान स्वीकारले आणि संपूर्ण भारत बुद्धांच्या जयघोषाने निनादुन गेला. त्या धम्माची तत्वे त्यांना इतकी योग्य आणि तर्कनिष्ठ वाटली की त्यांनी त्याचा प्रसार सर्व भारतखंडात केला. बुद्ध चरित्राचे चिंतन मनन करून त्यांनी बुद्धांच्या आयुष्यातील घडलेल्या अनेक घटनांच्या स्थळी जाऊन स्वतः दर्शन घेतले व त्या स्थळाचे महत्त्व जनतेस कळावे म्हणून प्रत्येक ठिकाणी स्तूप, शिलालेख आणि स्तंभ उभे केले. अनेक ठिकाणी हे सर्व आज आपण पहात आहोत. पण काही स्थळे अशी देखील आहेत जिथे उभारलेले स्तूप, शिलालेख आणि स्तंभ काळाच्या ओघात नष्ट झाले आहेत तर काही स्थळांवर अतिक्रमणे झाले आहे. म्हणूनच भगवान बुद्धांच्या जीवनातील अनेक घटनांची पवित्रस्थळें अबाधित रहावी यासाठी अशा स्थळांवर नियमित जाणेयेणे झाले पाहिजे. आज आपण अशाच एका स्थळाची माहिती घेणार आहोत, जे विस्मरणात गेले आहे. 


पाली साहित्यात, बर्मी ग्रंथात, ललित विस्तार आणि निदानकथा यात उल्लेख आहे की सिद्धार्थ गौतम यांनी गृहत्याग केल्यावर त्या रात्री अनेक योजने प्रवास करीत अनोमा नदीच्या किनाऱ्यावर म्हणजेच गंडक नदी येथे आले व छन्नास म्हणाले "आता मी सर्वसंगपरित्याग करून परिव्राजिक जीवन सुरू करत आहे. तेव्हा तू आता माघारी फिर." जड अंतःकरणाने छन्ना सारथी कंठक घोड्यासह माघारी फिरला. नंतर सिद्धार्थ गौतम यांनी एके ठिकाणी  कंबल दान केली व दुसऱ्या ठिकाणी केशवपन केले. या स्थळांवर सम्राट अशोक यांनी मोठे स्तूप उभारले होते. कारण इथूनच त्यांचा ज्ञानप्राप्ती आणि बुद्ध होण्याचा प्रवास सुरू झाला होता. पाली सूत्तात म्हटले आहे की गृहत्याग केला त्या रात्री सिद्धार्थ यांनी शाक्य, कोलीय आणि मल्ल राज्यांच्या सीमा ओलांडल्या. तसेच ज्या ठिकाणाहून सिद्धार्थने छन्नास माघारी धाडले तेथे स्तूप असल्याचा उल्लेख ललितविस्तार, अभिनिष्क्रमण सूत्तात तसेच फाहियान आणि हुएनत्संग यांच्या प्रवास वर्णनात आहे. 


फाहियान आणि हुएनत्संग यांनी त्यांच्या प्रवास वर्णनात अंतरासहीत दिशासहित या स्थळाचा नामनिर्देश केल्यामुळे हे स्थळ शोधण्यासाठी नालंदा येथील दीपक आनंद यांनी 'Rediscovering Buddha in Footsteps of Xuanzang' या अभियाना अंतर्गत पुढाकार घेतला. व GIS सिस्टीम वापरून हे स्थळ शोधण्यास सुरवात केली. १४०० वर्षांपूर्वी हुएनत्संग कुठल्या मार्गाने आले त्याचा आढावा घेत व त्या मार्गाचा गुगल मॅप वरून मागोवा घेत ते बिहार मधील भवानगढी- वाल्मिकी नगर येथे जून २०२० मध्ये आले. तेथे गंडक नदी, भाताची शेते, दाट झाडी आणि आंब्याच्या बागा होत्या. दुसऱ्याच दिवशी उंच जागेवरील त्यांनी धार्मिक स्थळ बघीतले आणि त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. उभारलेले मंदिर आणि मठ एका उंचवट्यावर  असल्याचा स्पष्ट पुरावा तेथे दिसत होता. पुरातन विटांचा वापर तेथील बांधकामात केला होता. तेथील जमीनदार प्रमोद सिंग यांची गाठ घेऊन त्यांना या जागेचे महत्व सांगितले तेव्हा त्यांना देखील आश्चर्य वाटले.


