राहुलवत्थु
अथ खो भगवा राजगहे यथाभिरन्तं विहरित्वा येन कपिलवत्थु तेन चारिकं पक्कामि।
मग भगवान बुद्ध, राजगृह येथे त्यांना आवडेपर्यंत राहिल्यानंतर, कपिलवस्तूच्या दिशेने प्रवासाला निघाले.
अनुपुब्बेन चारिकं चरमानो येन कपिलवत्थु तदवसरि। तत्र सुदं भगवा सक्केसु विहरति कपिलवत्थुस्मिं निग्रोधारामे।
क्रमशः प्रवास करत ते कपिलवस्तू येथे आले. तेथे भगवान बुद्ध शाक्य देशात, कपिलवस्तूजवळ, निग्रोधाराम (वडवृक्षाच्या वनात) निवास करत होते.
अथ खो भगवा पुब्बण्हसमयं निवासेत्वा पत्तचीवरमादाय येन सुद्धोदनस्स सक्कस्स निवेसनं तेनुपसङ्कमि, उपसङ्कमित्वा पञ्ञत्ते आसने निसीदि।
आणि पूर्ववेळेस भगवान बुद्ध, आपले आंतरवस्त्र परिधान करून, भिक्षापात्र आणि चिवर (वरचे वस्त्र) घेऊन शाक्य शुद्धोदनाच्या (त्यांच्या वडिलांच्या) निवासस्थानी गेले. तेथे जाऊन, त्यांच्यासाठी मांडलेल्या आसनावर ते बसले.
अथ खो राहुलमाता देवी राहुलं कुमारं एतदवोच – “एसो ते, राहुल, पिता। गच्छस्सु , दायज्जं याचाही”ति।
तेव्हा राहुलची आई असलेली राजकुमारी (बुद्धांची पत्नी), तरुण राहुलला म्हणाली: 'हा तुझे वडील आहेत, राहुल; जा आणि त्यांच्याकडे तुझा वारसा माग.'
अथ खो राहुलो कुमारो येन भगवा तेनुपसङ्कमि, उपसङ्कमित्वा भगवतो पुरतो, अट्ठासि – “सुखा ते, समण, छाया”ति।
तेव्हा तरुण राहुल भगवान बुद्ध जेथे होते तेथे गेला; त्यांच्याजवळ जाऊन, तो भगवान बुद्धांसमोर उभा राहिला (आणि म्हणाला): 'आपली सावली, श्रमण, सुखदायक ठिकाण आहे.'
अथ खो भगवा उट्ठायासना पक्कामि।
तेव्हा भगवान बुद्ध आपल्या आसनावरून उठले आणि निघून गेले,
अथ खो राहुलो कुमारो भगवन्तं पिट्ठितो पिट्ठितो अनुबन्धि – “दायज्जं मे, समण, देहि; दायज्जं मे, समण, देही”ति।
आणि तरुण राहुल भगवान बुद्धांच्या मागेमागे गेला आणि म्हणाला: 'माझा वारसा मला द्या, श्रमण; माझा वारसा मला द्या, श्रमण.'
अथ खो भगवा आयस्मन्तं सारिपुत्तं आमन्तेसि – “तेन हि त्वं, सारिपुत्त, राहुलं कुमारं पब्बाजेही”ति।
तेव्हा भगवान बुद्ध आदरणीय सारिपुत्त यांना म्हणाले: 'तर मग, सारिपुत्त, तरुण राहुलला प्रवज्या (संन्यास) दीक्षा दे.'
“कथाहं, भन्ते, राहुलं कुमारं पब्बाजेमी”ति?
(सारिपुत्त उत्तरले): 'भगवन्, मी तरुण राहुलला प्रवज्या दीक्षा कशी देऊ?'
अथ खो भगवा एतस्मिं निदाने एतस्मिं पकरणे धम्मिं कथं कत्वा भिक्खू आमन्तेसि – “अनुजानामि, भिक्खवे, तीहि सरणगमनेहि सामणेरपब्बज्जं।
या कारणामुळे आणि या प्रसंगी भगवान बुद्ध, धम्म प्रवचन दिल्यानंतर, भिक्खूंना (भिक्षूंना) असे संबोधित म्हणाले: 'मी, ओ भिक्खूंनो, त्रिशरण गमन करून श्रामणेर ची प्रवज्या दीक्षा घेण्याची परवानगी देतो.'