अशा तऱ्हेने गुगल मॅप पडताळून व आधुनिक पद्धती वापरून गंडक नदीच्या पलीकडील वाल्मिकी नगर मधील भवानगढी आणि सागरमाई (जेथे केशवपन केले) या दोन स्तुपांच्या जागांचा शोध लावण्यात आला. त्याची माहिती डॉ. सुजित नयन, उप पुरातत्व अधीक्षक, ऐजवाल सर्कल यांना देण्यात आली असून उत्खनन झाल्यावर बऱ्याच गोष्टी बाहेर येतील असे वाटते. मात्र जेथे छन्न सारथी सिद्धार्थ यांना सोडून माघारी फिरला तेथील स्तूप नदीचे पात्र वारंवार बदलत असल्याने नष्ट झाला असावा. कारण आता नदीचे पात्र ७ कि.मी. रुंद झाले आहे. नेपाळची सीमा येथून जवळ असून रामग्राम स्तूप सुद्धा जवळ आहे. अशी अजून कितीतरी स्थळें असतील जेथे सम्राट अशोक यांनी स्तूप, शिलालेख उभारले असतील पण  सद्यस्थितीत त्याचा मागमूस सापडत नाही.  म्हणूनच चिनी भिक्खू फहियान आणि हुएनत्संग यांचे भारतावर मोठे उपकार आहेत, ज्यांनी ५ व्या व ७ व्या शतकात भारतात धम्मयात्रा करून पाहिलेल्या बौद्ध स्थळांची, स्तुपांची माहिती अंतरासाहित आपल्या प्रवासवर्णनात नोंद करून ठेवली आहे. भिक्खू फहियान आणि हुएनत्संग यांना माझे नम्र वंदन.


सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर जावे. http://nalanda-insatiableinoffering.blogspot.com/2020/08/new-discovery-along-xuanzangs-trail.html


--- संजय सावंत ( नवी मुंबई ) www.sanjaysat.in


🏮🏮🏮











Tuesday, 28 December 2021

बुद्धांच्या १० हस्त मुद्रा

 


मराठी विकिपीडिया

गौतम बुद्धांच्या बुद्धांच्या विविध मुद्रा, हस्त संकेत यासर्वांतून गौतम बुद्धांनी जीवनातील विविध घटकांना दर्शविले आहे. बुद्धांच्या १० हस्त मुद्रा आणि त्या मुद्रांचा अर्थ पुढील प्रमाणे आहेत — १) धम्मचक्र मुद्रा, २) ध्यान मुद्रा, ३) भूमीस्पर्श मुद्रा, ४) वरद मुद्रा, ५) करण मुद्रा, ६) वज्र मुद्रा, ७) वितर्क मुद्रा, ८) अभय मुद्रा, ९) उत्तरबोधी मुद्रा आणि १०) अंजली मुद्रा.

धम्मचक्र मुद्रासंपादन करा

धम्मचक्र मुद्रे मध्ये बुद्ध
धम्मचक्र मुद्रा

या मुद्रेला “धम्म चक्र ज्ञान” (Teaching of the wheel of the Dhamma) याचे संकेत देणारे चिन्ह म्हणूनही ओळखले जाते. हे बुद्धांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाच्या क्षणांपैकी एक आहे. त्यांनी या मुद्रेचे प्रदर्शन सर्वप्रथम ज्ञानप्राप्तीनंतर सारनाथ येथील त्यांच्या पहिल्या धर्मोपदेशात केले होते. या मुद्रेत दोन्ही हातांना छातीसमोर ठेवून डाव हाताचा पृष्ठभाग आतल्या बाजूने तर उजवा हाताचा पृष्ठभाग बाहेरील बाजूने ठेवण्यात येतो.

ध्यान मुद्रासंपादन करा

ध्यान मुद्रे मध्ये बुद्ध

या मुद्रेला समाधी किंवा योग्य मुद्रा म्हणून ओळखले जाते. ही मुद्रा “बुद्ध शाक्यमुनी”, “ज्ञानी बुद्ध अमिताभ” आणि “चिकित्सक बुद्ध” इत्यादी बौद्धांच्या गुणधर्मांना दर्शवते. या मुद्रेत उजवा हात डाव्या हातावर पूर्णपणे बोट उघडून मांडीवर ठेवण्यात येतो.