एवञ्च पन, भिक्खवे, पब्बाजेतब्बो – पठमं केसमस्सुं ओहारापेत्वा कासायानि वत्थानि अच्छादापेत्वा एकंसं उत्तरासङ्गं कारापेत्वा भिक्खूनं पादे वन्दापेत्वा उक्कुटिकं निसीदापेत्वा अञ्जलिं पग्गण्हापेत्वा एवं वदेहीति वत्तब्बो – बुद्धं सरणं गच्छामि, धम्मं सरणं गच्छामि, सङ्घं सरणं गच्छामि; दुतियम्पि बुद्धं सरणं गच्छामि, दुतियम्पि धम्मं सरणं गच्छामि, दुतियम्पि सङ्घं सरणं गच्छामि; ततियम्पि बुद्धं सरणं गच्छामि, ततियम्पि धम्मं सरणं गच्छामि, ततियम्पि सङ्घं सरणं गच्छामीति।
'आणि ओ भिक्खूंनो (भिक्षूंनो), तुम्ही अशा प्रकारे प्रवज्या दीक्षा (नवशिक्यावर) दिली पाहिजे: प्रथम त्याचे केस आणि दाढी कापून घ्यावी; त्याला पिवळे वस्त्र परिधान करायला लावावे, त्याचे वरचे वस्त्र एका खांद्यावर व्यवस्थित करायला लावावे, भिक्खूंच्या चरणांना (आपले मस्तक ठेवून) वंदन करायला लावावे, आणि त्याला उकिडवे बसायला लावावे; मग त्याला आपले जोडलेले हात वर उचलायला लावून असे म्हणायला सांगावे: "मी बुद्धात शरण जातो, मी धम्मात शरण जातो, मी संघात शरण जातो. आणि दुसऱ्यांदा देखील, वगैरे. आणि तिसऱ्यांदा देखील, वगैरे."
अनुजानामि, भिक्खवे, इमेहि तीहि सरणगमनेहि सामणेरपब्बज्ज”न्ति।
'मी, ओ भिक्खूंनो (भिक्षूंनो), या त्रिशरण गमनाच्या घोषणेद्वारे श्रामणेर प्रवज्या दीक्षा घेण्याची परवानगी देतो.'
अथ खो आयस्मा सारिपुत्तो राहुलं कुमारं पब्बाजेसि।
अशा प्रकारे आदरणीय सारिपुत्त यांनी तरुण राहुलला प्रवज्या दीक्षा दिली.
अथ खो सुद्धोदनो सक्को येन भगवा तेनुपसङ्कमि, उपसङ्कमित्वा भगवन्तं अभिवादेत्वा एकमन्तं निसीदि।
तेव्हा शाक्य शुद्धोदन (बुद्धांचे वडील) भगवान बुद्ध जेथे होते तेथे गेले; त्यांच्याजवळ जाऊन आणि भगवान बुद्धांना आदरपूर्वक वंदन करून, ते त्यांच्याजवळ बसले.
एकमन्तं निसिन्नो खो सुद्धोदनो सक्को भगवन्तं एतदवोच – “एकाहं, भन्ते, भगवन्तं वरं याचामी”ति।
जवळ बसलेले शाक्य शुद्धोदन भगवान बुद्धांना म्हणाले: 'भगवन्, मी भगवान बुद्धांना एक वर मागतो.'
“अतिक्कन्तवरा खो, गोतम, तथागता”ति।
(बुद्ध उत्तरले): 'गोतम, तथागत (परिपूर्ण झालेले) वर देण्यापलीकडे आहेत.'
“यञ्च, भन्ते, कप्पति, यञ्च अनवज्ज”न्ति। “वदेहि, गोतमा”ति।
(शुद्धोदन म्हणाले): 'भगवन्, ही एक योग्य आणि आक्षेपार्ह नसलेली मागणी आहे.' 'बोला, गोतम.'
“भगवति मे, भन्ते, पब्बजिते अनप्पकं दुक्खं अहोसि, तथा नन्दे, अधिमत्तं राहुले।
'भगवन्, जेव्हा भगवान बुद्धांनी जग सोडले (संन्यास घेतला), तेव्हा मला खूप दुःख झाले; तसेच नंदानेही तेच केले तेव्हा झाले; जेव्हा राहुलनेही तेच केले तेव्हा माझे दुःख खूप जास्त होते.
पुत्तपेमं , भन्ते, छविं छिन्दति, छविं छेत्वा चम्मं छिन्दति, चम्मं छेत्वा मंसं छिन्दति, मंसं छेत्वा न्हारुं छिन्दति, न्हारुं छेत्वा अट्ठिं छिन्दति, अट्ठिं छेत्वा अट्ठिमिञ्जं आहच्च तिट्ठति।
पुत्राचे प्रेम, भगवन्, त्वचेत भेदते; त्वचेत भेदून, ते चामडीत भेदते; चामडीत भेदून, ते मांसात भेदते, . . . . स्नायूंमध्ये, . . . . हाडांमध्ये; हाडांमध्ये भेदून, ते अस्थिमज्जेपर्यंत पोहोचते आणि अस्थिमज्जेत राहते.