भूमीस्पर्श मुद्रासंपादन करा

 
भूमीस्पर्श मुद्रे मध्ये बुद्ध

या मुद्रेला पृथ्वीला स्पर्श करणे (Touching The Earth) असे देखील म्हणतात. जी बुद्धांची ज्ञान प्राप्तीला दर्शवते, कारण बुद्ध म्हणायचे की पृथ्वी त्यांच्या ज्ञानाची साक्षी आहे. या मुद्रेत उजवा हात उजव्या गुडघ्यावर ठेवून तळहात आतल्या बाजूला ठेऊन त्याला जमिनीच्या दिशेने नेण्यात येते.

वरद मुद्रासंपादन करा

 
वरद मुद्रे मध्ये बुद्ध

ही मुद्रा अर्पण, स्वागत, दान, दया आणि प्रामाणिकपणा यांना दर्शवते. या मुद्रेत डावा हात पूर्णपणे उघडून तळहात बाहेरील बाजूने असतो तर उजवा हात हा शरीरासोबत नैसर्गिकरित्या ठेवण्यात येतो.

करण मुद्रासंपादन करा

 
करण मुद्रेमध्ये बुद्ध

ही मुद्रा वाईटापासून वाचविण्याचे सूचित करते. या मुद्रेत तर्जनी आणि करंगळीला वर उचलून इतर बोटांना मोडले जाते. ही कर्त्याला स्वास सोडून रोग अथवा नकारात्मक विचारांमधून बाहेर निघण्यास मदत करते.

वज्र मुद्रासंपादन करा

 
वर्ज मुद्रे मध्ये बुद्ध

ही मुद्रा पंचतत्त्व म्हणजेच वायूजलअग्नीपृथ्वी आणि धातू यांना दर्शवते. या मुद्रेत उजव्या हाताची मुठी करून त्यात डाव्या हाताच्या तर्जनीला वरील दिशेने अश्या प्रकारे ठेवले जाते की उजव्या हाताची तर्जनी तिला स्पर्श करू शकेल.

वितर्क मुद्रासंपादन करा

 
वितर्क मुद्रे मध्ये बुद्ध

ही मुद्रा बुद्धांच्या शिक्षेचा प्रचार आणि परिचर्चेच प्रतीक आहे. या मुद्रेत अंगठा आणि तर्जनीच्या वरील भागाला जोडले जाते आणि इतर बोटांना सरळ ठेवले जाते.

अभय मुद्रासंपादन करा

 
अभय मुद्रे मध्ये बुद्ध

ही मुद्रा निर्भयता अथवा आशीर्वादाचे प्रतीक आहे, जी सुरक्षा, शांती, परोपकार आणि भय दूर करणे यांचं प्रतिनिधित्व करते. या मुद्रेत उजव्या हाताला खांद्यापर्यंत उचलून, बाहुला दुमडून हाताच्या बोटांना वर उचलले जाते.

उत्तरबोधी मुद्रासंपादन करा

 
उत्तरबोधी मुद्रा
 
उत्तरबोधी मुद्रे मध्ये बुद्ध

ही मुद्रा दिव्य सार्वभौमिक ऊर्जेसोबत स्वतःला जोडून सर्वोच्च आत्मज्ञानाची प्राप्ती दर्शवते. या मुद्रेत दोन्ही हात हृदयाजवळ ठेवून दोन्ही हातांच्या तर्जनी एकमेकांना स्पर्श करत वरच्या दिशेने असतात तर इतर बोट ही आतल्या बाजूने मोडलेली असतात.

अंजली मुद्रासंपादन करा

 
अंजली मुद्रे मध्ये बुद्ध

याला “नमस्कार मुद्रा” किंवा “हृदयांजली मुद्रा” देखील म्हणतात. जी अभिवादन, प्रार्थना आणि आराधना दर्शवते. या मुद्रेत दोन्ही हात हे पोटाच्या वर मोडलेल्या स्थितीत असतात, हातांचे तळहात हे एकमेकांना जोडलेले असून दोन्ही हातांची बोटे एकमेकांना स्पर्श करत असतात.

राहुलवत्थु

राहुलवत्थु अथ खो भगवा राजगहे यथाभिरन्तं विहरित्वा येन कपिलवत्थु तेन चारिकं पक्कामि। मग भगवान बुद्ध, राजगृह येथे त्यांना आवडेपर्यंत राहिल्यान...