साधु, भन्ते, अय्या अननुञ्ञातं मातापितूहि पुत्तं न पब्बाजेय्यु”न्ति।
कृपया, भगवन्, आई-वडिलांच्या परवानगीशिवाय मुलाला प्रवज्या दीक्षा देऊ नये.'
अथ खो भगवा सुद्धोदनं सक्कं धम्मिया कथाय सन्दस्सेसि समादपेसि समुत्तेजेसि सम्पहंसेसि।
तेव्हा भगवान बुद्धांनी शाक्य शुद्धोदनांना धम्म कथेद्वारे समजावले, प्रेरित केले, उत्तेजित केले आणि आनंदित केले.
अथ खो सुद्धोदनो सक्को भगवता धम्मिया कथाय सन्दस्सितो समादपितो समुत्तेजितो सम्पहंसितो उट्ठायासना भगवन्तं अभिवादेत्वा पदक्खिणं कत्वा पक्कामि।
बुद्धांनी शुद्धोदनांना एक उपदेश देऊन सूचना दिली, प्रेरित केले आणि आनंदित केले, त्यानंतर शुद्धोदन आपल्या आसनावरून उठले, वंदन केले, बुद्धांच्या उजव्या बाजूस ठेवून प्रदक्षिणा केली आणि निघून गेले.
अथ खो भगवा एतस्मिं निदाने एतस्मिं पकरणे धम्मिं कथं कत्वा भिक्खू आमन्तेसि – “न, भिक्खवे, अननुञ्ञातो मातापितूहि पुत्तो पब्बाजेतब्बो। यो पब्बाजेय्य, आपत्ति दुक्कटस्सा”ति।
थोड्याच वेळात बुद्धांनी एक उपदेश दिला आणि भिक्षूंना संबोधित केले: "तुम्ही आई-वडिलांच्या परवानगीशिवाय मुलाला प्रव्रज्या देऊ नये. जर तुम्ही दिली, तर तुम्ही दुक्कट (गैरवर्तनाचा) अपराध करता."
अथ खो भगवा कपिलवत्थुस्मिं यथाभिरन्तं विहरित्वा येन सावत्थि तेन चारिकं पक्कामि। अनुपुब्बेन चारिकं चरमानो येन सावत्थि तदवसरि।तत्र सुदं भगवा सावत्थियं विहरति जेतवने अनाथपिण्डिकस्स आरामे।
कपिलवस्तूमध्ये त्यांना हवे तितके दिवस राहिल्यानंतर, बुद्ध श्रावस्तीच्या दिशेने प्रवासाला निघाले. जेव्हा ते अखेरीस श्रावस्तीला पोहोचले, तेव्हा ते जेतवनात, अनाथपिंडिकाच्या मठात थांबले.
तेन खो पन समयेन आयस्मतो सारिपुत्तस्स उपट्ठाककुलं आयस्मतो सारिपुत्तस्स सन्तिके दारकं पाहेसि – “इमं दारकं थेरो पब्बाजेतू”ति।
या वेळी आदरणीय सारिपुत्त यांच्यावर उपकार करणारे एक कुटुंब आदरणीय सारिपुत्त यांच्याकडे एक मुलगा घेऊन आले आणि संदेश दिला: “कृपया या मुलाला स्थविरांनी प्रव्रज्या द्यावी.”
अथ खो आयस्मतो सारिपुत्तस्स एतदहोसि – “भगवता पञ्ञत्तं ‘न एकेन द्वे सामणेरा उपट्ठापेतब्बा’ति। अयञ्च मे राहुलो सामणेरो। कथं नु खो मया पटिपज्जितब्ब”न्ति?
सारिपुत्त यांनी विचार केला, “बुद्धांनी हा नियम सांगितला आहे की एका भिक्षूने दोन श्रामणेरांची / नवशिक्यांची देखभाल करू नये. माझ्याकडे आधीच राहुल हा श्रामणेर आहे. मग मी आता काय करावे?” त्यांनी बुद्धांना सांगितले.
भगवतो एतमत्थं आरोचेसि। अनुजानामि, भिक्खवे, ब्यत्तेन भिक्खुना पटिबलेन एकेन द्वे सामणेरे उपट्ठापेतुं, यावतके वा पन उस्सहति ओवदितुं अनुसासितुं तावतके उपट्ठापेतुन्ति।
“मी एका सक्षम आणि समर्थ भिक्षूला दोन श्रामणेर भिक्षूंची देखभाल करण्याची परवानगी देतो, किंवा त्याला शिकवण्यास आणि मार्गदर्शन करण्यास जेवढे शक्य असेल तेवढ्यांची.”
राहुलवत्थु निट्ठितं।
मराठी अनुवाद : महेश कांबळे
दिनांक : १५/१२/२०२५
संदर्भ : विनयपिटक – महावग्ग – ४१ राहुलवत्थु